एल्विश यादवच्या घरावर गोळीबार, २५ ते ३० गोळ्या झाडल्या

  42

गुरुग्राम : हरियाणातील गुरुग्राममध्ये धक्कादायक घटना घडली. युट्यूबर एल्विश यादवच्या घरावर गोळीबार झाला. बाईकवरुन आलेल्या गुंडांनी एल्विश यादवच्या घरावर २५ ते ३० गोळ्या झाडल्या. या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने तपास सुरू आहे.

एल्विश गुरुग्रामच्या सेक्टर ५७ मध्ये त्याच्या कुटुंबासह राहतो. ज्यावेळी गोळीबार झाला त्यावेळी एल्विश घरात नव्हता. गोळीबार पहाटेच्या सुमारास झाला. गोळीबार झाला तेव्हा घरी फक्त एल्विशची आई आणि एक केअरटेकर असे दोघेच होते. पण गोळीबार झाल्यापासून एल्विशचे नातलग दहशतीच्या छायेत वावरत आहेत. एल्विश परदेशात आहे आणि त्याची गोळीबार प्रकरणावर अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

गुरुग्राममध्ये तीन मुखवटाधारी गुंडांनी एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार केला. ही घटना पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. गुंडांनी एल्विश यादवच्या घरावर २५ ते ३० गोळ्या झाडल्या; असे गुरुग्राम पोलिसांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड गायक फाजिलपुरियावर गोळीबार झाला होता. यामुळे खंडणी मिळविण्याच्या हेतूने गोळीबार करण्याचे प्रकार होत आहेत का याचाही तपास सुरू आहे.
Comments
Add Comment

Chintamani First Look: 'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीची पहिली झलक समोर

मुंबई: मुंबईतील मानाच्या गणपतीमधील एक असलेला 'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीची पहिली झलक समोर आली आहे. आज सकाळी

विद्यापीठात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या, अवघ्या २९ दिवसांत दोन घटना

ग्रेटर नोएडा : उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडातल्या शारदा विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आणि एका

मुंबईत कचरा उचलण्यासाठी आता ई-वाहन

वांद्रे ते सांताक्रूझमधील अरुंद गल्ल्यांमध्ये होणार वापर मुंबई : मुंबईतील झोपडपट्टी वस्त्यांमधील अरुंद

संघाची दिल्लीत दोन दिवस बैठक

संलग्न संस्थांचे पदाधिकारीही उपस्थित राहणार मुंबई : अमेरिकेने अलीकडेच भारतावर ५० टक्के कर लावण्याची घोषणा केली

आजही पाऊस बरसणार, कोकण,मुंबई, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासाठी पावसाचा अलर्ट

गेल्या दोन दिवसात पावसाने राज्यात सर्वदूर हजेरी लावली असून हवामान विभागाने आजही पावसाचा इशारा दिला आहे.

बँकॉकहून मुंबईला येणारे विमान लँडिंगदरम्यान आदळले! थोडक्यात टळला अपघात

मुंबई: आज मुंबई विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला आहे, बँकॉकवरुण येणारे हे