
एल्विश गुरुग्रामच्या सेक्टर ५७ मध्ये त्याच्या कुटुंबासह राहतो. ज्यावेळी गोळीबार झाला त्यावेळी एल्विश घरात नव्हता. गोळीबार पहाटेच्या सुमारास झाला. गोळीबार झाला तेव्हा घरी फक्त एल्विशची आई आणि एक केअरटेकर असे दोघेच होते. पण गोळीबार झाल्यापासून एल्विशचे नातलग दहशतीच्या छायेत वावरत आहेत. एल्विश परदेशात आहे आणि त्याची गोळीबार प्रकरणावर अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.
गुरुग्राममध्ये तीन मुखवटाधारी गुंडांनी एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार केला. ही घटना पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. गुंडांनी एल्विश यादवच्या घरावर २५ ते ३० गोळ्या झाडल्या; असे गुरुग्राम पोलिसांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी बॉलिवूड गायक फाजिलपुरियावर गोळीबार झाला होता. यामुळे खंडणी मिळविण्याच्या हेतूने गोळीबार करण्याचे प्रकार होत आहेत का याचाही तपास सुरू आहे.