Saturday, August 16, 2025

साप्ताहिक राशिभविष्य, १७ ते २३ ऑगस्ट २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, १७ ते २३ ऑगस्ट २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, १७ ते २३ ऑगस्ट २०२५






















































नवीन ओळखी होतील


मेष : नवीन प्रकल्प किंवा मोठी गुंतवणूक टाळणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे व्यवसायात अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. नवीन आव्हाने व कामातील नवीन बदल काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. तुमची वागणूक अतिशय चांगली असणार आहे. अधिकार वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी आणि मित्रांसमवेत कुटुंबीयांशी चांगले संबंध कसे ठेवावेत याचे तुम्ही धडे घेत आहात. कौटुंबिक पातळीवर आनंद असेल. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. तुमच्या नवीन ओळखी होतील. दूरचा प्रवास संभवतो. प्रवास कार्यसिद्ध राहतील. एखादे धार्मिक कार्य घडू शकते.

यश मिळणार आहे


वृषभ : आपण आपल्या बुद्धिकौशल्याद्वारे कठीण समस्या सहजगत्या हाताळाल. आत्मविश्वासात वृद्धी होऊन आपल्या समोरील निर्णय वेगाने घ्याल. कौटुंबिक पातळीवर आणि आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला यश मिळणार आहे. पोलीस दलातील किंवा डिफेन्समध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचे साहसपूर्ण कार्य केल्याबद्दल सन्मान होण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्ती स्पर्धा परीक्षांना बसणार आहेत त्यांना चांगले यश मिळेल. सरकारी नोकरी प्राप्त होण्याची शक्यता आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीत यश मिळणार आहे. आपल्या अधिकार पद्धतीत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र वैवाहिक जीवनात चढ-उताराची परिस्थिती असू शकते. नोकरी करणाऱ्या महिलांनी कामाचे नियोजन करावे. धनलाभाचे योग.

प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे


मिथुन : आपल्या कार्यक्षेत्रात साहस आणि धैर्याने काम केल्यामुळे आपणास प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे. व्यापार व्यावसायिकांना बाजारात मंदी असली तरीही आपल्या स्वतःच्या व्यापारामध्ये विशेष फरक पडणार नाही किंवा आपल्याला जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. आपल्याला जर गुंतवणूक करायची असेल, तर तज्ज्ञांच्या मदतीने गुंतवणूक केल्यास आपल्यासाठी ते उपयुक्त होणार आहे. विद्यार्थी आपल्या शिक्षणाव्यतिरिक्त एखादी कला जोपासण्याचा प्रयत्न करतील. वस्तुस्थितीची जाणीव ठेवणे क्रमप्राप्त ठरेल. महिलांना स्वतःच्या कामामुळे प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.

प्रयत्न सफल होतील


कर्क : आपल्या योजना कार्यान्वित होण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. या कालावधीमध्ये आपल्या महत्त्वाकांक्षेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणार आहात. ज्या व्यक्ती रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये काम करत आहेत त्यांना चांगल्यापैकी यश मिळणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये कलह होऊ शकतो. कामाचा वेग वाढून कामांमध्ये यश प्राप्त होणार आहे. आपल्या मालमत्तेमधील अडकलेले व्यवहार चांगल्या पद्धतीने पूर्ण कराल. व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहून नवीन करारमदार होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात चांगले यश मिळेल. प्रयत्न सफल होतील.

अधिकार क्षेत्रात वृद्धी होईल


सिंह : हा सप्ताह आपल्यासाठी संमिश्र घटनांचा आहे. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या मार्गात अडचणी आल्या तरी आपण स्वतःचे खच्चीकरण करून घेऊ नका. अधिकार क्षेत्रात वृद्धी होईल. सरकारी कामांमध्ये जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. महत्त्वाची कामे पूर्ण करणार आहात. तुम्ही स्वतःशी व स्वतःच्या गरजांशी प्रामाणिक असल्यामुळे या कालावधीमध्ये चांगला मोबदला मिळवणार आहात. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये जबाबदाऱ्या वाढल्यासारखे वाटतील. कुटुंबातील मुलांकडून चांगल्या वार्ता कानी येतील.

व्यावसायिक जुनी येणी येतील


कन्या : व्यावसायिक क्षेत्रांमध्ये तुम्ही चांगले योगदान देणार आहात. नवीन संकल्पना तसेच नवीन तंत्रज्ञानामुळे व्यवसायात बदल करण्याची शक्यता. व्यावसायिक जुनी येणी येतील. तुमचे ध्येय निश्चित असणार आहे. एखादे काम हाती घेतल्यावर ते पूर्ण होईपर्यंत तुम्ही थांबणार नाही. मात्र आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये अहंकाराचा भाव येण्याची शक्यता आहे. आपली जबाबदारी वाढणार आहे. या कालावधीमध्ये आर्थिक व्यवहार नीट सांभाळावे. आपल्या स्वभावामध्ये समतोल ठेवा.


 

खर्चावर नियंत्रण ठेवणे


तूळ : या काळात तुम्ही चैनीच्या वस्तू खरेदी करू शकता. ऐश आरामात जीवन जगणार आहात, पण आपण खर्चावर नियंत्रण ठेवणे फार आवश्यक आहे. कौटुंबिक आयुष्यामध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. खासगी, व्यावसायिक पातळीवर कोणाशीही व्यवहार करताना जपून वागा. या कालावधीमध्ये नवीन कामातून अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होऊ शकतो. आपल्या उत्पन्नात निश्चितच वाढ होणार आहे. आपल्या पदामध्ये व स्थानात वृद्धी होईल. आपल्या नवीन योजना कार्यान्वित करण्याचा हा कालावधी आहे. सहकुटुंब, सहपरिवार प्रवासाचे योग आहेत.

उत्पन्नामध्ये वाढ


वृश्चिक : या कालावधीमध्ये आपल्याला सर्व बाजूने यश मिळणार आहे. थोड्याच प्रयत्नांती आपल्या व्यावसायिक क्षेत्रात चांगली उंची गाठणार आहात.दीर्घकाळ रेंगाळलेली कामे गतिमान होतील. आपल्याला चांगला मोबदला आणि स्वतःची ओळख मिळणार आहे. तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांमुळे उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. कौटुंबिक आयुष्य सुखी असणार आहे. एखादी चांगली संधी चालून येईल. स्वतःला व्यक्त करण्यासाठी आणि सृजनशील क्षमतांचा वापर करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. काही अनपेक्षित बदल होण्याची शक्यता आहे.

इच्छा पूर्ण होतील


धनु : हा कालावधी आपणासाठी चांगला असणार आहे. जास्त प्रयत्न न करता आपल्याला नवीन संधी मिळणार आहेत. काही गोष्टी खूप कष्टानंतर तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुम्ही यावेळी काही निश्चित निर्णय घ्याल, ते निर्णय आपल्याला प्रगतिपथावर नेण्यासाठी सहाय्यक ठरणार आहेत. कर्जासाठी अर्ज केला असेल तर कर्ज मंजूर होईल. आरोग्याच्या थोड्याफार तक्रारी राहू शकतात. व्यावसायिक, खासगी आयुष्यात समतोल साधणार आहात. व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील.

मालमत्तेची खरेदी होऊ शकते


मकर : अचानक भावनेच्या आहारी जाऊन किंवा अपेक्षाभंगामुळे काही चुकीचे निर्णय घेऊ नका. निष्काळजीपणा किंवा दुर्लक्ष केल्यामुळे काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. एखादे अचानक नुकसान होऊ शकते यासाठी सर्वतोपरी काळजी घ्या. स्वतःचे काम स्वतः करा. तुमचं वागणं प्रभावशाली असणार आहे. तुमचे ओळखीच्या व्यक्तींशी संबंध मित्रत्वाचे करण्यात यश मिळणार आहे. एखाद्या व्यवहारात आपणास चांगला आर्थिक फायदा होणार आहे. वाहन खरेदी किंवा मालमत्तेची खरेदी होऊ शकते. वरिष्ठ आणि प्रभावशाली व्यक्तींकडून आपणास पूर्ण सहकार्य मिळेल व्यावसायिक पातळीवर तुम्ही प्रगती कराल.

रागावर नियंत्रण ठेवा


कुंभ : नशिबाचे दान आपल्याविरुद्ध पडत आहे असे आपल्याला वाटेल.भागीदाराकडून अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास फारसे लाभदायक ठरणार नाहीत. आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. जवळच्या व्यक्तीशी वाद वाढवण्याची शक्यता आहे. आपल्या वरिष्ठ व्यक्तींबरोबर आपला सुसंवाद राहणार आहे. पुढील वाटचालीमध्ये आपल्याला त्याचा चांगला फायदा होईल. नवीन कल्पना अमलात आणण्यापूर्वी सर्व बाजूंनी विचार करणे आवश्यक आहे. आपल्या घराकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अध्यात्मिक बाजूकडे लक्ष दिल्यास तुमच्या व्यक्तिगत इच्छा पूर्ण होतील. कोणताही निर्णय घेताना शांतपणे विचार करा.

प्रवासाचे योग घटित होत आहेत


मीन : आपणास काही त्रास आणि खच्चीकरण येऊ शकते. या परिस्थितीत तुम्ही वस्तुस्थितीकडे सकारात्मकतेने पाहणे आवश्यक आहे. जबाबदार किंवा प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही प्रगती करणार आहात. उद्योग अथवा व्यवसायात समृद्धी लाभणार आहे. नोकरी करत असाल तर बढती योग आहेत. कल्पक आणि बौद्धिक ऊर्जेच्या दृष्टीने अनुकूल कालावधी आहे. तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. अध्यात्मिक दृष्ट्याही तुम्ही वरची पातळी गाठणार आहात. जे काम हाती घ्याल त्यात यशस्वी होणार आहात. सहकुटुंब, सहपरिवार प्रवासाचे योग आहेत.
Comments
Add Comment