स्व-जाणीव

  17

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर


जोमनुष्य स्वतःला व स्वतःच्या शक्तीला ओळखतो त्याला जीवनात सर्व काही मिळते. आपल्यामध्ये सुप्त शक्तींचा साठा आहे. त्याचे ज्ञान झाल्यानंतर माणसामध्ये आमूलाग्र बदल होतो. स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, गौतमबुद्ध, महावीर, येशू ख्रिस्त यांना स्वत:मधल्या आत्मशक्तींचा साक्षात्कार झाला म्हणूनच ते महान बनले.


जो स्वत:ला ओळखत नाही, तो बाहेरच्या जगाला ओळखू शकत नाही. म्हणून स्वतःची ओळख हीच प्रगतीची आत्मोन्नतीची व ध्येयपूर्तीची गुरुकिल्ली आहे. आपल्या कल्पनाशक्तीला कल्पना करता येणार नाही इतकी सुप्त शक्ती आपल्या सर्वांच्या जवळ आहे ती प्रकट झाल्यावर आपल्यालाच त्याचे आश्चर्य वाटेल.


परमेश्वराने सर्वस्व ओतून माणसाची निर्मिती केली. आपल्यामध्ये सुप्त अवस्थेतला लेखक, कलाकार, डॉक्टर, कोणी ना कोणी असतोच त्याला जागृत केले पाहिजे. अनेक व्यक्तींजवळ गुणवत्ता, शक्ती व मोठेपणाची बीजे असतात. पण उत्साहाचे पाणी न मिळाल्यामुळे ही बीजे करपून जातात.


रवींद्रनाथ टागोरांची एक कथा आहे. एक मनुष्य गळ्यात लोखंडाची माळ घालून परिसराचा शोध घेत असतो. प्रत्येक दगड घेऊन तो गळ्यातील लोखंडाला लावून मग टाकून देत असे. ज्या दगडाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होईल तो परिस. एक दिवस त्याने दगड घेतला, माळेला लावला आणि टाकून दिला. दगड टाकून दिल्यानंतर त्याने लोखंडाच्या माळेकडे पाहिले ती सोन्याची होती. परिस त्याला सापडला होता; परंतु त्याने तो फेकून दिला होता. आपल्यामध्ये असणारे सामर्थ्य आपण असेच वाया घालवतो. स्वामी विवेकानंद म्हणतात education is the manifestation of perfection already in menमाणसांमध्ये अव्यक्त असणाऱ्या पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण होय. स्वतःची ओळख पटल्यानंतर आपल्यात असामान्य बदल होता यासाठी know thyself स्वतःला ओळखा. आपली विखुरलेली शक्ती एकवटता येते. स्वतःची ओळख झाली नाही.


स्वतःची संकल्पना Self Concept योग्य नसेल तर माणसांमध्ये तणाव निर्माण होतो. जीवन जगण्यासाठी स्व -जाणीव योग्य प्रकारे होणे आवश्यकच आहे.


१. स्व-जाणीव म्हणजे स्वतःच्या विचार, भावना, कृती, गुणदोष, ताकद आणि मर्यादा यांची स्पष्ट जाणीव असणे. आपली अंतर्गत दुनिया समजून घेणे हा स्व-विकासाचा पहिला टप्पा आहे.


२. स्व-जाणिवेचे महत्त्व : योग्य निर्णय घेणे : जेव्हा आपल्याला स्वतःची ताकद आणि कमकुवत बाजू माहीत असतात, तेव्हा आपण चांगले निर्णय घेऊ शकतो.
संबंध सुधारणा : आपल्या वागणुकीचा इतरांवर होणारा परिणाम ओळखून वर्तन सुधारता येते.
तणाव नियंत्रण : आपल्या भावनांची जाणीव असल्याने त्यांना योग्य प्रकारे हाताळता येते.
स्व-विकासाची दिशा : सुधारण्यासारख्या गोष्टी ओळखून पुढे जाणे सोपे होते.
स्वतःकडे रोज जाणीवपूर्वक पाहणे व योग्य तो बदल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.


३. स्व-जाणीव वाढवण्याचे मार्ग :




  • १. स्वतःशी प्रामाणिक राहा - स्वतःच्या चुका आणि यश दोन्ही स्वीकारा.

  • २. दैनंदिनी लिहा - दिवसाचे अनुभव, भावना आणि विचार लिहिल्याने स्पष्टता येते.

  • ३. प्रतिसाद घ्या - विश्वासू व्यक्तीकडून फीडबॅक घेऊन सुधारणा करा.

  • ४. ध्यानधारणा - मन वर्तमान क्षणात ठेवण्याचा सरा.

  • ५. स्व-विचारासाठी वेळ काढा - “मी हे का केले?” किंवा “माझी खरी भावना काय आहे?” असे प्रश्न स्वतःला विचारा.


४. प्रेरणादायी उदाहरण :
थोर तत्त्ववेत्याने सांगितले आहे. त्यांचे वाक्य -“स्वतःमध्ये बदल घडवा, जग बदलताना दिसेल” त्यांची आत्मपरीक्षणाची सवय आणि सतत स्व-सुधारणा हीच त्यांची ताकद होती.
स्व-जाणीव ही आरशासारखी आहे - ती आपल्याला आपला खरा चेहरा दाखवते. जो व्यक्ती स्वतःला जाणतो, तोच इतरांना आणि जगाला योग्यरीत्या समजू शकतो. स्व-जाणिवेच्या प्रवासात प्रामाणिकपणा, संयम आणि सातत्य आवश्यक आहे.

Comments
Add Comment

तुझ्या हाताच्या चवीचं...

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ बाबा सरकारी नोकरीत सुपरिटेंडंट होते. त्यामुळे त्यांची नियुक्ती महाराष्ट्रात

हत्ती

कथा : रमेश तांबे एक होता हत्ती त्याच्या अंगात फार मस्ती इकडे तिकडे धावायचा पायाखाली येईल त्याला चिरडायचा. हत्ती

दिवसा बघू नका सूर्याकडे ...

कथा : प्रा. देवबा पाटील आदित्य, सुभाष व आदित्यचे मित्र यांचा एक चांगला गट तयार झाला होता. सुभाष त्यांना दररोज

बदल स्वीकारणारा माणूस !

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ खूप दिवसांपासून वाटत होते की, एआयवर लिहावे. आज अचानक एका चित्रकार मित्राचा फोन

साधू आणि सरपंच

कथा : रमेश तांबे एका गावात एक साधू राहायचा. गावातल्या एका देवळात तो विशिष्ट वेळी बसलेला असायचा. तेजःपूंज चेहरा,

सूर्योदय व सूर्यास्त कसे होतात?

कथा :प्रा. देवबा पाटील आज आदित्य आपल्या मनाशी काहीतरी ठरवूनच शाळेत गेला; परंतु सकाळी सुभाष त्याला शाळेत काही