Sunday, August 17, 2025

रिअलमी पी 4 सिरीज २० ऑगस्टला भारतात होणार लाँच

रिअलमी पी 4 सिरीज २० ऑगस्टला भारतात होणार लाँच

मुंबई : रिअलमी कंपनी २० ऑगस्ट २०२५ रोजी भारतात आपली नवी रिअलमी P4 स्मार्टफोन सिरीज बाजारात आणत आहे. या मालिकेत दोन मॉडेल्सचा समावेश आहे. रिअलमी पी4 5जी आणि रिअलमी पी4 प्रो 5जी. हे दोन्ही स्मार्टफोन फ्लिपकार्ट तसेच रिअलमीच्या अधिकृत वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध होणार असून कंपनीने त्यांच्या कॅमेरा व इतर महत्त्वाच्या वैशिष्ट्यांची माहिती लाँचपूर्वीच जाहीर केली आहे.


रिअलमीपी4 प्रो 5जी मध्ये दुहेरी मागील कॅमेरा सेटअप मिळणार असून त्यात 50 मेगापिक्सलचा सोनी IMX896 सेन्सर आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनची सुविधा असेल. समोरील कॅमेरासाठी कंपनीने 50 मेगापिक्सलचा OV50D सेन्सर दिला आहे. या मॉडेलमध्ये 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग 60FPS पर्यंत आणि 4K HDR रेकॉर्डिंग 30FPS वर करण्याची क्षमता दिली आहे. अल्ट्रा स्टेडी व्हिडिओ, एआय मोशन स्टॅबिलायझेशन आणि हायपरशॉट आर्किटेक्चरमुळे व्हिडिओ अनुभव अधिक समृद्ध होणार आहे. याशिवाय एआय ट्रॅव्हल स्नॅप आणि एआय लँडस्केप मोडही यात समाविष्ट केले आहेत.


दुसरीकडे, रिअलमी P4 5G मॉडेलमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड लेन्स असणार आहे. 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगसह हे मॉडेल प्रो व्हेरिएंटप्रमाणेच एआय-सक्षम कॅमेरा फीचर्स घेऊन येईल. फ्रंट कॅमेरासाठी यात 16 मेगापिक्सलचा लेन्स दिला जाण्याची शक्यता आहे.


स्पेसिफिकेशन्सबाबत बोलायचे झाले तर रिअलमी P4 प्रो 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 4 प्रोसेसरहायपरव्हिजन एआय जीपीयू असणार आहे. गेमिंगसाठी खास 7,000 sq mm एअरफ्लो VC कूलिंग सिस्टीम देण्यात आली आहे. 7.68mm जाडीच्या या स्मार्टफोनमध्ये 7,000mAh क्षमतेची बॅटरी असून 80W फास्ट चार्जिंग, 10W रिव्हर्स चार्जिंग यांसारख्या सुविधा असतील. कंपनीचा दावा आहे की एकदा चार्ज केल्यावर BGMI सारखे गेम्स 90fps वर तब्बल आठ तास खेळता येणार आहेत.


दोन्ही मॉडेल्समध्ये हायपरग्लो AMOLED 4D Curve+ डिस्प्ले दिला आहे ज्यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट, HDR10+ सर्टिफिकेशन आणि 6,500 निट्सपर्यंत पीक ब्राईटनेस मिळतो. डिस्प्ले 4,320Hz हाय-फ्रिक्वेन्सी डिमिंगसह TÜV Rheinland मान्यताप्राप्त डोळ्यांचे संरक्षण तंत्रज्ञान देतो.


रिअलमी P4 5G मध्ये मीडियाटेक डिमेन्सिटी 7400 अल्ट्रा 5G चिपसेट आणि पिक्सलवर्क्स प्रोसेसर मिळणार आहे. 6.77 इंचांचा फुल एचडी+ हायपरग्लो AMOLED डिस्प्ले, 144Hz रिफ्रेश रेट, HDR10+ सपोर्ट आणि 4,500 निट्सपर्यंत पीक ब्राईटनेस अशी त्याची वैशिष्ट्ये असतील. 3,840Hz PWM डिमिंग, ब्लू लाईट रिडक्शन आणि हार्डवेअर लेव्हलवरील फ्लिकर कंट्रोल यांसारख्या सोयी यात देण्यात आल्या आहेत.


यातदेखील 7,000mAh क्षमतेची टायटन बॅटरी देण्यात आली असून 80W फास्ट चार्जिंगच्या मदतीने केवळ 25 मिनिटांत 50 टक्के चार्जिंग करता येते. या बॅटरीमुळे सलग 11 तासांपर्यंत बीजीएमआय खेळण्याची क्षमता मिळणार आहे. तसेच या मॉडेलमध्येही रिव्हर्स चार्जिंग, एआय स्मार्ट चार्जिंग आणि बायपास चार्जिंगच्या सोयी देण्यात आल्या आहेत.


रिअलमीची ही नवीन पी 4 सिरीज गेमिंग, कॅमेरा परफॉर्मन्स आणि बॅटरी बॅकअपच्या बाबतीत वापरकर्त्यांना नवा अनुभव देईल अशी कंपनीची अपेक्षा आहे.


Comments
Add Comment