
मुंबई: मुंबईतील मानाच्या गणपतीमधील एक असलेला 'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीची पहिली झलक समोर आली आहे. आज सकाळी 'चिंचपोकळीचा चिंतामणी' या अधिकृत इंस्टाग्राम पेजद्वारे बाप्पाची पहिली झलक सर्वांनी पाहिली. इतकेच नव्हे तर चिंतामणीची पहिली झलक पाहण्यासाठी परेलच्या वर्कशॉपसमोर मोठ्या संख्येने लोकं सकाळपासून जमलेले दिसून आले.
View this post on Instagram
मुंबईतील जुन्या मंडळांपैकी एक म्हणून 'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीची ओळख आहे. त्यामुळे या गणपतीचे विशेष स्थान गणेश भक्तांच्या मनात आहे. म्हणून, यंदाच्या वर्षी चिंतामणी कोणत्या रूपात पाहायला मिळेल, याबद्दल गणेश भक्तांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. याच पार्श्वभूमीवर आज रविवारी, 'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीचा आगमन सोहळा असल्याची बातमी जेव्हा कळली, तेव्हा लहानापांसून ते मोठ्यांपर्यंत गणेश भक्तांनी चिंतामणी गणपतीची पहिली झलक पाहण्यासाठी, करीरोड नजीक असलेल्या परेल लोकल वर्कशॉपच्या इथे प्रचंड प्रमाणात गर्दी केली. त्यानंतर जेव्हा बाप्पाच्या मूर्तीवरून पडदा हाटला, तेव्हा गणेश भक्तांच्या आनंदाला पारावार उरला नाही. संभाजी महाराजांच्या रूपातील त्याच्या प्रतिकृतीने लोकांचे लक्ष वेधून घेतले. पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात त्यानंतर बाप्पाचा दिमाखात आगमन सोहळा पार पडला.