कायदा मोडत आमदारानेच केला स्टंट!

  19

वार्तापत्र: विदर्भ

आमदार आशीष देशमुख हे तसे राजकीय पोरकटपणासाठी ओळखले जातात. देशमुख घराणे मूळचे काँग्रेसचे. आशीष देशमुख यांनीही आधी काँग्रेसमधूनच आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. मात्र, ते २००८ मध्ये भाजपमध्ये आले. नंतर २०१४ मध्ये ते काटोलमधून विधानसभेला निवडून आले.

लोकप्रतिनिधीने आपल्या वर्तनातून समाजासमोर आदर्श ठेवावा असे अपेक्षित असते. मात्र तेच लोकप्रतिनिधी जेव्हा कायदा मोडतात तेव्हा तो चर्चेचा विषय ठरतो. असाच प्रकार स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे घडला. झाले असे की काटोलचे भाजपचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त पूर्वसंध्येला एक बाईक रॅली काढली. त्यात ते देखील स्वतः बाईक चालवत रॅलीमध्ये सहभागी झाले होते. बाईक चालवताना विद्यमान कायद्यानुसार डोक्यात हेल्मेट घालणे गरजेचे आहे. आमदार देशमुख यांनी हेल्मेटला सुट्टी दिली होती. चालत्या बाईकवर स्टंट करण्याला देखील कायद्याने मनाई आहे. असे असताना देशमुख या रॅलीत चालत्या बाईकवर स्टंट केला होता. नेमके त्याच वेळी त्यांच्याच पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्टंट करणाऱ्यांची पोलीस गय करणार नाहीत असे मुंबईत एका समारंभात सांगत होते. देशमुख यांचा हा स्टंट करतानाचा व्हिडिओ सर्व वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केला आणि त्यांच्यावर काय कारवाई करणार असा सवाल उपस्थित करण्यात आला. परिणामी सुरुवातीला पोलिसांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले होते. मात्र मग दबाव वाढल्याने भा

आशीष देशमुख हे तसे राजकीय पोरकटपणासाठी देखील ओळखले जातात. देशमुख घराणे मूळचे काँग्रेसचे, आशीष देशमुख यांनीही आधी काँग्रेसमधूनच आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. मात्र ते २००८ मध्ये भाजपमध्ये आले. नंतर २०१४ मध्ये ते काटोलमधून आपले काका राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख यांचा पराभव करून आमदार म्हणून निवडून आले. भाजपात असतानाही भाजपची शिस्त धाब्यावर बसवण्यात ते आघाडीवर असायचे. त्यांना फडणवीस मंत्रिमंडळात मंत्रिपद हवे होते. ते न मिळाल्याने २०१८ मध्ये त्यांनी भाजप सोडला आणि पुन्हा काँग्रेसवासी झाले. नंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते चक्क नितीन गडकरींनाच आव्हान द्यायला निघाले होते. मात्र पक्षाने त्यांना अडवले. नंतर काँग्रेसमध्ये आपली डाळ शिजत नाही हे पाहून ते पुन्हा भाजपमध्ये आले आणि आता २०२४ मध्ये पुन्हा निवडून आले आहेत. मात्र अजूनही ते भाजपात किती टिकतील याबाबत सर्वच साशंक आहेत.

नागपुरातील खासगी ट्रॅव्हल्सचे थांबे

नागपूर शहरातून दिवसभरात खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस जवळजवळ हजाराहून अधिक फेऱ्या करतात. या खासगी ट्रॅव्हल्सचे कुठेही नियमित असे थांबले नाहीत. त्यांचे ड्रायव्हर सरकारी नियम मोडून आपल्या सोयीने गाड्या थांबवतात. त्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होतात. याबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. शेवटी मंगळवारी नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी एक आदेश काढून या खासगी ट्रॅव्हल्सना सकाळी आठ ते रात्री बारा या वेळात शहरात येण्यास मनाई केली. त्यामुळे नागरिकांमध्ये मात्र नाराजी निर्माण झाली. नागपुरातून पुणे, नाशिक, इकडे जबलपूर, तर इकडे हैदराबाद, अशा चारही बाजूंनी बसेस जात असतात. त्याशिवाय अमरावती, अकोला, जळगाव, गडचिरोली, यवतमाळ, शिंदवाडा, अशाही छोट्या अंतरावर बसेसचा प्रवास असतो. या खाजगी बसेसने दररोज हजारो प्रवासी येजा करीत असतात. मात्र त्यामुळे शहरात वाहतुकीला उपद्रव होतो हा मुद्दा नाकारता येत नाही. आता पोलीस आयुक्तांनी शहराच्या बाहेर या खाजगी बसेस ना वाहनतळ निर्माण करून देण्याची योजना आखली आहे. मात्र, चारही बाजूला कुठे असे वाहन तळ करणार याबाबत चर्चा सुरू आहे. लवकरात लवकर या प्रकरणात तोडगा निघावा अशी अपेक्षा ना

भटक्या कुत्र्यांच्या समस्येसाठी उच्च न्यायालयाची कडक पावले

दिल्लीतल्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पाऊल उचलले, तर नागपुरातील मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही कडक पावले उचलली आहेत. नागपुरात भटक्या कुत्र्यांचा प्रचंड उपद्रव आहे. दररोज किमान २६ नागरिकांना कुत्री चावतात, असे सर्वेक्षण एका वृत्तपत्राने दिले आहे. त्याशिवाय ही कुत्री मागे लागल्याने वाहनांचे अपघात होतात ते वेगळेच. या प्रकरणातील एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती अनिल किल्लोर आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांनी नागपूर महापालिकेला खडे बोल सुनावले होते. आता निश्चित योजना घेऊन समोर या आणि तिची अंमलबजावणी करा. अन्यथा आम्ही आयुक्तांपासून तर खालच्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना जबाबदार धरू आणि कारवाई करू अशी कडक तंबीच या खंडपीठाने महापालिका अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या त्रासाने त्रस्त झालेल्या नागरिकांनी मात्र सुटकेचा श्वास सोडला आहे.

- अविनाश पाठक

Comments
Add Comment

मराठवाड्यातील धरणात मुबलक पाणीसाठा

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, बीड व लातूर जिल्ह्यांत यंदा समाधानकारक

आरोग्य यंत्रणा सक्षम होणार का?

वार्तापत्र: उत्तर महाराष्ट्र  नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथे काही दिवसांपूर्वी बोगस डॉक्टरवर झालेली कारवाई ही

आत्महत्या रोखण्यासाठी जागरूकता गरजेची

वार्तापत्र: मध्य महाराष्ट्र देशात आत्महत्येचं प्रमाण दिवसागणिक वाढताना दिसत आहे. देशातच नाही तर जगभरात

कोल्हापूर सर्किट बेंच : न्याय आणि विकासाची नवी संधी

सर्किट बेंचसाठी चार न्यायमूर्तींच्या नेमणुका करण्यात आल्या असून एक डिव्हिजनल बेंच ज्यांच्याकडे रिट याचिका,

रायगड पालकमंत्र्यांची माळ

गेल्या आठ महिन्यांत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे होणार की शिवसेना

गडचिरोलीचा अपघात आणि हाणामारी

आज-काल महामार्गांवर किंवा मोठ्या रस्त्यांवर ट्रकसदृश वाहनांनी भरधाव गाड्या चालवणे आणि त्यात निरपराधांचे प्राण