
आठवड्यात सेन्सेक्स ७९७७२.४६ या निचांकी पातळीवर (All time Low) गेला होता तर सर्वाधिक सेन्सेक्स पातळी (All time High) ८०९९७.६७ होती. निफ्टीचा विचार केल्यास २४४६५.६५ या निचांकी पातळीवर गेला होता तर सर्वाधिक निफ्टी वाढ २४६३१ पातळीवर गेला होता. गुरूवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स ८०५९७.६५ व निफ्टी २४६३१.३० पातळीवर बंद झाला आहे. गुरूवारी शेअर बाजारात तिमाहीतील सापेक्षता बाळगल्याने निर्देशांकात वाढ झाली होती. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये चांगली वाढ झा ल्याने बाजाराला सपोर्ट लेवल मिळण्यास मदत झाली. संपूर्ण आठवड्यात सर्वाधिक परतावा कोणी दिला असेल तर तो कंज्यूमर ड्युरेबल्स व आयटी सेक्टरने गुंतवणूकदारांना दिला आहे. निर्देशांकातही गेल्या आठवड्यात सर्वाधिक वाढ आयटीत झाली होती. निर्दे शांकात विचार केल्यास कंज्यूमर ड्युरेबल्स समभगाने आठवडयाला ०.७५% उसळी मारली असून आयटीने आठवड्यात ०.४०% वाढ नोंदवली आहे.निफ्टीत आठवड्यात सर्वाधिक नुकसान झाले असेल तर ते मेटल समभागात झाले.प्रामुख्याने युएस राष्ट्राध्यक्ष डो नाल्ड ट्रम्प यांच्या मेटलवरील टॅरिफ ५०% नेल्याने त्याचा फटका या समभागात बसला. ट्रम्प यांनी आगामी काळात टप्प्याटप्प्याने २००% टॅरिफ मेटलवर लावण्याची धमकी दिल्याने त्याचा फटका मेटल उद्योगांना बसला होता. मीडियाची प्राईज टू इक्विटी १६७.३२ अंकावर या आठवड्यात पोहोचली आहे. तर सर्वाधिक डिव्हीवंड यील्ड (Dividend Yield) मिडिया (३.११%),ऑटो (१.१५%), तेल व गॅस (२.६२%),मिडस्मॉल आयटी आणि टेलिकॉम (१.०४%) बाजाराने दिला आहे.
बँक निर्देशांकातही चांगली कामगिरी नाही. गेल्या आठवड्यात बँक सेन्सेक्समध्ये ०.७०% वाढ नोंदवली गेली आहे तर महिन्यांचा विचार केल्यास ३.८१% घसरण झाली आहे. गुरूवारी सेन्सेक्स बँक निर्देशांक ६१६२५.३९ पातळीवर बंद झाले. बँक निफ्टीचा विचार केल्यास, बँक निफ्टीत गेल्या आठवड्यात ०.५८% वाढ झाली असून आठवड्यात ३.३४% घसरण झाली आहे. गुरूवारी बँक निफ्टी ५५३४१.८५ पातळीवर बंद झाला होता. त्यामुळे अस्थिरता २ ते ३% आठवड्यात काही प्रमाणात कोसळली असली तरी अधिक प्र माणात घसरला असला तरी त्याहून अधिक वेगाने २ ते ३% अस्थिरता पट्ट्यात उसळली आहे. मात्र बाजारातील वाढलेल्या घरगुती संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदाराची गळती समाधानकारकरित्या भरता आली आहे.
प्रोव्हिजनल आकडेवारीनुसार, गुरूवारी घरगुती संस्थात्मक गुंतवणूकदार (Domestic Institutional Investors DII) यांनी ३८९५.६८ कोटींची निव्वळ रोख खरेदी केली असून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (Foreign Institutional Investors FII) यां नी १९२७.७६ कोटींची निव्वळ रोख विक्री बाजारातून केली. दुसरीकडे युएस बाजार गुरूवारी सर्वोच्च पातळीवर कायम राहिला होता. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांची पुतीन यांच्याशी असलेली बैठक म्हणून गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगल्याने युएसच्या तीनपैकी दोन शेअर बाजार लाल रंगात बंद झाले. युएस बाजारातील कालच्या शेअर बाजार सत्राच्या अखेरीस डाऊ जोन्स (०.०७८%) वर बंद झाला असून एस अँड पी ५०० (०.२९%), व नासडाक (०.४०%) पातळीवर बंद झाला आहे.
शेअर बाजारातील आव्हाने -
१) ट्रम्प पुतीन यांची भेट - डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांची अलास्कामधील भेट ही सोमवारच्या बाजारासाठी महत्वपूर्ण ठरू शकते. ट्रम्प आणि पुतीन यांच्या बैठकीत कुठलाही रशिया युक्रेन विवाद व व्यापारी सौदैबाजीवर तोडगा निघाला नसला तरी सकारात्मक चर्चा झाली असल्याचे दोघांनी स्पष्ट केले आहे. यावर आता पुन्हा दोन्ही देशांकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहणे आवश्यक आहे. दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेस्की यांचे वक्तव्य आगामी काळात येऊ शकते. या बैठकीकडे भारताचे लक्ष होते. आगा मी काळात डोनाल्ड ट्रम्प यांचा रशियाबाबत दृष्टीकोन मृदू होऊ शकतो ज्याचा पुरेपूर फायदा भारत व चीन, भारत रशिया, रशिया - अमेरिका पातळीवर होईल का हे पाहणे बाजारात महत्वाचे असेल. विशेषतः मेटल, तेल व गॅस, कंज्यूमर ड्युरेबल्स,या शेअर्समध्ये प्रतिक्रिया व हालचाल बदल घडवू शकते.
२) डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धमक्या - सातत्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धमक्या येत असतात. भारतावर एकूण ५०% टॅरिफ लादल्यानंतर युरोपियन युनियनशी मात्र सौदेबाजी करत युकेवर केवळ १०% कर लावला आहे. असे असताना ट्रम्प यांनी चीनव रील अतिरिक्त कर अंमलबजावणी ९० दिवसांसाठी पुढे ढकलत चीनची खुशामत करण्याचा प्रयत्न केला. आता भारत व युएस यांच्यातील चर्चेला अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आगामी काळात पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात ट्रम्प व मोदी यांच्या त नवी समीकरणे कशी जुळतील यांचे संकेत गिफ्ट निफ्टीतून मिफेल परंतु आणखी म्हणजे सेमीकंडक्टर आयातीवर ३००% टॅरिफची नवी धमकी दिल्याने बाजारात आजही अस्थिरता कायम आहे.
३) युएसची नवी रिटेल सेल्स आकडेवारी - जुलैमध्ये अमेरिकेतील किरकोळ विक्रीत लक्षणीय वाढ झाली असल्याचे नव्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. असे असले तरी अपेक्षित वाढ न झाल्याने युएस बाजाराला त्याचा फटका काल बसला आहे. माहितीनुसार, मोटार वाहनांना असलेली मागणी आणि प्रमुख किरकोळ विक्रेत्यांकडून आक्रमक जाहिराती यामुळे ही वाढ झाली, जरी कमकुवत कामगार बाजारपेठ आणि महागाईच्या दबावामुळे येणाऱ्या महिन्यांत ग्राहकांच्या खर्चाबद्दल आशावाद कमी झाला असला तरी. १५ ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या वाणिज्य विभागाच्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये सुधारित ०.९ टक्के वाढीनंतर गेल्या महिन्यात किरकोळ विक्रीत ०.५ टक्के वाढ झाली. ऑटोमोबाईल्स वगळता, विक्रीत ०.३ टक्के वाढ झाली. वार्षिक आधारावर, विक्रीत ३.९ टक्के वाढ झाली. १३ प्रमुख श्रेणींपैकी नऊ श्रेणींमध्ये वाढ नोंदवण्यात आली, ज्यामध्ये ऑटो, ऑनलाइन शॉपिंग आणि सामान्य वस्तूंची दुकाने यांचा समावेश आहे. असे असताना अपेक्षित आकडेवारी जाहीर न झाल्याने एकीकडे फेडचे सदस्य फेडरल रिझर्व्ह व्याजदरा त कपात होईल अशी आशा बाळगत आहेत किंबहुना ते कमी होईलच या फाजील आत्मविश्वासाने युएस गुंतवणूक मोठ्या प्रमाणात गेल्या ४ दिवसात शेअर बाजारात सकारात्मकता दर्शवत आहे. वस्तुस्थितीत फेडरल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरो मी पॉवेल यांच्यावर कारवाईचे संकेत दिल्याने नवा गव्हर्नर काय निर्णय सप्टेंबर महिन्यात घेईल हे आजही गुलदस्त्यात आहे.
४) चीनची नवी रिटेल सेल्स आकडेवारी - चीननेही परवा आपली किरकोळ विक्री (Retail Sales) आकडेवारी जाहीर केली आहे ज्यात चीनला नुकसान झाल्याचे आकडेवारीनुसार स्पष्ट झाले.जुलैमध्ये चीनच्या कारखाना उत्पादन वाढीचा दर आठ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला, तर किरकोळ विक्रीत झपाट्याने घट झाली, ज्यामुळे देशांतर्गत मागणी पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि १९ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेला बाह्य धक्क्यांपासून वाचवण्यासाठी अधिक प्रोत्साहन योजना आणण्यासाठी चीन अंतर्गत च धोरणकर्त्यांवर दबाव वाढला आहे.गेल्या महिन्यात किरकोळ विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत ३.७% वाढली असे राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरोच्या आकडेवारीवरून काल दिसून आले आहे एका सर्वेक्षणात विश्लेषकांच्या ४.६% वाढीच्या अंदाजात ती झपाट्याने घटली आ णि जूनच्या ४.८% वाढीपेक्षा ती मंदावली. याचा लेवरेज चीन स्वतः घेईल का अमेरिकेशी समझोता करेल हे अस्पष्ट आहे.
५) Q1 कमजोर तिमाही निकाल - विश्लेषकांचा मते, तिमाही निकाल समाधानकारक लागले नाहीत. बँकिंग, ग्राहकोपयोगी वस्तू आणि भांडवली वस्तू यासारख्या क्षेत्रांमधील मंद कामगिरीमुळे जून तिमाहीत एकूण महसूल आणि नफ्याचा विस्तार अनेक तिमाहीं च्या नीचांकी पातळीवर पोहोचला. एका अहवालानुसार, ३,१९७ कंपन्यांच्या नमुन्यात (Sampling) मध्ये महसूल सात तिमाहींच्या नीचांकी ६.४% वर पोहोचला, तर ७.७% चा निव्वळ नफा वाढ किमान नऊ तिमाहींमधील सर्वात कमकुवत होता.सिमेंट,रसायने, बां धकाम, आतिथ्य आणि अल्कोहोलिक पेये या क्षेत्रातील दुहेरी अंकी नफ्याच्या वाढीमुळे ही खराब कामगिरी भरून निघाली आहेत.' बहुतांश कंपनीच्या तिमाहीतील कमजोर कामगिरीचा फटका गुंतवणूकदारांना बाजारात बसला. एकूण अस्थिर परिस्थिती,टॅरिफ म धील अस्तिवात, भूराजकीय कारणे व इतर क्षेत्रीय विशेष दबावाचा फटका कंपन्यांना बसला आहे. अशातच काळजीपूर्वक गुंतवणूक करणे व योग्य वेळी खरेदी विक्री करून परतावा मिळवणे गुंतवणूकदारांसाठी सर्वात महत्वाचे असेल. झटपट नफा मिळवण्यासा ठी कुठल्या शेअरमधून कधी बाहेर यावे अथवा दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी कुठले शेअर घ्यावे हा वैयक्तिक पसंतीचा विषय असू शकतो मात्र नफा बुकिंग करुन ठेवल्यास गुंतवणूकदारांना एक लेवरेज मिळू शकेल.
६) कमोडिटी बाजार - जगभरातील भूराजकीय संकटामुळे स्पॉट बाजारात अस्थिरता आहे. दिवसभरात कच्चे तेल (Crude Oil), सोने चांदी यांच्यातील चढ उतार अतिवेगाने सुरु असल्याने स्पॉट बाजारात सातत्याने टोकाची मागणी कमी अथवा टोकाचा पुरवठा वाढत आहे परिणामी गुंतवणूकदारांना स्थैर्य नाही. दुसरीकडे डॉलर निर्देशांकात (DXY Index) मधील घसरणीमुळे सोन्याला आधारभूत स्तर निश्चित नाही. कधी मोठी रॅली कधी घसरण या भूमिकेतून सोने चांदी मार्गक्रमण करत आहेत.
७) घसरणारा रूपया - डॉलर घसरणीपेक्षा अधिक वेगाने रूपयात घसरण सुरू असल्याने भारतात सोन्याच्या व चांदीच्या किंमती जागतिक पातळीपेक्षाही वाढत अथवा उतरत आहे जे धोक्याचे लक्षण आहे. गेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलनाच्या सा ठ्यातही रूपयांचा घसरणीमुळे आणखी घसरण झाली.१ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलन साठ्यात (फॉरेक्स) मोठी घट झाली आहे, ती ९.३२ अब्ज डॉलर्सने घसरून ६८८.८७१ अब्ज डॉलर्सवर आली आहे, असे रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीवरून दिसून आले आहे. जून महिन्यात पतधोरण बैठकीत,आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले की परकीय चलन साठा देशाच्या ११ महिन्यांच्या आयातीपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसा आहे. त्यामुळे या आठवड्यातील मोठ्या घ सरणीनंतरही परकीय चलन साठा (Forex) सप्टेंबर २०२४ मध्ये ७०४.८९ अब्ज डॉलर्सच्या त्याच्या सर्वकालीन उच्चांकाच्या जवळ आहे. ताज्या आरबीआयच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की परकीय चलन साठ्याचा सर्वात मोठा घटक असलेला भार ताचा परकीय चलन मालमत्ता (एफसीए) ५८१.६०७ अब्ज डॉलर्सवर कायम आहे.
एकीकडे अस्थिरता दुसरीकडे भारतीय सक्षम अर्थव्यवस्था कायम- जगभरातील प्रसिद्ध रेटिंग एजन्सी एस अँड पी ग्लोबलने (S &P Global 500) भारताचे सार्वभौम क्रेडिट रेटिंग BBB- वरून BBB वर आणत भारताला बढत दिली आहे. त्यामुळे भारताचे संस्थे ने दिलेल्या क्रेडिट रेटिंग (Credit Rating) प्रमाणे A3 वरून A2 वरही पोहोचले आहे. याशिवाय आपल्या अभ्यासात (Assesment) मध्ये एस अँड पी ग्लोबलने भारताचे रेटिंग A- वरून BBB केल्याने भा रताची अर्थव्यवस्था सुस्थितीत व सक्षम असल्याचे यातून स्पष्ट झाले होते. एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जने गुरुवारी भारताचे दीर्घकालीन सार्वभौम क्रेडिट रेटिंग 'BBB-' वरून 'BBB' केले जे १८ वर्षांतील पहिले अपग्रेड आहे.एस पी ग्लोबलने याबाबत कारण स्पष्ट करताना म्हटले की मजबूत आर्थिक वाढ, सुधारित च लनवि षयक धोरण विश्वासार्हता आणि शाश्वत राजकोषीय एकत्रीकरण यांचा समावेश आहे. त्यामुळे जगभरातील गुंतवणूकीसाठी भारताची प्रतिमा उंचावली आहे. त्यामुळे सोमवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार गुंतवणूकीत वाढ करतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. घरगुती गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक टिकवल्यास सोमवारी रॅलीची शक्यता वर्तवली जात आहे.
तज्ज्ञांचे मत व गुंतवणूकदारांसाठी सल्ला काय?
१) अजित भिडे प्रसिद्ध ज्येष्ठ बाजार विश्लेषक- 'अखेर रशिया अमेरीकेची बैठक झाली. कोणत्याही विषयावर आजतरी सहमती झालेली दिसत नाही. परंतु पुढील बैठक मॉस्को येथे होणार असुन कदाचित त्यात निर्णय होऊ शकतील. कदाचित त्या मिटींगमध्ये झेलेन्स्की ही असतील. आज कमीतकमी शांततेत चर्चा करण्यात एक चांगली सुरूवात म्हणावी लागेल.युद्ध बंदी किंवा टॅरिफची ढिलाई वगैरे पर्यंत आज पोहोचलेले दिसत नाहीत.मुख्य प्रश्न दोन देशाच्या भांडणात अमेरीका आपल्या पदरात काय पडते आहे.आणि रशिया किती द्यायला तयार आहे.यावर का फक्त शांततेत नोबेल ट्रम्प ना देउन युद्ध थांबणार हे पहाण महत्त्वपूर्ण आहे. थोडक्यात आज परिस्थितीत कोणताही फरक पडलेला नाही. टॅरिफ मंजुरीवर काहीच फरक पडलेला दिसत नाहीये. भारतासाठी एक बैठक लावून दिली होती व पुढे मॉस्कोमध्ये बैठक आहे.पुढील २७ तारखेपासून चे +२५% टॅरिफ थांबणार असं दिसत आहे.भारताचा सहभाग बैठक लावण्यात पुर्ण झाला आहे. इकडे जागतिक पातळीवर एस एंड पी या मानांकन करणारी कंपनीने भारताचे मानांकन वा ढवत पत वाढवली आहे. तसेच अमेरिकन टॅरिफचा परीणाम नगण्य असेल. असा शेरा दिला आहे. आता या सर्वांचा विदेशी गुंतवणूकदारांवर काय परीणाम होईल हे पहाणे महत्त्वपूर्ण असेल.जर पुढील काही काळात त्यांनी विक्री थांबवली तरी बाजार स्थिर राहील अशी आशा करू शकतो.ऑगस्ट पासून सुरू झालेले टॅरिफचे नेमके परिणाम आपल्याला जानेवारीत आगामी रिझल्टमध्ये व्यवस्थित दिसतील. रशिया अमेरिकेच्या बैठकीमुळे ट्रम्प महाशय शांतीचे पुरस्कर्ते असल्याचा दावा करण्यात व नोबेल वर दावा मजबूत करत आहेत. पुढील बैठकीत निर्णय होईल अशी आशा करण्यास हरकत नाही.'
२) डॉ वी के विजयाकुमार मुख्य गुंतवणूक रणनितीकार जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेड- गेल्या सहा आठवड्यांत भारत बहुतेक बाजारांपेक्षा कमी कामगिरी करत आहे. म्युच्युअल फंडांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात घरगुती गुंतव णूकदार (DII) खरेदी झा ली असूनही ही कामगिरी कमी आहे. ऑगस्टमध्ये १ ते १४ तारखेपर्यंत, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) ने एक्सचेंजेसमधून २४१९० कोटी रुपयांना इक्विटी विकल्या आहेत. ५५७९० कोटी रुपयांच्या घरगुती गुंतवणूकदार (D II) ख रे दीमुळे हे परदेशी संस्था त्मक गुंतवणूकदार (FII) विक्री पूर्णपणे मागे पडली आहे. तरीही निफ्टी २४७६८ वरून २४६३१ पर्यंत खाली आला आहे.का? ट्रम्पच्या कठोर शुल्कांमुळे आणि अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंधांमधील ताणामुळे बाजाराच्या भावनांवर परिणाम झाला आहे आणि परिणामी, शॉर्ट्स वाढले आहेत ज्यामुळे बाजार खाली आला आहे. आर्थिक वर्ष २६ साठी मंदावलेली कमाईची वाढ, वाढलेले मूल्यांकन आणि ८ ते १०% कमाईच्या वाढीचा माफक अंदाज यामुळे अस्वलांना शॉर्ट पोझिशन्स वा ढवण्याचे प्रोत्साहन मिळाले आहे, ज्यामुळे बाजारावर परिणाम झाला आहे. आयटी स्टॉकमध्ये सतत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) विक्रीमुळे आयटी निर्देशांक खाली आला आहे.
योग्य मूल्यांकन आणि संस्थात्मक खरेदीमुळे बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रे तुलनेने लवचिक आहेत. जाणे पुढे, शुल्काच्या आघाडीवरील कारवाईचा FII क्रियाकलापांवर परिणाम होईल. अमेरिका आणि रशियामधील तणाव कमी झाल्याच्या आणि रशियावर पुढील नि र्बंध न लावल्याच्या ताज्या बातम्यांवरून असे दिसून येते की भारतावर लादलेला २५% चा दुय्यम शुल्क २७ ऑगस्टनंतर लागू होण्याची शक्यता कमी आहे. हे एक सकारात्मक आहे. FII च्या वर्तनावर प्रभाव टाकणारा आणखी एक सकारात्मक घटक म्हणजे रेटिंग एजन्सी S&P ने भारताचे क्रेडिट रेटिंग BBB- वरून BBB केले आहे.'
३) मार्केट आऊटलूक (Technical Advice)- चॉईस इक्विटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड तांत्रिक व डेरिएटिव विश्लेषक अमृता शिंदे - भारतीय शेअर बाजार १४ ऑगस्ट २०२५ रोजी मंदावलेल्या व्यापार सत्रानंतर स्थिर राहिले. सेन्सेक्स ५७.७५ अंकांनी किंवा ०.०७% ने वाढून ८०,५९७.६६ वर बंद झाला, तर निफ्टी ११.९५ अंकांनी किंवा ०.०५% ने वाढून २४६३१.३० पातळीवर स्थिरावला. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.२% ने घसरला आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.६% ने घसरला होता.निफ्टी सपाट उघडला आणि दिवस भर रेंजबाउंड राहिला, ज्यामुळे बाजारातील सहभागींमध्ये अनिर्णय दिसून येतो. तांत्रिकदृष्ट्या, २४७५० पातळीवरील निर्णायक हालचाल २४८५० पातळीच्या दिशेने वाढीचा मार्ग मोकळा करू शकते, तर तात्काळ आधार (Immediate Support) २४५०० आणि २४३३० पातळीवर आहे.दोन्ही नवीन दीर्घ पोझिशन्ससाठी आकर्षक पातळी मानली जातात. क्षेत्रानुसार, धातू आणि तेल आणि वायू प्रत्येकी १% घसरले, रिअल्टी आणि एफएमसीजी प्रत्येकी ०.५% खाली आले, तर ग्राहकोपयोगी वस्तू आणि आयटी प्रत्येकी ०.५% वाढले. त्याचप्रमाणे, बँक निफ्टी सपाट उघडला आणि संपूर्ण सत्रात ५५०००-५५५०० पातळीच्या अरुंद श्रेणीत व्यवहार करत होता. या श्रेणीतून ब्रेकआउट, मजबूत किंमत कृतीमुळे, पुढील दिशात्मक हालचाल निश्चित करण्याची शक्यता आहे. प्रमुख आधा र ५५००० आणि ५४९०० पातळीवर ठेवले आहेत, तर ५५६७०-५६००० झोनमध्ये प्रतिकार दिसून येतो. या प्रतिकार श्रेणीच्या वर एक खात्रीशीर ब्रेकआउट मानसिक ५६२०० पातळीच्या चिन्हाकडे रॅलीला चालना देऊ शकतो. बाजारातील अस्थिरतेचे प्रमुख मापक असलेला इंडिया VIX १.७७% वाढून १२.३५ वर पोहोचला, जो वाढलेली अनिश्चितता आणि कमकुवत गुंतवणूकदारांच्या भावना दर्शवितो. डेरिव्हेटिव्ह्ज विभागात, २४७०० स्ट्राइकवर सर्वोच्च कॉल ओपन इंटरेस्ट नोंदवला गेला, तर २४६०० स्ट्राइकवर सर्वोच्च पुट ओपन इंटरेस्ट केंद्रित होता. या सेटअपवरून असे सूचित होते की प्रतिकार २४,७०० च्या जवळ राहतो. तथापि, व्यापारी तेजीची गती राखण्यासाठी या पातळीपेक्षा सतत बंद राहणे आवश्यक असल्याने, संभाव्य वाढीकडे लक्ष आहे.'
४) रिअल इस्टेट व वित्तीय आऊटलूक - कमल शाह भागीदार, पल्लाडियन पाटनर्स अँडव्हायझरी लिमिटेड - भारतीय स्थापत्य क्षेत्राला धोरणात्मक दुहेरी चालना, रिझर्व्ह दर स्थिर ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे, लोकशाही पर्यावरणीय देताना भारतीय मोठा अडथळा दूर झाला आहे-मुंबई आणि शेकडो विलंबाने गृहनिर्माण उघडलेले आहेत.
आरबीआयकडून रेपो रेट ५.५०% स्वामित्व अधिकार - ६ ऑगस्ट रोजी नुकत्याच अहवाल मौद्रिक (Monetary) धोरणाच्या निर्णया अंतर्गत आरबीने रेपो दर ५.५० % वर कायम ठेवला आणि तटस्थ भूमिका (Neutral Stance) घेतली. किरकोळ चलन वाढ जूनमध्ये २.१% सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर आली असली तरीही अस्थिर वस्तूंच्या किमती व सावधगिरीचे कारण म्हणून केंद्रीय बँकेने जागतिक अस्थिरतेचा हवाला दिला. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी भारताचा जीडीपी विकास अंदाजे ६.५% आहे, आरबीआ यने पूर्वीच्या १०० बेसिस पॉईंटच्या दर कपातच्या परिणामास परवानगी दिली आहे. स्थावर मालमत्तेसाठी, या विरामाचा कर्जाचा खर्च स्थिर राहतो, पक्ष विकासक आणि घर खरेदीदारांना आरामदायी वर्षाचा असा विश्वास आहे.'
५००० जुने नियम हटवले जाणार- समांतर सुधारणांमध्ये आरबीआयने नवीन ३० सदस्यांच्या पुनरावलोकने बलिदान प्रमुख नियामक स्वच्छता (Regulartorly Cleaning) सुरू केली आहे. या कोर्सला सुमारे ८००० वरून सुमारे ५००० कालबाह्य सूत्रांचे नियम छाटणीचे काम सध्याचे सोपवण्यात आले आहे.सुमारे ३०० नियमांच्या चौकटीत हे एकत्रित केले जातील.उद्योग निरीक्षकांना असे वाटते की या सुसूत्रीकरणामुळे अनुपालनाची गुंतागुंत (Regulatory Complexity Compliance) कमी होईल, निधीसाठी मंजुरीचा वेग वाढेल आणि पारदर्शकता सुधारेल-पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण प्रकल्पांसाठी सुलभ वित्तपुरवठा सक्षम होईल.
सर्वोच्च न्यायालयाची पर्यावरणीय पेचप्रसंगाला मंजुरी - राज्यस्तरीय पर्यावरण प्राधिकरणे (एस. ई. आय. ए. ए./एस. ई. ए. सी.) २०००० ते १५०००० चौरस मीटर दरम्यानच्या प्रकल्पांना मंजुरी देऊ शकतात या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मालमत्ता बाजा राला सर्वात मोठा त्वरित दिलासा मिळाला. यामुळे केंद्रीय मंत्रालयाच्या (एम. ओ. ई. एफ. सी. सी.) मंजुरीची पूर्वीची आवश्यकता दूर होते, ज्यामुळे अनेक घडामोडींना विलंब झाला होता. या निर्णयामुळे मुंबई आणि पुण्यात रखडलेल्या ४९३ प्रकल्पांचे पुनरुज्जीवन होण्याची अपेक्षा आहे, ज्याचे ७०००० हून अधिक गृहनिर्माण युनिट्समध्ये रूपांतर होईल. विकासकांना अशी अपेक्षा आहे की यापैकी अनेक प्रकल्प (Sites) काम काही महिन्यांत पुन्हा सुरू होऊ शकते, ज्यामुळे संभाव्यतः बाजारात नवीन पुरवठा होऊ शकतो.
घर निर्माण भावनेला दुहेरी चालना - नियामक स्पष्टता आणि आर्थिक स्थिरता एकत्रितपणे, सणासुदीच्या पूर्वीच्या खरेदीदारांचा आत्मविश्वास सुधारेल अशी विश्लेषकांची अपेक्षा आहे. नवीन लॉच होण्याची शक्यता असताना, काही बाजार तज्ञांनी असा सल्ला दि ला आहे की नतनीकरण (Redevelopment) केलेल्या मागणीमुळे काही नूतनीकरण केलेल्या मागणीमुळे काही सूक्ष्म बाजारपेठेत किंमती ७ ते ८ % पर्यंत वाढू शकते. सध्या, आरबीआयची स्थिरता आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णायक हे धोरण आणि न्यायालयी न अंमलाच्या दुर्मिळ संरेखना (Structure ) सूचित करतात, ज्यामुळे भारतातील सर्वात सक्रिय शहरी केंद्रांमध्ये स्थावर मालमत्ता (Fixed Asset) पुनर्जीवन मंच तयार करतो.' त्यामुळे सोमवारच्या बाजारात सुरवातीच्या सत्रात किमान अथवा किरकोळ रॅली अपे क्षित असली तरी मिड स्मॉल कॅप मधील तेजीवर पुढील गोष्टी अवलंबून असतील. दरम्यान तिमाही निकालाचाही शेअर बाजारात परिणाम अपेक्षित असला तरी एस अँड पी ग्लोबलने दिलेल्या रेटिंगमध्ये भारतीय गुंतवणूकदारांचे मनोबल वाढले आहे.
त्यामुळे सोमवारच्या बाजारात सुरवातीच्या सत्रात किमान अथवा किरकोळ रॅली अपेक्षित असली तरी मिड स्मॉल कॅप मधील तेजीवर पुढील गोष्टी अवलंबून असतील. दरम्यान तिमाही निकालाचाही शेअर बाजारात परिणाम अपेक्षित असला तरी एस अँड पी ग्लोब लने दिलेल्या रेटिंगमध्ये भारतीय गुंतवणूकदारांचे मनोबल वाढले आहे.