
मुंबई शहर भागात १८ गोविंदा जखमी झाले. यापैकी १२ जणांवर उपचार सुरू आहेत आणि सहा जणांना उपचार करुन घरी पाठवले आहेत. मुंबई पूर्व उपनगर भागात ६ गोविंदा जखमी झाले. यापैकी ३ जणांवर उपचार सुरू आहेत तर तीन जणांना उपचार करुन घरी पाठवले आहे. मुंबई पश्चिम उपनगर भागात ६ गोविंदा जखमी झाले. यापैकी एकावर उपचार सुरू आहेत आणि पाच जणांना उपचार करुन घरी पाठवले आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, दहीहंडी दरम्यान मुंबईत एकाचा मृत्यू झाला आणि दुपारी तीन वाजेपर्यंत ३० जण जखमी झाले. जखमींपैकी १६ जणांवर उपचार सुरू आहेत तर १४ जणांना उपचार करुन घरी पाठवले आहे.
ठाणे जिल्ह्यात आदित्य रघुनाथ वर्मा या गोविंदाला डोक्याला दुखापत झाल्यामुळे तर कृष्णा मिठू स्वयन याला उजव्या हाताला दुखापत झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल केले आहे. समर बन्सीलाल राजभर यालाही डोक्याला दुखापत झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल केले आहे.