
यामुळे आता नागरिकांना पोलिसांकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आला आहे.सध्या मुंबईमध्ये सुरू असलेला पाऊस व हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याच्या अनुषंगाने नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर जाणे टाळावे. तसेच समुद्रकिनारी व सखल भागात जाणे टाळा, असा थेट इशाना मुंबई पोलिसांकडून देण्यात आलाय.या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त, उपायुक्त, सर्व प्रशासकीय विभागाचे (वॉर्ड) सहायक आयुक्त, तसेच संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्या संबंधित कार्यालयात तत्काळ हजर राहून समन्वय साधावा.
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास 100 / 112 / 103 डायल करा, असे मुंबई पोलिसांकडून जारी करण्यात आलं. मुंबईतील पावसाचा परिणाम मुंबई लोकलवर झाल्याचे बघायला मिळतंय.पावसाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालाय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या गाड्या 15 मिनिट उशिराने धावत आहेत.
किंग सर्कल परिसरात पाणी असून अनेक वाहने यामुळे रस्त्यावरच बंद पडली आहेत. हार्बर मार्गावरील रेल्वे ट्रॅकवर देखील पाणी साचले आहे. काल रात्रभर पडलेल्या पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचले असल्याचे चित्र सध्या बघायला मिळतंय.चेंबूर ते कुर्ला दरम्यान च्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे ट्रेन थांबत थांबत जात आहेत. हार्बर मार्गावरील वाहतूक ही 15 मिनिटाने उशिरा ने सुरू आहे.सायन स्थानकातील रेल्वे रुळालगत पाणी साचल्याने घाटकोपरच्या पुढे रेल्वे वाहतूक संतगतीने सुरू आहे.
हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक सध्या संथ गतीने सुरू आहे. चुनाभट्टी रेल्वे स्थानकामधील रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याच दृश्य पाहायला मिळत आहे. पुढील 24 तास पावसाची अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.