मोठी बातमी - जीएसटी दर कपातीसाठी सरकार अँक्शन मोडवर केंद्रीय मंत्र्यांना प्रस्ताव सादर

  55

प्रतिनिधी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून डबल गिफ्ट ाछा वास्तवात मिळणार आहे ‌ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून केलेल्या धमाकेदार भाषणानंतर केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात जीएसटी कपात करण्याचे ठरवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीत आमूलाग्र बदलच नाही तर करात भरपूर कपात करणार असल्याचे काल भाषणात नमूद केले होते. त्यानंतर केवळ दोन टॅक्स स्लॅब ठेवण्यात येणार आहेत. याच धर्तीवर आता मिळालेल्या माहितीनुसार, आणि केंद्र सरकारने अप्रत्यक्ष जीएसटी कर कपात करण्याचा प्रस्ताव विद्यमान केंद्रीय मंत्र्यांना दिलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आग्रहाखातर सरकार अप्रत्यक्ष करात दरकपात करू शकते हे आता स्पष्ट झाले आहे. करात केवळ ५% व १८% हे दोनच टॅक्स स्लॅब असतील. अशातच आपण दैनंदिन जीवनात अतिरिक्त अव्वाच्या सव्वा कर भरतो त्याला दराला आता तिलांजली मिळण्याची शक्यता आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात घोषणा केली होती की जीएसटीमधील पुढील पिढीतील सुधारणा दिवाळीपर्यंत जाहीर केल्या जातील, ज्यामुळे सा मान्य माणसाला 'भरीव' कर सवलत मिळेल आणि लघु आणि मध्यम उद्योगांना फायदा होऊ शकतो. २०१७ नंतर दुसऱ्यांदाच सर्वात मोठा बदल कर प्रणालीत होणार आहे ज्यामध्ये सर्वसामान्यांचे आयुष्य सुखकर होईल. गुरूवारी याविषयी मंत्रिमंडळाच्या बैठकी त जीएसटीवर चर्चा झाली होती

सध्या भारतात पाच करांचे स्लॅब भरतो. ज्यामध्ये ०%,५%,१२%,१८%,२८% या पातळीचा समावेश आहे.आतापर्यंत केवळ गरजेच्या अत्यावश्यक वस्तू व सेवेवर ५% जीएसटी असून इतर कर टप्प्यात कमी महत्वाच्या ते लक्झरी प्रकारातील वस्तू येतात.यातील क्लि ष्टता व अतिरिक्त करातून जनसामान्यांची मुक्ती करण्याचें संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या भाषणात दिले होते. त्याचाच उत्तरार्ध म्हणून अप्रत्यक्ष करप्रणालीत २०१७ नंतर पहिल्यांदाच मोठे फेरबदल अपेक्षित आहे. सध्या हा प्रस्ताव विचाराधीन असू न यावर कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र सिन टॅक्स मात्र ४०% वर कायम राहणार आहे.सिन टॅक्स (Sin Tax) मध्ये तंबाखू, गुटखा, पानमसाला, मद्य, सिगारेट अशा वस्तूंचा समावेश होतो. त्यावरील करात सूट मिळणार नसून इतर वस्तूंमध्ये सर्व सामा न्यां ना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या १२% मधील ९९% उत्पादने १२% करातून ब्रॅकेटमध्ये येऊ शकतात. तसेच २८% ब्रॅकेटमधील उत्पादने १८% करात स्थलांतरित होऊ शकतात. यासंबंधीची अधिकृत नोटीस सरकारने जाहीर केली नसली तरी यावर सर कार नियमनात बदल करण्यासाठी त्यावर काम करत आहे.

२८% करातून सरकारचे २/३ महसूल मिळतो. तर एकूण जीएसटी संकलनातून ११% वाटा हा २८% ब्रॅकेट वस्तूंचा आहे. माहितीनुसार, राज्य सरकारलाही नव्या कररचनेचा फायदा होणार आहे. राज्य सरकारने आपले कर्ज फेडल्यास राज्य सरकार सेस भरण्यापा सून मुक्त होणार आहे. विमा क्षेत्रातील जीएटीही कमी होऊ शकतो. सध्याच्या १८% ब्रॅकेटमधून ५% अथवा ०% जीएसटी आकारला जाऊ शकतो अशी चर्चा आहे. गेमिंग वस्तू व सेवांना मात्र फटका बसू शकतो. नव्या आकारणीनुसार, गेमिंगवर सरकार ४०% पर्यं त जीएसटी कर आकारू शकते.१ जुलै २०१७ पासून लागू झालेल्या सध्याच्या जीएसटी रचनेनुसार, एकूण कर संकलनात १८% स्लॅबचा वाटा सर्वात मोठा, म्हणजेच ६५% आहे. वरच्या २८% कर वर्गाचा जीएसटी महसुलात ११% वाटा आहे, १२% स्लॅब सुमारे ५% आहे आणि अत्यावश्यक वस्तूंवर सर्वात कमी ५% दर सुमारे ७% आहे. तसेच उच्च कामगार-केंद्रित आणि निर्यात-केंद्रित क्षेत्र म्हणजे हिरे आणि मौल्यवान दगडांवर सध्याच्या दरांवर कर आकारला जाईल, असे सूत्रांनी म्हटले आहे.शिवाय सरकारला अपेक्षा आहे की जीएसटी सुधारणांमुळे उपभोगाला (Consumption) मोठी चालना मिळेल, ज्यामुळे दर सुसूत्रीकरणामुळे होणारे उत्पन्नाचे नुकसान भरून निघेल अशी अपेक्षा सरकारला आहे.
Comments
Add Comment

निवडणूक आयोगाची उद्या दिल्लीत पत्रकार परिषद, नेमकी कशासाठी?

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोग उद्या, रविवारी (१७ ऑगस्ट) दुपारी ३ वाजता नॅशनल मिडिया सेंटर नवी दिल्ली येथे

राज्यात पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा!

राज्यात १६ ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता मुंबई: भारतीय हवामान विभागाने

'प्रहार' Exclusive: शेअर बाजारात 'धोके' दुसरीकडे 'मजबूत' अर्थव्यवस्था गुंतवणूकदारांसाठी 'हा' सल्ला गेल्या आठवड्यात असा होता बाजार !

मोहित सोमण: मागील संपूर्ण आठवडा शेअर बाजारासाठी खडतर होता. सेन्सेक्स व निफ्टीत चांगले संकेत नाहीत. जागतिक

दहीहंडीला लागले गालबोट, आतापर्यंत झाले एवढे मृत्यू

मुंबई : दहीहंडी उत्साहात साजरी होत असताना मुंबईत एक दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे दहीहंडी उत्सवालाच गालबोट

Gautami Patil : काळी साडी, झटकेदार स्टेप्स आणि थरारक फ्लायिंग किस, गौतमी पाटीलने वाढवला उत्साहाचा तापमान

मुंबई : मुंबईच्या मागाठाणे येथे पारंपरिक दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. (Gautami patil dance

'शिंदेंना लॉटरी लागली, मुख्यमंत्री झाले, पण टिकवता आली... मंत्री गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचा वाद हा काही राज्याला नवा नाही. मंत्री गणेश नाईक