
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये बजावली चांगली कामगिरी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने जेव्हा अग्निपथ योजना सुरू केली, तेव्हा त्याला जोरदार विरोध करण्यात आला. ही योजना तरुणांसोबत भेदभाव करणारी असल्याचा आरोप करत विरोधकांनी ही योजना मागे घेण्याची मागणी केली. आमी, नौदल व हवाई दल अग्निपथ योजनेचा आढावा घेत असून सशस्त्र दलांमध्ये अग्निवीरांची संख्या वाढवण्यात येणार आहे.
भारतीय लष्करामध्ये जास्तीत जास्त तरुणांनी सामील होण्यासाठी तसेच त्यांना लष्करात दाखल होण्याची संधी मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारने अग्निपथ योजना सुरू केली. या योजनेंतर्गत ज्या तरुणांची निवड होते त्यांना अग्निवीर म्हटले जाते. अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरांची सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये ४ वर्षांसाठी भरती करण्यात येते. त्यांची ४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर, जास्तीत जास्त २५ टक्के अग्निवीरांना सैन्यात कायम ठेवण्यात येते.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान अग्निवीरांनी केलेली कामगिरी उत्कृष्ट असल्याचे आढळून आले आहे. अग्निवीरांची पहिली तुकडी २०२६ च्या अखेरीस तयार होणार आहे. इन्फट्री दलांमध्ये अग्निवीरांची संख्या ७० ते ७५ टक्के, हवाई संरक्षण, सिग्नल, अभियंते आदी ८० टक्के व स्पेशल फोर्सेसमध्ये अग्निवीरांची संख्या १०० टक्क्यांपर्यंत वाढविण्यावर चर्चा सुरू आहे.