सिनेमाचा निर्मिती खर्च ४०० कोटी, पहिल्या दिवशीची कमाई ५० कोटी, पण दुसऱ्या दिवशी सगळ्यावर पडलं पाणी

मुंबई : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत याचा कुली सिनेमा १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमाचा एकूण निर्मिती खर्च ४०० कोटी रुपयांच्या घरात गेला आहे. या बिग बजेट सिनेमाने पहिल्याच दिवशी ५० कोटी रुपयांची कमाई केली. यामुळे सिनेमा सुपरडुपर हिंट होणार अशी चर्चा सुरू झाली. पण दुसऱ्या दिवशी धक्कादायक घटना घडली.

अनेक टेलिग्राम चॅनलवर आणि ग्रुपमध्ये रजनीकांतच्या कुली सिनेमाच्या विविध भाषांतील पायरेटेड कॉपी उपलब्ध झाल्या. सिनेमाची हाय आणि लो रिझोल्युशनची कॉपी टोरंट वेबसाइट्सवर लीक झाली. या पायरसीचा सिनेमाच्या कमाईवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. निर्मात्यांनी पायरसी झाल्याचे लक्षात येताच तातडीने पोलिसांची आणि सायबर तज्ज्ञांची दत घेतल्याचे वृत्त आहे. पण सर्व पायरेटेड कॉपी ब्लॉक होण्यास लागणारा वेळ बघता सिनेमाच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

पायरसीला आळा घालण्यासाठी सरकारी पातळीवर अनेक कठोर उपाय केले जात आहेत. हे केले तरी पायरसी आजही सुरू आहे. तमिलरॉकर्स, फिल्मीझिला, मूव्हीरुल्स आणि मूव्हीजादा सारख्या अनेक पोर्टलवर पायरटेड स्वरुपात रजनीकांतच्या कुली सिनेमाची आवृत्ती उपलब्ध आहे.

भारतात पायरेटेड सिनेमा डाऊनलोड करुन बघणे अथवा दाखवणे हा गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंत दंड आणि तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. ही कठोर तरतूद असली तरी आजही अनेक चित्रपटांची पायरसी होत आहे. या पायरसीला आळा घालण्यासाठी आजही प्रयत्न सुरू आहेत.
Comments
Add Comment

‘व्ही. शांताराम’ यांचे जीवन मेगा बायोपिकच्या रूपात

भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान आणि नवी सौंदर्यभाषा देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे

महिला दिनी उलगडणार ‘तिघीं’च्या आयुष्यातलं ‘चौथं पान’!

सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा हृदयस्पर्शी आणि नात्यांच्या उबदार धाग्यांनी

अलविदा ही मॅन

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. वयाशी संबंधित आजारांमुळे काही दिवसांपासून ते

‘द केरळ स्टोरी’ फेम अदाला मोठा धक्का; लाडक्या आजीचे निधन, महिनाभर सुरू होते उपचार

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री अदा शर्मा सध्या वैयक्तिक आयुष्यात मोठ्या दुःखातून जात आहे. ‘द केरळ स्टोरी’मुळे

रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ चित्रपट चर्चेत; रणवीर, माधवन, रामपाल कोणाची भूमिका साकारतायत?

मुंबई : बॉलिवूडचा ऊर्जावान अभिनेता रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट रिलिजच्या प्रतिक्षेत असून,

चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई : अयोध्येचा राजा, माणूस, कुंकू, झनक झनक पायल बाजे, डॉ. कोटनीस की अमर कहानी, दो आँखे बारा हाथ, नवरंग, पिंजरा’