व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवर रशियाची बंदी

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांचे आदेश


मॉस्को : गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रशियन अधिकाऱ्यांनी टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप या मेसेजिंग ॲप्सवरील कॉलवर अंशत: बंदी घालण्याची घोषणा केली आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रशियन अधिकाऱ्यांनी ही बंदी घालण्याची मोठी घोषणा केली. सरकारी मीडिया आणि इंटरनेट नियामक रोस्कोम्नाडझोर यांनी नुकत्याच एका निवेदनात इंटरनेटवरील नियंत्रण अधिक कडक करण्याच्या प्रयत्नातील हे ताजे पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


रशियन अधिकाऱ्यांनी टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप या मेसेजिंग ॲप्सवरील कॉलवर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अंशत: निर्बंध घालण्याची घोषणा केली.
त्यांचा वापर फसवणूक आणि खंडणीसाठी केला जात आहे. फसवणूक आणि खंडणीसाठी रशियन नागरिकांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी याचा वापर केला जातो, असे सांगून त्यांनी या उपाययोजना आवश्यक असल्याचे सांगितले.


सरकारी मीडिया आणि इंटरनेट नियामक रोस्कोम्नाडझोर यांनी एका निवेदनात इंटरनेटवरील नियंत्रण अधिक कडक करण्याच्या प्रयत्नातील हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले आहे. रशियन अधिकाऱ्यांनी इंटरनेटला लगाम घालण्यासाठी अनेक दिवसांपासून हे प्रयत्न केले आहेत. रशियन अधिकारी परदेशी संकेतस्थळांवर लक्ष ठेवून आहे. गेल्या काही वर्षांत, त्यांनी प्रतिबंधात्मक कायदे केले आहे आणि त्यांचे अनुसरण न करणाऱ्या वेबसाइट्स आणि प्लॅटफॉर्म ब्लॉक केले आहे. ऑनलाइन ट्रॅफिकवर लक्ष ठेवण्यासाठी हे तंत्रज्ञान अधिक प्रगत करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

मिठी मारण्याचा बिझनेस! फक्त ५ मिनिटांसाठी ६०० रुपये!

चीनच्या मोठ्या शहरांमध्ये सध्या एक नवीन आणि वेगळा सोशल ट्रेंड खूप चर्चेत आहे. त्याचे नाव आहे 'मॅन मम'. या

Sheikh Hasina Verdict : हसीना यांना शिक्षा तर ढाकामध्ये 'हिंसेचा भडका'! लोक रस्त्यावर उतरले; पहा राजधानीतील 'तणावाचा VIDEO'

बांगलादेशच्या राजकारणात सध्या ऐतिहासिक आणि अनेकदिशात्मक राजकीय चढ-उतार दिसून येत आहेत. देशाच्या माजी

बांगलादेशच्या न्यायालयाचा निर्णय, शेख हसीना दोषी

ढाका : बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात बांगलादेश आंतरराष्ट्रीय लवाद या देशांतर्गत

मदिना जवळ बस-टँकर अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू

मक्का मदिना : मदिना जवळ उमराह यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस आणि डिझेल टँकर यांची भीषण धडक होऊन ४२ भारतीयांचा मृत्यू

अमेरिकेत रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी एआयचा वापर

आर्टिफिशियल इंटेलिजेंस ओळखणार रस्त्यांवरील रेलिंग, रस्त्यांचे चिन्ह न्यू यॉर्क : अमेरिकेत रस्ते खड्डेमुक्त

शेख हसीनांना फाशी होणार ? मानवतेविरुद्धच्या गुन्ह्याबाबत आज अंतिम निकाल, बांगलादेश हाय अलर्टवर

ढाका(बांग्लादेश): ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेश हादरवून टाकणाऱ्या विद्यार्थी चळवळीदरम्यान झालेल्या अशांततेशी