मिनी ट्रेन सेवेत वाढ करण्यात रेल्वे प्रशासन ढिम्म!

नेरळ-माथेरान फेऱ्या वाढवण्याची मागणी


माथेरान : देशविदेशातील पर्यटक नेहमीच माथेरानच्या मिनी ट्रेनची सफर मिळावी यासाठी हमखास इथे पर्यटक हजेरी लावतात. खासकरून नेरळ मार्गे माथेरान हा प्रवास घडावा ही त्यांची अपेक्षा असते. या मार्गावरून येताना निसर्गाचे मनमोहक नजारे आणि विविध पॉईंट्सचे दुरून दर्शन घडते. डोळे दिपवून टाकणाऱ्या उंच उंच खोल दऱ्या आणि वेडीवाकडी वळणे घेत जमिनीपासून जसजसे वर गाडीचा प्रवास सुरू असतो त्यावेळी आपण आकाश भ्रमंती करत असल्याचे भासते. त्यामुळे देशविदेशातील पर्यटक आवर्जून या ठिकाणी भेट देतात.


माथेरानमध्ये दरडी कोसळण्याची दाट शक्यता असल्याने रेल्वे प्रशासन दरवर्षी पावसाळ्यात चार महिने मिनी ट्रेन सेवा बंद करते. १५ ऑक्टोबर ते १५ जून या कालावधीत या ट्रेनची सुविधा उपलब्ध असते. परंतु केवळ दोनच ट्रेन या नेरळ माथेरान मार्गावर धावत असल्याने असंख्य पर्यटकांना मर्यादित तिकिटांमुळे या सेवेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे अनेक पर्यटक निराश होतात. इंजिन उपलब्ध नसल्याची कारणे पुढे करून अथवा स्टाफ नाही, बोग्यांची कमतरता अथवा तांत्रिक दुरुस्ती या प्रकारची कारणे सांगून अधिकारी वर्ग वेळ मारून नेत असल्याचे सांगितले जात आहे.


मुळात या अधिकारी वर्गाची पर्यटकांना उत्तम प्रकारे सेवा उपलब्ध करून द्यावी याबाबत या ट्रेन बाबतीत मानसिकता नाही. यापूर्वीच्या काळात मिनी ट्रेनच्या पाच ते सहा फेऱ्या होत असत. यामध्ये मालवाहू गाडीतून जीवनावश्यक साहित्य असो किंवा बांधकाम साहित्य हे नियमितपणे यायचे. इथल्या शटल सेवेला डबल इंजिन लावून शटलची सुविधा पुरविली जायची. घाटातून केवळ एका इंजिनच्या सहाय्याने पाच ते सहा बोग्या भरून प्रवाशी येतात मग अमन लॉज ते माथेरान दरम्यान घाट सेक्शन नसताना शटलसाठी दोन इंजिनची आवश्यकता नाही. यातील काही इंजिन्स नेरळ माथेरान मार्गावर पर्यटकांच्या वाहतुकीसाठी ठेवल्यास असंख्य पर्यटकांना या सेवेचा लाभ घेता येईल. त्यासाठी अधिकारी वर्गाने पर्यटकांसाठी उन्हाळ्यातील आठ महिने ही सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी अनेक वर्षांपासून जोर धरू लागली आहे.


पर्यटकांचे विशेष आकर्षण व जागतिक हेरिटेज दर्जा प्राप्त झालेल्या मिनी ट्रेनच्या नेरळ माथेरानच्या फेऱ्यामध्ये वाढ व्हावी ही काळाची गरज आहे. पूर्वी दिवसभरात पाच येण्यासाठी तर पाच जाण्यासाठी फेऱ्या होत असल्याने येणाऱ्या पर्यटकांना आनंद मिळत होता, तर येथील सर्वसामान्य नागरिकांना महिन्याभराचे जीवनावश्यक साहित्य आणणे व सुरक्षित प्रवास करणे अतिशय सुलभ होत होते. रेल्वे प्रशासनाने याचा पुनःश्चविचार करून या फेऱ्यांमध्ये वाढ करावी आणि पर्यटक व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी केली.

Comments
Add Comment

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान वाहतूक सुरू, पहिल्या विमानाचं जोरदार स्वागत

पनवेल : रायगड जिल्ह्यात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून (गुरुवार २५ डिसेंबर २०२५)

सिडको-नैना क्षेत्रातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन

पनवेल तालुक्यातील ४६ गावांचा प्रश्न मार्गी लागणार पनवेल : पनवेल तालुक्यामधील सिडको व नैना अधिसूचित क्षेत्रातील

कर्जतमध्ये सुधाकर घारे यांचे जोरदार कमबॅक

नितीन सावंतांना सोबत घेऊन थोरवे आणि लाड यांना धक्का कर्जत : येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत परिवर्तन विकास

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित

विकासकामांना ग्रामस्थांनी निवडले रुपेंद्र मळेकर रोहा : रोहा नगरपरिषद निवडणुकीत मोठ्या चुरशीच्या झालेल्या

उबाठाशी युती राष्ट्रवादीच्या फळाला आली

मुरुडकरांनी जुन्यांना नाकारले तरुणांकडे धुरा! उदय खोत नांदगाव मुरुड : मुरुड नगरपरिषदेची निवडणूक

आपली पोरं सांभाळू शकले नाहीत, ते मुंबई काय सांभाळणार?

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली