मोहित सोमण:आयटीतील एक चिंताजनक बातमी म्हणजे तीन दिवसात तीन कंपन्यांनी कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. पहिले ओरॅकलनंतर (Oracle) आता टीसीएस (TCS) व डेनसु (Dentsu) कर्मचारी कपात करण्याचे ठरवले आहे. या कंपन्यांनी आ पल्या संरचनेत (Structure) बदल करताना आपल्या वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. ए आय सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करता प्रति कर्मचारी वाढलेल्या ओव्हरहेड खर्च कपात करण्यासाठी ही कपात सुरू झाली आहे. माहितीनु सार जागतिक पातळीवरील प्रसिद्ध कंपनी ओरॅकलने क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर (OCI) विभागात कर्मचारी कपात केली. नेमका आकडा कंपनीने जाहीर केला नसला तरी मात्र मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात झाल्याची सुत्रांनी माहिती आहे. याचा सर्वात मोठा फट का भारतीय व युएस कर्मचाऱ्यांना झाला आहे. डेटा सेंटर रन करणारे कर्मचारी यात होरपळले गेले आहेत. ईआरपी सॉफ्टवेअरसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तडकाफडकी नारळ देण्याचा निर्णय घेतला. ए आय इन्फ्रास्ट्रक्चर सांभाळण्यासाठी नवीन कौशल्य विकास प्राप्त केलेल्या प्रतिभावान कर्मचाऱ्यांची नेमणूक कंपनी करू शकते.
ऑरेकल अमेझॉन वेब सर्व्हिसेस, मायक्रोसॉफ्ट अझ्युर आणि गुगल क्लाउड सारख्या प्रमुख क्लाउड स्पर्धकांच्या विरोधात आपले स्थान मजबूत करण्यासाठी काम करत असताना नोकऱ्यांमध्ये ही कपात (Restructuring Lay off) करण्यात आले आहे.जगभरा त एआय तंत्रज्ञानाचा वेगाने प्रसार होत असल्याने क्लाउड कंपन्या मोठ्या मशीन लर्निंग मॉडेल्सचे प्रशिक्षण आणि तैनाती हाताळू शकतील अशा शक्तिशाली संगणकीय प्रणाली तयार करण्यासाठी स्पर्धा करत आहेत. यासोबतच, ओरेकल त्यांच्या डेटा सेंटर्सना ए आय वर्कलोडसाठी तयार करण्यासाठी आणि सुप्रसिद्ध एआय कंपन्यांसोबत भागीदारी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. उदाहरणार्थ, या वर्षाच्या सुरुवातीला, ओपनएआय आणि ओरेकलने पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी ३० अब्ज डॉलर्स वर्षा चा करार केला.अशी कामगिरी असूनही,ओरेकलच्या क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर डिव्हिजनमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या कपात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. नोव्हेंबर २०२४ मध्ये, कंपनीने ओसीआयमधील शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याचे वृत्त आहे. स्वस्तात नवी भरती करण्याचा ट्रेंड बाजारात आल्याने ही कपात सुरूच आहे.
टीसीएसमधील १२००० लोकांची नोकरी धोक्यात!
हीच परिस्थिती टीसीएस, व डेंनसूमध्ये कायम आहे. टीसीएसने कर्मचारी कपात बातमीची पुष्टी केली आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच कंपनीकडून १२००० लोकांना नारळ देण्यात येणार आहे तशी घोषणा टीसीएसने केली आहे. ब्रिचिंग धोरण (Breaching Policy) या नावाखाली कंपनीने आधीही कर्मचारी कपात केली होती. यापुढेही करण्याची शक्यता आहे. हे धोरण विवादास्पद असून देखील कंपनीने ते पुढे सूरू ठेवले आहे.
एका आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार,' फ्यूचर-रेडी ऑर्गनायझेशन" बनण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून, टीसीएस सुमारे १२,००० नोकऱ्या कमी करण्याची योजना आखत आहे, जी त्यांची आतापर्यंतची सर्वात मोठी टाळेबंदी आहे, ज्यामध्ये प्रामु ख्याने मध्यम आणि वरिष्ठ पातळीवरील पदांना लक्ष्य केले आहे. कंपनीने २% कर्मचारी कपातीचे कारण एआय-चालित उत्पादकता वाढीऐवजी कौशल्यातील विसंगतींना (Skill contradictory) दिले आहे, तर तज्ञांना ते एका व्यापक एआय-इंधनयुक्त ट्रेंडची सुरु वात म्हणून दिसते जे पुढील दोन ते तीन वर्षांत २८३ अब्ज डॉलर्सच्या आयटी क्षेत्रातील ४०००००-५००००० नोकऱ्या काढून टाकू शकते.' असे म्हटले गेले आहे. त्यामुळेच वाढलेल्या ए आय ऑटोमेशनचा फटका भविष्यातही बसण्याची शक्यता विशेषतः मोठ्या आय टी कंपन्यांत वर्तवली जात आहे. तज्ञांचा मते, 'सर्वात असुरक्षित लोकांमध्ये कमीत कमी तंत्रज्ञान कौशल्य असलेले व्यवस्थापक, सॉफ्टवेअर परीक्षक आणि मूलभूत तंत्रज्ञान सहाय्य प्रदान करणारे पायाभूत सुविधा व्यवस्थापन कर्मचारी यांचा समावेश आहे. वासू पुढे म्हणाले, यामुळे (टीसीएस टाळेबंदीमुळे उद्भवणारी भीती) पर्यटन, लक्झरी शॉपिंगसाठी ग्राहकांच्या मागणीला धक्का बसू शकते आणि रिअल इस्टेटसारख्या दीर्घकालीन गुंतवणुकीलाही विलंब होऊ शकतो' असे म्हटले गेले आहे. असे असताना होणारी कर्मचारी कपात आगामी काळात गंभीर समस्या निर्माण करू शकते.
डेंंनसूतही (Dentsu) कर्मचारी कपात -
जापनीज जाहिरात कंपनी डेंनसूने म्हटले आहे की, आगामी दिवसात जपान बाहेरच्या बाजारात ३४०० नोकरीच्या संधीत कंपनी कपात करणार आहे. या कर्मचारी कपातीचा फटका भारतासहीत जगभरातील देशात बसू शकतो. दुसऱ्या तिमाहीत झालेल्या नुकसा नीचा परतावा म्हणून कंपनी आपल्या एकूण कर्मचारी संख्येच्या ८% कर्मचारी कपात करणार आहे. विशेषतः बॅक ऑफिस विभागात ही कपात होणार आहे. १४ ऑगस्ट रोजी एका निवेदनात जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत ६२ अब्ज येन ($५३९ दशलक्ष) च्या ऑपरेटिंग तोट्याची नोंद झाली आहे, जो युनायटेड स्टेट्स आणि युरोपमधील मंद कामगिरीमुळे ८६ अब्ज येनच्या नुकसानीमुळे झाला आहे. डेन्ट्सूच्या विधानानुसार, जपानबाहेरील मुख्यालय आणि बॅक ऑफिस फंक्शन्सना लक्ष्य करून केलेल्या टाळेबंदीचा उद्देश कंपनीच्या वाढीच्या क्षमतेशी किंवा स्पर्धात्मक धारशी तडजोड न करता ऑपरेशन्स सुलभ करणे आहे.कंपनीने आपला पूर्ण वर्षाचा अंदाज सुधारित केला आहे, आता २०२५ साठी ३.५ अब्ज येनचा ऑपरेटिंग तोटा अपेक्षित आहे, जो ६६ अब्ज येनच्या ऑपरेटिंग नफ्याच्या पूर्वीच्या अंदाजापेक्षा तीव्र घट आहे.
ग्लोबल सीईओ हिरोशी इगाराशी यांनी पुनर्रचनाचे (Restructuring) वर्णन करताना डेन्ट्सूच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाच्या, विशेषतः अमेरिका आणि युरोपमधील अत्यंत आव्हानात्मक कामगिरीला त्वरित प्रतिसाद म्हणून कर्मचारी कपात केली असल्याचे नमूद के ले आहे जिथे कंपनीला नकारात्मक महसूल वाढीचा सामना करावा लागला आहे. 'मला या परिस्थितीबद्दल मनापासून वाईट वाटते आणि कंपनीच्या वतीने मी मनापासून माफी मागतो' इगाराशी पुढे म्हणाले, नफा पुनर्संचयित करण्यासाठी व्यवसायाचा पाया पुन्हा बांधण्याची गरज आहे. याउलट, डेन्ट्सूच्या जपान ऑपरेशन्सने २०२५ च्या पहिल्या सहामाहीत विक्रमी उच्च निव्वळ महसूल आणि ऑपरेटिंग नफा नोंदवला, सलग नऊ तिमाहीत वाढ झाली आणि सलग तिसऱ्या तिमाहीत ५% पेक्षा जास्त नैसर्गिक वाढ झाली हो ती.आता मात्र खर्चात झालेल्या वाढीमुळे कंपनीने हा कठोर निर्णय घेतला आहे.
आगामी काळात मायक्रोसॉफ्टमध्येही कपात?
मायक्रोसॉफ्ट कंपनीनेही कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 'ऑपरेशन्स सुलभ करण्यासाठी, मध्यम व्यवस्थापन स्तर कमी करण्यासाठी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मायक्रोसॉफ्ट सु मारे ९००० कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे, जे त्यांच्या जागतिक कर्मचार्यांच्या ४% पेक्षा कमी आहे. नोकऱ्यांमध्ये कपात विविध संघ, स्थाने आणि अनुभवाच्या पातळींना व्यापेल,' असे कंपनीच्या प्रवक्त्याने मंगळवारी सांगितले आहे.
सीईओ सत्या नाडेला यांनी मान्य केले की हा निर्णय त्यांच्यासाठी खूप मोठा आहे परंतु तो यशाचा कोडा (Enigma of Success ) असल्याचे त्यांनी नमूद केले, ते पुढे म्हणाले आहेत की तंत्रज्ञान उद्योग सतत अशा प्रकारे विकसित होत आहे जे नेहमीच तार्किक नस तात. त्यांनी मायक्रोसॉफ्टच्या ध्येयासाठी एआय केंद्रस्थानी असल्याचे अधोरेखित केले, ज्यामध्ये नवीन एआय साधने आणि उत्पादने विकसित करण्याची आणि कर्मचारी आणि ग्राहकांना त्यांचे स्वतःचे एआय-संचालित उपाय तयार करण्यास सक्षम करण्याची योज ना आहे.'