
बॉलिवूडची ‘क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी कंगना राणौत केवळ तिच्या दमदार अभिनयासाठीच नव्हे, तर स्पष्टवक्तेपणा आणि निर्भीड विधानांसाठी कायम चर्चेत असते. मात्र, यावेळी कंगनाने पडद्यामागचं वास्तव समोर आणत असा खुलासा केला आहे, की तो ऐकून चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी येईल. अंगावर काटा आणणारा प्रसंग क्वीन कंगनाने सांगितला आहे. एका मुलाखतीत कंगनाने तिच्या लहानपणीच्या आठवणी सांगताना सांगितलं की, तिच्या जन्माआधीच कुटुंबात एक मोठं दु:ख ओढवलं होतं. तिची ही कहाणी ऐकून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
कंगनाची आई पहिल्यांदा एका मुलाला जन्म देत होती. वडिलांनी त्याचं नाव प्रेमाने ‘हिरो’ ठेवलं. पण जन्मानंतर केवळ १० दिवसांतच त्या बाळाचं निधन झालं. "आजही आम्हाला त्याच्या मृत्यूचं खरं कारण माहीत नाही. कुटुंबातील काही लोकांचं म्हणणं होतं की नाळ खूप जास्त कापली गेली होती, त्यामुळे तो जास्त काळ जगू शकला नाही," असं कंगना म्हणाली. त्या घटनेनंतर तिच्या आईवर खूप खोल परिणाम झाला. "आईला मुलगा हवा होता. पण माझ्या जन्मावेळी, जेव्हा आजीने आईला सांगितलं की मुलगी झाली आहे, तेव्हा ती जोरात रडली. हे ऐकून मी हादरले होते," असं कंगना सांगते.

मुंबई : वर्षानुवर्षांची परंपरा असलेला गणेशोत्सव यावर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यास शासनाची यंत्रणा सज्ज झाली असून गणेशोत्सव मंडळे व घरगुती ...
तिच्या जन्मानंतर वर्षभरातच तिचा धाकटा भाऊ झाला. पण त्यामुळे आई पूर्णपणे भावाकडे वळली आणि कंगनाला पणजीच्या खोलीत वाढवलं गेलं. “माझ्या आजी अनेकदा आईला टोमणे मारायच्या. आई दिवसभर रडत बसायची. माझ्या भावाच्या मृत्यूनंतर आजीने ठरवलं की आता घरातील कुणीही प्रसूतीसाठी रुग्णालयात जाणार नाही. त्यामुळे आईने पुढची पाचही मुलं घरच्या एका खोलीतच जन्माला घातली," कंगनाने सांगितलं. कंगना पुढे सांगते की, तिच्या वडिलांचं मुलींविषयी विचारधाराचं चित्र वेगळं होतं."वडील मला नेहमी सांगायचे चांगलं शिक, म्हणजे तुझं लग्न चांगल्या मुलाशी होईल. जर अभ्यास केला नाही तर चांगला मुलगाही मिळणार नाही.
हिमाचलच्या लोकांबद्दल बोलताना कंगना म्हणाली, "इथले लोक मुलींविषयी संकुचित विचार करत नाहीत. उलट, प्रत्येकाला वाटतं की त्यांची मुलगी शिकावी, पुढं जावी आणि स्वतःच्या पायावर उभी राहावी."