
गणेशभक्तांचा गावचा प्रवास सुखकर होण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून त्या अनुषंगाने या महामार्गावर 16 टन व त्यापेक्षा अधिक वजनाच्या वाहनांना 23 ऑगस्टपासून बंदी असणार आहे.
येत्या 23 ऑगस्टला सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 29 ऑगस्टला रात्री 12 वाजेपर्यंत, तर 2 सप्टेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून 4 सप्टेंबरला रात्री 8 वाजेपर्यंत, तसेच 6 सप्टेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून ते 8 सप्टेंबरला रात्री 8 वाजेपर्यंत हे बंदीचे आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा याकरिता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नुकतीच मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. शिवेंद्रसिंह राजे भोसले हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते म्हणाले कि, मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी मुंबई गोवा महामार्ग गणपती सनापूर्वी सुस्थितीत होणार असल्याची ग्वाही दिली.