अन्‍न व औषध प्रशासन, नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर्स ऑफ इंडिया आणि नेस्ले इंडियाकडून महाराष्ट्रात ‘सर्व्‍ह सेफ फूड'चा विस्‍तार

अन्‍न स्वच्छता आणि सुरक्षितता आणखी वाढवण्यासाठी २५०० हून अधिक स्ट्रीट फूड विक्रेत्यांना प्रशिक्षण देणार


प्रतिनिधी: महाराष्ट्रात ‘सर्व्‍ह सेफ फूड' प्रकल्पाचा भौगोलिक विस्तार करत नेस्ले इंडियाने अन्‍न व औषध प्रशासन, महाराष्ट्र आणि नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर्स ऑफ इंडिया (NASVI) सोबत सहयोग सुरू ठेवला आहे. या सहयोगांतर्गत मुंबईसह ना शिक आणि ठाणे येथील २५०० हून अधिक स्ट्रीट फूड विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्‍यात येईल असे कंपनीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण स्ट्रीट फूड विक्रेत्यांची संख्या ६१०० पेक्षा अधिक झाली. ‘सर्व्ह सेफ फूड' या प्रोजेक्टमुळे २६ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशांमधील ९२८०० हून अधिक स्ट्रीट फूड विक्रेत्यांना आरोग्य, स्वच्छता, सुरक्षित अन्‍न हाताळणी, कचरा विल्हेवाट व उद्योजकता याबद्दल शिक्षित करून फायदा झाला आहे असे प्रकल्पावर कंपनीने म्हटले आहे. त्याखेरीज प्रशिक्ष ण उपक्रम विक्रेत्यांना त्यांच्या अन्‍न हाताळणीच्या पद्धती सुधारण्यासाठी माहितीसह सुसज्‍ज करतो असेही पुढे म्हटले.


याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना महाराष्ट्राच्‍या अन्‍न व औषध प्रशासनाचे आयुक्‍त राजेश नार्वेकर म्हणाले आहेत की, 'महाराष्ट्रामध्‍ये देशातील प्रसिद्ध स्ट्रीट फूडचा आस्‍वाद मिळतो. साधा वडा पाव आणि मिसळ पाव असो किंवा कबाब असो, ते महाराष्ट्राच्या संस्कृतीसह मोठ्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. आमचा ही संस्कृती आणखी दृढ करण्याचा आणि राज्यातील स्ट्रीट फूड विक्रेत्यांना अन्‍न स्वच्छता व सुरक्षिततेबद्दल कौशल्य देऊन सक्षम करण्याचा मनसुबा आहे. महाराष्ट्रातील नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर्स ऑफ इंडिया (एनएएसव्‍हीआय), अन्‍न व औषध प्रशासन (एफडीए) आणि नेस्ले इंडिया यांच्यातील सहयोगाबद्दल आणि ‘सर्व्‍ह सेफ फूड' प्रोजेक्टद्वारे उद्दिष्ट साध्य करण्यात आम्हाला मदत केल्याबद्दल मी आभार व्‍यक्‍त करतो.'


प्रकल्पांना पाठबळ देताना नेस्ले इंडियाच्या शाश्वतता व सामाजिक उपक्रमांच्या प्रमुख डॉ तरुना सक्सेना म्हणाल्या आहेत की,' नेस्ले इंडियामध्ये आम्ही आमच्या स्वतःच्या उत्पादनांची गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या पलीकडे जाऊन भारतातील अन्‍न सुरक्षितता सुधा रण्याचा सातत्याने प्रयत्‍न करत आहोत. प्रकल्‍प ‘सर्व्ह सेफ फूड' स्वच्छता आणि अन्‍न सुरक्षा पद्धतींवरील संबंधित प्रशिक्षणाद्वारे स्‍ट्रीट फूड विक्रेत्यांना त्यांचे कौशल्य अपग्रेड करून सक्षम करते. यामुळे अन्‍न सुरक्षा आणि स्वच्छतेबद्दल हे अधिक जागरूक होतील आम्ही या प्रकल्पाचा विस्तार करत आहोत, तसेच आम्हाला विश्वास आहे की, यामुळे कालांतराने सकारात्मक वर्तनात्मक बदल घडून येतील आणि त्यांच्या व्यवसायांच्या एकूण वाढीस व शाश्वततेला हातभार लागेल.' या प्रकल्पासाठी नेस्ले इंडियाने २०१६ मध्ये प्रक ल्‍प ‘सर्व्ह सेफ फूड' सुरू केला होता. आसाम, आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेश, अंदमान व निकोबार बेटे, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, ना गालँड, ओडिशा, पुडुचेरी, पंजाब, राजस्थान, सिक्‍कीम, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड राज्यातील स्ट्रीट फूड विक्रेत्यांना प्रशिक्षण दिले गेले आहे.

Comments
Add Comment

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी

राणीबागेत बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी) : निसर्गसौंदर्य आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईकरांना अनुभवायला

विख्यात कंपनी अनंत राजकडून डेटा सेंटर उभारण्यासाठी ४५०० कोटी गुंतवणूकीची घोषणा

प्रतिनिधी: विख्यात रिअल्टी कंपनी अनंत राज लिमिटेडने आपल्या पोर्टफोलिओ विस्तार करण्यासाठी आंध्र प्रदेशात

Utakarsh Small Finance Bank Q2Results: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा तिमाही निकाल जाहीर यंदा तिमाहीत बँकेला ३४८ कोटींचा निव्वळ तोटा

मोहित सोमण: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने आपला तिमाही निकाल आज जाहीर केला आहे. या निकालातील माहितीनुसार, बँकेला

सनातन एकता पदयात्रेदरम्यान बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांची प्रकृती चिंताजनक

मथुरा : सनातन एकता पदयात्रेच्या आठव्या दिवशी बागेश्वर धामाचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ

उत्पन्ना एकादशीचे महत्त्व आणि पाळा हे नियम! जाणून घ्या सविस्तर...

दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास आणि व्रत केले जाते. प्रत्येक एकादशीला विशिष्ट असे