Friday, August 15, 2025

अखेर ठरलं! २०४७ पर्यंत विकसित भारतासाठी स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची अर्थव्यवस्थेसाठी 'ही' नवी सिंहगर्जना !

अखेर ठरलं! २०४७ पर्यंत विकसित भारतासाठी स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची अर्थव्यवस्थेसाठी 'ही' नवी सिंहगर्जना !
मोहित सोमण: स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप मोठी घोषणा केली आहे. देशवासीयांना आता डबल दिवाळीच नाही तर अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदल करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवले आहे. १५ ऑगस्टच्या आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टास्क फोर्स आणण्याची सिंहगर्जना केली आहे. अर्थव्यवस्थेला नवे वळण देण्यासाठी सरकारने एक टास्क फोर्स (Task Force) ची स्थापना केली आहे. भारताच्या वैश्विक संदर्भात अर्थव्यवस्थेत व नियमनात (Regulatory) बदल करण्यासाठी सरकारने लवकरच टास्क फोर्स स्थापन करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. याविषयी अधिक बोलताना मोदी म्हणाले आहेत की,' आगामी काळात आम्ही वेगाने अर्थव्यवस्थेला पुढे घेऊन जाण्यासाठी सक्षम आहोत. इतकेच नाही तर जुन्या पुरातन आर्थिक रेग्युलेटरी नियमनाला बदलण्याचा निर्णय आम्ही घेतला.आतापर्यंत रेग्युलेटरी रिफॉर्म असो, पॉलिसी रिफॉर्म असो, प्रोसेस रिफॉर्म अथवा प्रोसिक्यूशन रिफॉर्म असो प्रत्येक प्रकारचे रिफॉर्म हे लक्ष ठेवून आम्ही पुढे चा ललो आहोत.त्यामुळेच पुढील जागतिक परिपेक्षात भारताच्या वेगवान प्रगतीसाठी भारताने टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला. हा टास्क फोर्स वेळेत हे बदल वास्तवात पूर्ण करण्यासाठी वर्तमान नियम,निती २१ व्या शतकात वैश्विक वातावरणात अनुकूल, तसेच भारताच्या वातावरणाला अनुकूल आणि भारताला २०४७ पर्यंत भारताला विकसित राहू बनवण्यासाठी हा टास्क फोर्स होणार आणि तो वेळेत कार्य पूर्ण करेल यासाठी आम्ही टास्क फोर्सची निर्मिती आम्ही केली आहे.' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहे त.

गेल्या ७५ वर्षाच्या स्वातंत्र्यात अनेक कालबाह्य कायदे आहेत. जे बाबा आझमच्या काळातील हे कायदे आहेत. २१ व्या शतकात हे कायदे काही उपयोगी नाही. छोट्या छोट्या गोष्टीत नागरिकांना दंड संहितेचा धाकाने जेलमध्ये टाकले जात होते. ब्रिटिशांच्या काळा तील हे कायदे आता बदलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे ' असे मोदी भाषणात म्हणाले आहेत. आपल्या भाषणात त्यांनी केलेल्या विकासात्मक परिवर्तनीय रिफॉर्मचा पाढा वाचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी,' आम्ही ४०० हून अधिक कायद्यात बदल (Reform) केले. त्यामुळे तरूणांना यांचा फायदा व्यवसाय सुरू करण्यासाठी होणार आहे. मग ते स्टार्ट अप असो लघू उद्योग असो, गृह उद्योग असो त्यांची अनुपालन (Compliance Cost) किंमत कमी होणार आहे. त्यामुळेच त्यांना नवी शक्ती मिळेल. अगदी निर्यातीत, लॉ जिस्टिकस क्षेत्रातील उद्योगांना तरूणांना शक्ती मिळेल. त्यामुळे अनावश्यक कारणांमुळे लोकांना जेलमध्ये पाठवणारे कायदे बदलणे आवश्यक आहे यासाठी आम्ही आधीही संसदेत कायदे मांडले व आताही मांडत आहोत.' असे मोदी म्हणाले आहेत.

एवढंच नाही तर मोदी पुढे जाऊन म्हणाले की, ' यावर्षी आम्ही तुमची डबल दिवाळी करणार आहे. या दिवाळीत तुम्हाला एक नवीन गिफ्ट मिळेल. गेल्या ८ वर्षात आम्ही जीएसटीत मोठा बदल केला आहे. जीएसटी कर प्रणाली सोपी केली व लोकांवरील अतिरिक्त बोजा काढला. त्याची नियमाप्रणाली सोपी केली.८ वर्षात वेळे अनुसार आम्ही आणखी बदल करण्यासाठी ठरवले व त्याचा रिव्ह्यू करून एक कमिटी बनवली. राज्यांचाही विचार ऐकून घेण्यात आला. व आम्ही नेक्स्ट जनरेशन रिफॉर्मचा निर्णय घेतला. त्यामुळेच या दिवाळीत तुम्हाला मोठे गिफ्ट मिळणार आहे. मोठ्या प्रमाणात टॅक्स (करात) आम्ही मोठ्या प्रमाणात कपात करणार आहोत. मानवी आयुष्य सुकर करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याचा फायदा होईल. त्याचा फायदा उद्योग व्यवसायांना होणा र आहे. छोटे उद्योग, एमएसएमई यांना त्यांचा फायदा होऊन रोजच्या जीवनातील वस्तू स्वस्त होतील' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. त्यामुळेच अर्थव्यवस्थेलाही बळ मिळेल असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला आहे. तसेच त्यांनी या वेळी कररचनेत २७० हून अधिक कलम काढत कररचना सरल केल्याचेही ठणकावून सांगितले आहे.

इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सेमीकंडक्टर प्रकल्पांबाबतही भाष्य केले आहे. त्यांनी घोषणा केली की या वर्षाच्या अखेरीस भारतात बनवलेली पहिली सेमीकंडक्टर चिप बाजारात आणली जाईल. सहा सेमीकंडक्टर युनिट्स आधीच जमिनीवर आहेत आ णि चार नवीन युनिट्सना हिरवा कंदील देण्यात आला आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले,' माझ्या देशाच्या तरुणांनो, आज १५ ऑगस्ट आहे आणि याच दिवशी आपण आपल्या देशातील तरुणांसाठी १ ट्रिलियन रुपयांची योजना सुरू करत आहोत. आजपासून प्र धानमंत्री विकसित भारत रोजगार योजना राबवली जात आहे.

ते म्हणाले की, या योजनेअंतर्गत, खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना सरकारकडून १५००० रुपये मिळणार आहेत.'ज्या कंपन्यांना अधिक रोजगार संधी निर्माण होतील त्यांना प्रोत्साहन रक्कम देखील दिली जाईल. प्रधानमंत्री विकसित भारत रोज गार योजना तरुणांसाठी जवळजवळ ३५ दशलक्ष नवीन रोजगार संधी निर्माण करेल' असे ते म्हणाले. पुढील १० वर्षांत या राष्ट्रीय सुरक्षा कवचाचा विस्तार, बळकटीकरण आणि आधुनिकीकरण करण्याच्या योजना मोदींनी जाहीर केल्या. याविषयी अधिक मुद्यावर भाषण करताना मोदी म्हणाले आहेत की,'पुढील १० वर्षांत, २०३५ पर्यंत, मला या राष्ट्रीय सुरक्षा कवचाचा विस्तार, बळकटीकरण आणि आधुनिकीकरण करायचे आहे. भगवान श्रीकृष्णापासून प्रेरणा घेऊन, आपण सुदर्शन चक्राचा मार्ग निवडला आहे.राष्ट्र सुदर्शन चक्र मिशन सुरू करणार आहे' असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

त्यामुळे हा टास्क फोर्स येत्या काही दिवसांतच भारताला आणखी मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी कंबर असणार असून भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हे मोठे बुस्टर असल्याचे म्हटले जात आहे. आगामी सोमवारच्या शेअर बाजारात त्यांच्या या नव्या घोषणेचा फायदा दिसेल असेही अर्थतज्ज्ञही म्हणत आहेत. विशेषतः कंज्यूमर ड्युरेबल्स, ग्राहक उपभोग (Consumer Consumption), डिफेन्स या उत्पादन कंपन्यांना या घोषणेचा लाभही होऊ शकतो असे सांगण्यात येत आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >