Friday, August 15, 2025

एसीच्या कूलिंगबद्दल केली तक्रार ! डक्ट पॅनल उघडल्यानंतर जे समोर आलं पाहून तुम्हीही व्हाल थक्क

एसीच्या कूलिंगबद्दल केली तक्रार ! डक्ट पॅनल उघडल्यानंतर जे समोर आलं पाहून तुम्हीही व्हाल थक्क

पाटणा : लखनऊ- बरौनी एक्सप्रेसमधील प्रवाशांनी एसीच्या कूलिंगबद्दल तक्रार केली . या तक्रारीनंतर जेव्हा टेक्निशियन पाहणी करण्यासाठी आले तेव्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे .


मिळालेल्या माहितीनुसार लखनऊ- बरौनी एक्सप्रेसच्या एसी कोचमधील एसी व्यवस्थित थंड होत नव्हता. लोकांनी याबाबत रेल्वे विभागाकडे तक्रार केली. चौकशीसाठी ट्रेन थांबवण्यात आली. टेक्निशियननी एसीचा डक्ट पॅनल उघडला तेव्हा दारूची तस्करी उघड झाली. तंत्रज्ञांनी एसी डक्ट पॅनल उघडले तेव्हा हवेत अडथळा निर्माण झाल्यामुळे थंड होण्याची समस्या उद्भवत असल्याचे आढळून आले . बेकायदेशीर दारूने भरलेले अनेक कार्टन डक्टमध्ये पॅक करून ठेवण्यात आले होते. तस्करांनी तपासणी टाळण्यासाठी माल लपवण्याची ही पद्धत अवलंबली होती , असे अधिकाऱ्यांचे मत आहे .


या धक्कादायक प्रकारानंतर, रेल्वे सुरक्षा दल आणि जीआरपीला तात्काळ माहिती देण्यात आली. यांनंतर कर्मचाऱ्यांनी दारू जप्त केली. तसेच इतर कोणत्याही वस्तू कुठे लपवल्या आहेत का हे पाहण्यासाठी संपूर्ण कोचची देखील झडती घेण्यात आली. ही दारू कुठे नेली जात होती याचा तपास पोलिस करत आहेत . असा संशय आहे की एक संघटित टोळी दारू बंदी असलेल्या राज्यांमध्ये दारू वाहतूक करण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वापर करत आहे .


२०१६ पासून बिहारमध्ये पूर्ण दारूबंदी आहे. या बंदीमुळे नेपाळसह विविध मार्गांनी राज्यात दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. तस्करीसाठी आरोपी विविध पर्यायांचा अवलंब करत असतात . ट्रेनमधील प्रवाशांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावरही शेअर केला . सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की लखनऊ- बरौनी एक्सप्रेसच्या एसी कोचमधील प्रवाशांनी कमी थंडीची तक्रार केली . जेव्हा तंत्रज्ञांनी एसी डक्ट तपासला तेव्हा तिथे बेकायदेशीर दारूचा साठा लपवून नेला जात होता .


जर व्हिडिओ समोर आला नसता तर हे प्रकरण इतर अनेक प्रकरणांप्रमाणे दाबले गेले असते अशी शक्यता आहे . आता व्हिडिओ समोर आल्यानंतर, भारतीय रेल्वेला याबाबत खुलासा द्यावा लागणर आहे . या घटनेबद्दल डीआरएमने माफी मागितली असून या काळात प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे .

Comments
Add Comment