Saturday, October 25, 2025
Happy Diwali

स्वातंत्र्यदिनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दिग्गजांचा अजित पवारांनी केला सत्कार

स्वातंत्र्यदिनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दिग्गजांचा अजित पवारांनी केला सत्कार
बीड : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. सामाजिक न्याय भवन परिसरात आयोजित कार्यक्रमात यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान यांच्यासह सर्व कार्यालय प्रमुख, अधिकारी यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस विभागातील पोलीस उपनिरिक्षक पल्लवी भाऊसाहेब जाधव, पोलीस हवालदार अशोक बापुराव शिंदे, पोलिस हवालदार प्रदीप निवृत्ती येवले, पोलीस उपनिरिक्षक श्रीराम रामदास खटावकर, पोलिस हवालदार शेख आसेफ शेख शमीम महसूल विभागातील निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, नायब तहसीलदार सचिन सुरेशराव देशपांडे, ग्राम महसूल अधिकारी सलीम शेख, संघर्षकुमार ओवे, सहायक महसुल अधिकारी जितेंद्र साहेबराव जाधव, राहुल रामनाथ बलाढ्ये, मंडळ अधिकारी शितल लक्ष्मणराव चाटे, परमेश्वर त्रिंबक काळे, सरपंच शेख मन्नाबी मुजफर पटेल, क्रीडा विभागात क्रिकेटसाठी श्रावणी अजिनाथ दळवी, तायक्वांदोसाठी नयन अविनाश बारगजे, व्हॉलीबॉलसाठी अफताब कुरेशी नौशाद, कबड्डीसाठी महारुद्र मधुकर गर्जे, खो-खोसाठी प्रताप शहादेव तुपे, योगा सभाषिणी विनायकराव वझे, बेसबॉल/सॉफ्टबॉलसाठी आदित्य अरविंद विद्यागर यांना गौरविण्यात आले. यावेळी अवयव दान करणाऱ्या नातेवाईकांचे देखील सत्कार करण्यात आले. यामध्ये कोटुळे कोमल गोकुळदास (पत्नी) व बाबुराव कोटुळे (वडील), अवयवदाता यांचे नातेवाईक प्रविण बालासाहेब निनाले (मुलगा), अवयवदाता यांचे नातेवाईक सुखदेव बाबुराव गायके (वडील), अधिसेविका गिरी रमा गोविंदराव, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रातिनिधीक स्वरूपात डॉ. उल्हास गंडाळ, सुभेदारबलभिम किसन चिंचाणे, हवालदार अब्दुल वाजिद अब्दुल अजीज, कारागृह शिपाई रामआप्पा भागुजी परळकर, सहायक संशोधन अधिकारी महेश पुरूषोत्तम ठाकूर आदींचा यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. यावेळी भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम देखील पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल शेळके, ज्ञानेश्वर कोटुळे, अथर्व शेळके यांनी केले. यावेळी लोकप्रतिनीधी, नागरिक, शालेय विद्यार्थी-विद्यार्थींनी, अधिकारी-कर्मचारी, पत्रकार यांची उपस्थिती होती.  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा