
टॅरिफविषयी बोलताना त्यांनी म्हटले,'अमेरिका ही जागतिक अर्थव्यवस्थेतील मोठी अर्थव्यवस्था आहे हा जगातील एकमेव देश आहे की केवळ त्यांच्या अर्थव्यवस्थेचा जीडीपी जगाच्या अर्थव्यवस्थेतील २६% असून जागतिक अर्थव्यवस्थेतील ४६% मार्केट कॅपिटला यझेशन सर्वाधिक युएसचे आहे.' असे असले तरी पुढे बोलताना ते म्हणाले,'तरीही भारताने टॅरिफ असो अथवा दुसरा प्रश्न भारताने आता मागे हटण्याची गरज नाही. आपण कुठलीही तडजोड न करता करार केला पाहिजे. आपल्या शर्तीवर केला पाहिजे. आज तड जोड केल्यास दीर्घकालीन प्रश्न उपस्थित होऊ शकतात. त्यामुळे आपण चांगल्या स्थितीत आहोत आपण टुरिझम आणि इतर क्षेत्रात नव्या संधी उभारल्या पाहिजेत. आज केवळ एकच असा देश आहे चीन की त्यांनी करारासाठी एक टक्काही तडजोड केली नाही. क धी ट्रम्प वेगळं बोलतात दुसऱ्या दिवशी टॅरिफची वेगळी रक्कम आकारतात. त्यामुळे या कारणामुळे घाबरण्याचे कारण नसून आपण आता अग्रणी होण्याची वेळ आली आहे.' असे अमिताभ कांत सध्याच्या परिस्थितीवर कार्यक्रमात बोलताना म्हणाले आहेत.
यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना कांत यांनी,'अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या कर दबावाला बळी पडू नका आणि अमेरिकेवर कोणतेही प्रत्युत्तरात्मक शुल्क लादण्यापूर्वी वाटाघाटीचा मार्ग स्वीकारावा असे आवाहन त्यांनी केले होते.भारताला झुक ण्याची गरज नाही. आपण सध्या प्रत्युत्तरात्मक शुल्क लादू नये कारण आपल्याकडे वाटाघाटी करण्यासाठी अजूनही २० दिवस आहेत' असेही ते म्हणाले होते. तसेच चीनमधून वस्तू आयात करण्याबद्दल बोलताना ते म्हणाले की,चिनी लोकांना अल्पसंख्याक भागभां डवलावर भारतीय कंपन्यांसोबत संयुक्त उपक्रम आणि भारतात उत्पादन करण्याची ऑफर दिली पाहिजे. 'चीनमधून आयात करण्याऐवजी,आपण चिनी लोकांना अल्पसंख्याक भागभांडवलावर भारतीय कंपन्यांसोबत संयुक्त उपक्रम करण्यास आणि भारतात उ त्पादन करण्यास भाग पाडले पाहिजे आणि त्यामुळे भारत इनपुट उत्पादन आणि घटक उत्पादन दोन्ही करू शकेल आणि मेक इन इंडियाची प्रक्रिया वेगवान करेल आणि भारतात उत्पादन प्रक्रियेला गती देईल आणि आर्थिक वाढीसाठी ते दीर्घकालीन उत्तर आहे' असे कांत म्हणाले होते.