
या वर्षी कृष्ण जन्माष्टमीची अष्टमी तिथी १५ ऑगस्टला रात्री ११.४९ वाजता सुरू होईल. तसेच तिथीचे समापन १६ ऑगस्टला रात्री ९.३४ वाजता होईल. अशातच जन्माष्टमीचे पर्व १६ ऑगस्टला साजरा केला जाईल.
श्रीकृष्णाला आवडणाऱ्या राशी:
ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशींवर भगवान श्रीकृष्णाची विशेष कृपा असते. या राशींचे लोक मेहनती, प्रामाणिक आणि बुद्धिमान असतात.
वृषभ: वृषभ राशीला भगवान श्रीकृष्णाची आवडती रास मानले जाते. या राशीच्या लोकांवर कृष्णाची विशेष कृपा असते. त्यांना यश आणि धनलाभ होण्याची शक्यता अधिक असते.
कर्क: कर्क राशीच्या लोकांवरही भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद असतो. नियमितपणे श्रीकृष्णाची पूजा केल्याने त्यांच्या आयुष्यात कोणतीही कमतरता भासत नाही, असे मानले जाते.
सिंह: सिंह राशीचे लोक धाडसी आणि पराक्रमी असतात. श्रीकृष्णाची पूजा केल्यास त्यांना प्रत्येक कार्यात यश मिळते.
तूळ: तूळ राशीच्या लोकांवर श्रीकृष्णाची कृपा कायम राहते, असे मानले जाते. यामुळे त्यांना शुभ फळ प्राप्त होते.