Thursday, August 14, 2025

गायकाने तब्बल २० वर्षांनी केले हे खास काम, म्हणाला 'आयुष्यातील मोठी संधी...

गायकाने तब्बल २० वर्षांनी केले हे खास काम, म्हणाला 'आयुष्यातील मोठी संधी...

मुंबई : 'इंडियन आयडल'च्या पहिल्या पर्वाचा विजेता आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा गायक अभिजीत सावंत एका नव्या गाण्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर तब्बल २० वर्षांनी त्याने एक खास काम केले आहे, ज्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला आहे.






 










View this post on Instagram























 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)




 

अभिजीतने पहिल्यांदाच एका मालिकेसाठी शीर्षक गीत गायले आहे. झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघांतली तुटेना' या मालिकेसाठी त्याने हे शीर्षक गीत गायले आहे. याबद्दल बोलताना अभिजीत म्हणाला, "झी मराठीसारख्या वाहिनीसाठी शीर्षक गीत गाण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. माझ्या २० वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच मी एखाद्या मालिकेसाठी शीर्षक गीत गायलं आहे आणि तेही झी मराठीसाठी. याचा मला खूप आनंद आहे."


आपल्या गाण्याला प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादावर अभिजीत म्हणाला, "गाणं प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिलं. उत्तम गाणं शब्दबद्ध करून त्याला योग्य न्याय देणं ही माझी जबाबदारी होती. प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम बघून मला समाधान मिळालं आहे की माझ्याकडून नक्कीच काहीतरी चांगलं झालं आहे. 'वीण दोघांतली तुटेना'साठी गायलेलं हे गाणं माझ्या आठवणीत नक्कीच राहील."


अभिजीतच्या या शीर्षक गीताला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि त्यामुळेच त्याच्या आनंदात भर पडली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा