मुंबई: लोकप्रिय मालिका 'इंद्रायणी' मध्ये लवकरच एक मोठा संघर्ष पाहायला मिळणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त विठूच्या वाडीत सुरू असलेल्या सोहळ्यादरम्यान, इंद्रायणीने गावात शाळा सुरू करण्याचा निर्धार जाहीर केला आहे. मात्र, तिच्या या निर्णयाला गावातील जुन्या अंधश्रद्धा आणि मोहितराव यांचा जोरदार विरोध होणार आहे.
मालिकेच्या आगामी भागात, इंद्रायणी ज्या जमिनीवर शाळा बांधण्याची तयारी करते, त्या जागेला 'भुताचा मळा' मानून काही गावकरी विरोध करताना दिसतील. त्यांच्या या अंधश्रद्धेला उत्तर देताना इंद्रायणी ठामपणे सांगते, "शिक्षणाचं मंदिर तर इथेच उभं राहणार!"
इंद्रायणीच्या या संकल्पाला अधूची साथ आणि व्यंकू महाराजांचा आशीर्वाद लाभलेला असला तरी, गावातील दोन भिन्न विचारसरणींमध्ये संघर्ष होणार आहे. एकीकडे इंद्रायणीच्या पाठीशी उभे राहिलेले लोक शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतात, तर दुसरीकडे मोहितरावांच्या नेतृत्वाखालील गट जुन्या समजुतींवर ठाम राहतो.
इंद्रायणी अंधश्रद्धेवर मात करून गावकऱ्यांची मनं कशी जिंकते आणि शिक्षण क्रांतीची सुरुवात कशी करते, हे पाहण्यासाठी नक्की बघा 'इंद्रायणी' १८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता फक्त कलर्स मराठीवर.