Tuesday, September 30, 2025

SIR प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

SIR प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : बिहारमधील SIR प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी करत दिग्गज वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणार युक्तिवाद ऐकून घेतला. अखेर सर्वोच्च न्यायालयाने बिहारमधील SIR प्रक्रियेबाबत एक मोठा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने बिहारमधील SIR प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच मतदार यादीतून वगळलेली नावं २४ तासांत संकेतस्थळावर प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले. एकूण ६५ लाख नावं वगळण्यात आली आहेत. ही सर्व नावं संकेतस्थळावर प्रदर्शित केली जातील. बिहारमधील SIR प्रकरणा सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी शुक्रवार २२ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे.
Comments
Add Comment