Thursday, August 14, 2025

Shilpa Shirodkar Car Accident : बिग बॉस १८’ फेम शिल्पा शिरोडकरचा कार अपघात; बसची कारला जोरदार धडक, पोस्ट शेअर म्हणाली...

Shilpa Shirodkar Car Accident : बिग बॉस १८’ फेम शिल्पा शिरोडकरचा कार अपघात; बसची कारला जोरदार धडक, पोस्ट शेअर म्हणाली...

मुंबई : ‘बिग बॉस १८’मुळे (Bigg Boss 18) पुन्हा एकदा चर्चेत आलेली आणि आपल्या सौंदर्यानं नव्वदच्या दशकात गाजवलेली अभिनेत्री शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar) आता एका भीषण अपघाताच्या घटनेमुळे चिंतेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पाच्या कारला एका बसने धडक दिली आहे, ज्यामुळे तिच्या गाडीची अवस्था अत्यंत गंभीर झाली आहे. शिल्पाने स्वतः सोशल मीडियावर या घटनेबाबत माहिती दिली असून, अपघातानंतरची गाडीची फोटोजही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यासोबतच, शिल्पाने पोलिसांत तक्रार दाखल केली असल्याचेही स्पष्ट केले आहे.



शिल्पाने या घटनेची तसदी दाखवण्यासाठी बस आणि तिच्या कारचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, "आज एका सिटी फ्लो बसने माझ्या कारला धडक दिली." शिल्पा म्हणते की, सिटी फ्लो कंपनीच्या मुंबईतील ऑफिसमध्ये संपर्क साधला असता, योगेश कदम आणि विलास मकोते यांनी जबाबदारीपासून स्वतःला बाजूला केलं. त्यांनी सांगितले की, “हे घडलं ती ड्रायव्हरचीच जबाबदारी होती.” शिल्पाने या वृत्तीवर टीका करत प्रश्न विचारला की, "इतके निर्दयी लोक असू शकतात? आणि असा ड्रायव्हर किती कमावतो असेल?"




शिल्पा शिरोडकरने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये मुंबई पोलिसांचे कौतुक केले आहे. तिने सांगितले की, “मुंबई पोलिसांनी कोणतीही अडचण न येता मला तक्रार दाखल करण्यासाठी मदत केली.” मात्र, बस कंपनीच्या वर्तनावर ती संतुष्ट नाही. शिल्पा म्हणाली, “बस कंपनीने जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी सिटी फ्लो कंपनीने मला संपर्क केला तर चांगले होईल.” तिने सुदैवाने सांगितले की, तिच्यासोबतचा स्टाफ सुरक्षित आहे आणि त्यांना काहीही झालेले नाही. परंतु, शिल्पाने लक्ष वेधले की, काहीही घडू शकले असते, त्यामुळे ही घटना धोकादायक ठरू शकली असती.



दरम्यान, शिल्पा शिरोडकरने नव्वदच्या दशकात बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमठवला. ती अनेक टॉप स्टार्ससोबत स्क्रीन शेअर करत होती आणि तिच्या अभिनयाचे चाहते भरभरून कौतुक करत. मात्र काही वर्षांनंतर ती रुपेरी पडद्यापासून दूर राहिली. दीर्घ काळानंतर शिल्पा शिरोडकर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आली, ती ‘बिग बॉस 18’मधून. बिग बॉसच्या घरातील तिच्या वागणुकीमुळे ती अनेकांच्या लक्षात आली आणि सर्वांना प्रभावित केले. आता शिल्पा शिरोडकर ओटीटीवर पदार्पण करण्याच्या तयारीत आहे; ती ‘शंकर-रिव्होल्युशनरी मॅन’ या आदि शंकराचार्यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >