Thursday, August 14, 2025

रायगड : आदिती तटकरेंना ध्वजारोहणाचा मान, रायगडमध्ये पुन्हा पालकमंत्रीपदावरून वाद

रायगड : आदिती तटकरेंना ध्वजारोहणाचा मान, रायगडमध्ये पुन्हा पालकमंत्रीपदावरून वाद
महायुतीचं सरकार आल्यापासून रायगडच्या पालकमंत्री पदावरुन असलेला वाद राज्याला सर्वश्रुत आहे.रायगडच्या पालकमंत्रीपदावर कुठल्याही मंत्र्‍याची नियुक्ती केली नसली तरी देखील 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्याचा मान पुन्हा एकदा मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आला आहे.

शासनाने परिपत्रक जारी करत कोणत्या मंत्र्‍यांनी कुठे ध्वजारोहण करायचे हे सांगितलं आहे. त्यामुळे, आता पालकमंत्रीपद आदिती तटकरेंना मिळणार असल्याची चर्चा पुन्हा होत आहे. यामुळे मंत्री भरत गोगावले यांचा सूरही बदलले आहेत. भरत गोगावलेंनी पालकमंत्रीपद किस बात की चीज है... असे म्हणत आपला दावाच सोडल्याचं दिसून आलं.

''ज्या मावळ्यांनी अडीच वर्षासाठी मंत्रिपद सोडले त्याला पालकमंत्री किस बात की चीज है, असे म्हणत मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री पदावरुन आपली भूमिका मांडली. महाराष्ट्राच्या इतिहासात पालकमंत्रिपद सोडण्याने इतिहासात माझं नाव कोरलं गेले आहे.

मात्र मुख्यमंत्री आणि मी सुद्धा मंत्री व्हायला पाहिजे असे एकनाथ शिंदे यांनी केलं नाही,'' असे म्हणत भरत गोगावले यांनी नाव न घेता सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्यावर आपला रोष दर्शवला. दरम्यान, महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांचे वजन कमी पडताना दिसत आहे का? असा सवाल भरत गोगावले यांना विचारला असता, अस अजिबात नाही. एकनाथ शिंदेंचे वजन कमी पडले असते तर आम्ही उठाव केलेल्या पालकमंत्री पदावर स्टे आला नसता, असेही गोगावले यांनी म्हटले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >