Paytm Link: असे करा पेटीएम सोबत तुमचे बँक खाते ५ मिनिटांत लिंक

मुंबई: जशी यूपीआय डिजिटल पेमेंट्समध्ये आघाडीवर आहे तशी तुमचे बँक खाते पेटीएम या भारतातील अग्रगण्य पेमेंट आणि आर्थिक सेवा वितरण कंपनी सोबत जोडल्याने त्वरित ट्रान्सफर, सहज पेमेंट कलेक्शन आणि रोजच्या व्यवहारांचे सुरक्षित व्यवस्थापन शक्य होते. उद्योगातील आघाडीचे नाविन्य आणि सखोल तज्ज्ञतेच्या आधारे, पेटीएम वेगवान सुरक्षित आणि अखंड यूपीआय अनुभवासाठी सर्वात विश्वासार्ह प्लॅटफॉर्म आहे. बँक खाते पेटीएमसोबत लिंक केल्याने यूपीआय-आधारित अनेक सेवा उपलब्ध होतात, ज से की मोबाईल नंबर, यूपीआय आयडी किंवा क्यूआर कोड स्कॅन करून मित्रांना किंवा व्यापाऱ्यांना पैसे पाठवणे. वीज-पाणी बिले भरणे, मोबाईल रिचार्ज करणे,ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करणे आणि खात्याचा शिल्लक तपासणे हे सर्व एकाच ॲपवरून करता येते.


बँक खाते लिंक करण्यापूर्वी, मोबाईल नंबर बँकेत नोंदणीकृत असल्याची खात्री करा. तोच नंबर पेटीएम लॉगिनसाठी देखील वापरला जावा. पेटीएमने ही प्रक्रिया वापरकर्त्यांसाठी सोपी केली असली, तरी काही महत्त्वाचे स्टेप आवश्यक आहेत. सुरुवात अशाप्रकारे करा:


स्टेप १: पेटीएम ॲप उघडा आणि नोंदणीकृत मोबाईल नंबरने लॉगिन करा


स्टेप २: प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा. मेनूतून “यूपीआय आणि 'पेमेंट सेटिंग्ज' निवडा किंवा थेट 'लिंक बँक खाते' पर्याय निवडा


स्टेप ३: दिलेल्या यादीतून बँक निवडा. पेटीएम आपोआप नोंदणीकृत मोबाईल नंबरशी जोडलेली बँक खाती शोधून काढेल


स्टेप ४: डिव्हाइसवरून एसएमएस पाठवण्याची परवानगी देऊन मोबाईल नंबर सत्यापित करा


स्टेप ५: बँक खात्यासाठी यूपीआय पिन सेट करा आणि लिंक केलेल्या बँक खात्याचा वापर करून लगेच पेमेंट करायला सुरुवात करा


पेटीएमसोबत बँक खाते लिंक करणे हा एक छोटे पाऊल असले तरी तो मोठ्या संधी उघडतो. ५ मिनिटांच्या आत यूपीआय पेमेंट सक्रिय होईल, ज्यामुळे भारतभर जलद, सुरक्षित आणि कॅशलेस अनुभव मिळेल. ग्राहकांना मित्रांसोबत डिनरचे बिल वाटायचे असो, वीजबिल भरायचे असो किंवा स्थानिक किराणा दुकानांत खरेदी करायची असो, लिंक केलेले बँक खाते स्मार्टफोनला डिजिटल पेमेंटसाठी एक शक्तिशाली साधन बनवते. अलीकडेच, भारतातील सर्वोत्तम आणि सर्वात वेगवान पेमेंट ॲप पेटीएमने ग्राहक-केंद्रित अ नेक नाविन्यपूर्ण सुविधा आणल्या आहेत यामध्ये समाविष्ट आहेत.अधिक गोपनीयतेसाठी विशिष्ट पेमेंट लपवणे किंवा दाखवणे, जलद पेमेंटसाठी ‘पैसे मिळवा’ असे होम स्क्रीन विजेट, मोबाईल नंबर उघड न करता वैयक्तिक यूपीआय आयडी तयार करण्याची सुवि धा,एक्सेल किंवा पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करता येणारे यूपीआय स्टेटमेंट्स, तसेच सर्व यूपीआय-लिंक केलेल्या बँक खात्यांचा एकत्रित शिल्लक दाखवणारा पर्याय.जागतिक स्तरावर आपला विस्तार करताना, पेटीएम आता यूएई, सिंगापूर, फ्रान्स, मॉरिशस, भूतान, श्रीलंका आणि नेपाळसारख्या देशांत यूपीआय व्यवहारांना समर्थन देते, ज्यामुळे भारतीय प्रवाशांसाठी विदेशातील पेमेंट अधिक सुलभ होतात.

Comments
Add Comment

Gujrat Car Video : गुजरातच्या पठ्ठ्याचा भन्नाट जुगाड; चक्क कारलाच बनवलं '1BHK' घर, एकदा हा व्हिडिओ पाहाच

अहमदाबाद : सध्या देशभरात कार मॉडिफिकेशनचं वारं वाहत असलं तरी गुजरातच्या एका पठ्ठ्याने मात्र कल्पकतेच्या सर्व

Sikkim Landslide : भूस्खलनात अडकलेल्या पर्यटकांच्या सुटकेसाठी भारतीय लष्कराचे युद्धपातळीवर प्रयत्न

- भारतीय लष्कराकडून 'ऑपरेशन हिम सेतू'ला सुरुवात भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सने उत्तर सिक्कीममधील लाचेन

Iran-US-Israel War : होर्मुज सामुद्रधुनीवर इराणचा मोठा निर्णय; इराणकडून पर्यायी समुद्री मार्ग जाहीर

पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावाच्या (Iran-US-Israel War) पार्श्वभूमीवर आता होर्मुज सामुद्रधुनी (Strait of Hormuz) संदर्भात एक मोठी

Pune News : मांजरी स्टेशनचा कायापालट तर रामटेकडीला मिळणार नवे ब्लॉक स्टेशन

पुणे : पुणे रेल्वे विभागाने वाढती प्रवासी गर्दी आणि रेल्वे वाहतुकीवरील ताण लक्षात घेऊन दोन महत्त्वाचे प्रकल्प

CM Fellowship : तरुणांसाठी मंत्रालयात कामाचा थाट, पगारही जोरात! मुख्यमंत्री फेलोशिपसाठी महिना ६१,५०० रुपयांची संधी; कसा कराल अर्ज ?

मुंबई : राज्यातील कल्पक आणि उत्साही तरुणांसाठी प्रशासकीय सेवेचा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी पुन्हा एकदा उपलब्ध

Bangladesh Cricket Board : अखेर बांगलादेश नरमला; बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडून भारताला आमंत्रण

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) (Bangladesh Cricket Board) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसी) पत्र लिहून कळवले आहे की,