चार महिने पगार नाही; सण कसे साजरे करायचे?

महापालिकेकडून जानेवारीपासून देयके मंजुरीला विलंब


मुंबई : जागेश्वरीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना मागील चार महिन्यांपासून वेतनच देण्यात आलेले नाही. त्यातच आता सणासुदीचे दिवस असल्याने आर्थिक अडचणीचा सामना करीत असलेल्या कर्मचाऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे जोपर्यंत वेतन मिळणार नाही, तोपर्यंत काम करणार नाही, असा पवित्रा घेत ट्रॉमा सेंटरमधील जवळपास २०० डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले आहे.


चार महिने पगार नाही; सण कसे साजरे करायचे? असा टाहो कर्मचाऱ्यांकडून फोडला जात आहे. ट्रॉमा केअरमध्ये २०१३ पासून कार्यरत असलेल्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणत्याच कंत्राटदाराने किमान वेतन कायद्यानुसार वेतन दिलेले नाही. त्यातच १ जानेवारीपासून या कर्मचाऱ्यांचे कंत्राट नवीन कंपनीला देण्यात आले आहे.


मात्र तेव्हापासून ही कंत्राटदार कंपनी कर्मचाऱ्यांना विलंबाने वेतन देत आहे. एप्रिलपासून जुलैपर्यंतच्या कामाचे वेतनच या कंत्राटदाराकडून देण्यात आलेले नाही. या महिन्यात रक्षाबंधन, दहीहंडी, गणेशोत्सव हा सणासुदीचा काळ आहे. अनेक कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवासाठी गावी जायचे आहे. चार महिन्यांपासून वेतनच न मिळाल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.


कार्यादेशाविनाच कंत्राटदाराला काम
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसंदर्भात जानेवारीमध्ये कंत्राट काढण्यात आले. निवड झालेल्या कंत्राटदाराला कंत्राट न देता राजकीय नेते व अधिकाऱ्यांच्या संगनमताने अन्य कंत्राटदारालाच कंत्राट देण्यात आले. मात्र या कंत्राटदाराला कार्यादेश न देताच काम सुरू करण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात त्याची देयके काढण्यात न आल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले होते. यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यावर कूपर रुग्णालयाचे तत्कालिन अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी चौकशी केली असता त्याला कार्यादेश दिले नसल्याचे लक्षात आले.

Comments
Add Comment

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार

हरित बंदर विकास विषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत मंत्री नितेश राणे यांची सविस्तर चर्चा मुंबई : नेस्को गोरेगाव

बोगस आधार कार्ड प्रकरणी आ. रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड तयार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी

मोबाईल ग्राहकवाढीत जिओ आघाडीवर; एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर

रायगड : महाराष्ट्रात मोबाईल ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत असून, सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओने सर्वाधिक

मुंबईतील खासगी कोचिंग क्लासना लावणार चाप! तपासणीसाठी समिती गठित

मुंबई : मुंबई शहरात सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासची तपासणी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने सर्व संबधित

शिल्पा शेट्टीच्या आईची तब्येत अचानक बिघडली, लीलावती रुग्णालयात दाखल...

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती

मुंबईकरांचा प्रवास गारेगार , आजपासून २० वातानुकूलित बसमार्ग सुरू

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व