टीटीएफ २०२५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा सहभाग महाराष्ट्राचे दालन ठरले ‘सर्वोत्कृष्ट’

  18

मुंबई : वांद्रे येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे  ‘ट्रॅव्हल ट्रेड फेअर २०२५’  (टीटीएफ) या पर्यटनाशी निगडीत प्रदर्शनाचे  मे. फेअरफेस्ट मीडिया यांच्याद्वारे आयोजन करण्यात आले होते. जागतिक स्तरावर पर्यटनाला चालना देण्यासाठी दरवर्षी मुंबईत तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. यंदा हे प्रदर्शन ११  ते १३ ऑगस्ट दरम्यान वांद्रे कुर्ला संकुल येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडले.

महाराष्ट्र राज्यात प्रदेशनिहाय असलेली पर्यटन स्थळांची माहिती देखील ‘टीटीएफ’च्या माध्यमातून विविध घटकांपर्यत पोहोचविण्यात आली. या माध्यमातून विविध पर्यटन क्षेत्रातील भागधारकांना पर्यटनवाढीसाठी नक्कीच लाभ होणार आहे, या प्रदर्शनात महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने १०० चौरस फूट दालन उभारुन सहभागी होऊन महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राशी निगडीत ३५ हून अधिक भागधारकांना महाराष्ट्र दालनात सामावून घेऊन पर्यटन सेवांविषयी माहिती पर्यटक / व्यावसायिकांना उपलब्ध करुन दिली. यात टूर ऑपरेटर, रिसोर्ट, कृषी पर्यटन केंद्र, वन्यजीव पर्यटन ऑपरेटर, कॅराव्हॅन पर्यटन ऑपरेटर, सहल मार्गदर्शक आणि अन्य पर्यटन व्यावसायिकांचा सहभाग होता. यावेळी महाराष्ट्र दालनाला पर्यटन क्षेत्रातील विविध स्तरांतील घटकांनी भेट दिली, तसेच महाराष्ट्र पर्यटन आणि सेवांविषयी अधिक जाणून घेण्याची रुचीही दाखविली.

या प्रदर्शनामुळे राज्यातील विविध पर्यटन क्षेत्र, त्या ठिकाणी जाण्याची सोय, उपलब्ध सेवा सुविधा इत्यादी माहिती पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यात आली. या दालनात पर्यटन स्थळांची माहिती व पर्यटन व्यावसायिकांशी परस्पर संवाद साधण्याची संधी उपलब्ध झाल्याने भागधारकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले.

टीटीएफ प्रदर्शनात दरवर्षी ५०० प्रदर्शक आणि १० हजारांहून अधिक भागधारक सहभाग घेतात.  या ट्रॅव्हल ट्रेड फेअरमध्ये पर्यटन क्षेत्राच्या विस्तारासाठी देश-विदेशातील अनेक भागधारकांची दालने असतात. देश-विदेशातील पर्यटन क्षेत्रातील परस्पर व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करणे व पर्यटनाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

महाराष्ट्राचे दालन ठरले सर्वोत्कृष्ट

या प्रदर्शनात महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या दालनाला ‘ट्रॅव्हल ट्रेड फेअर २०२५’ यांच्याकडून सर्वोत्कृष्ट दालनाचा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र पर्यटन विभागाने पर्यटन क्षेत्रातील आपली ओळख अधोरेखित केली आहे.

पर्यटन क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी उत्तम व्यासपीठ

– पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे

महाराष्ट्र पर्यटन विभागाने या प्रदर्शनात सहभाग घेऊन या माध्यमातून राज्यातील वैविध्यपूर्ण पर्यटनाची बलस्थाने पर्यटन क्षेत्रातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यात आली. महाराष्ट्र राज्यात प्रदेशनिहाय असलेली पर्यटन स्थळांची माहिती देखील ‘टीटीएफ’च्या माध्यमातून विविध घटकांपर्यत पोहोचविण्यात आली. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय भागधारकांनी पर्यटन सेवा, सुविधांची माहिती आदान प्रदान करण्यात आली. या माध्यमातून भागधारकांना पर्यटन क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्यासाठी फायदा होणार आहे, तसेच या माध्यमातून विविध पर्यटन क्षेत्रातील भागधारकांनी पर्यटनवाढीसाठी नक्कीच लाभ होईल, असे पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे यांनी सांगितले.

महाराष्ट्राची जागतिक झेप – पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ.बी.एन.पाटील

‘टीटीएफ’च्या निमित्ताने महाराष्ट्रातील ऐतिहासिक – सांस्कृतिक वारसा, हिल स्टेशन, समुद्रकिनारे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळाची जिवंत उदाहरणे असलेले गड किल्ले, युनेस्को स्थळे असे  वैविध्यपूर्ण पर्यटनविषयक वैशिष्ट्ये असलेल्या स्थळांची माहिती जगभरात पोहोचविण्यासाठी फायदा झाला. शिवाय, महाराष्ट्र राज्याने या प्रदर्शनात सहभाग दर्शविल्याने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील भागधारकांनी महाराष्ट्र जाणून घेण्यासाठी अधिक रुची दाखविली. त्यामुळे येत्या काळात पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र भरारी घेईल, असे पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ.बी.एन.पाटील यांनी सांगितले.
Comments
Add Comment

बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे; मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीडीडी चाळ ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ मुंबई : मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — ॲड. राहुल नार्वेकर

सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे —  नीलम गोऱ्हे मुंबई : विधानपरिषद

लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार

मुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण मुंबई : काही

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा – मंगलप्रभात लोढा

मुंबई : भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या फाळणीच्या दाहकतेचा निषेध करत राज्यातल्या हजारो आयटीआयमध्ये विभाजन

गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदत वाढवली, 'ही' आहे अखेरची मुदत

मुंबई : राज्यात वाहनांबाबत काही महिन्यांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता . १ एप्रिल २०१९ पूर्वी