
इस्लामाबाद: पाकिस्तान आज म्हणजेच १४ ऑगस्टला आपला ७९वा स्वातंत्रदिन साजरा करत आहे. या खास क्षणाला कराची शहरातील आनंद दुखात परावर्तित झाला. सोहळा साजरा होत असताना झालेल्या गोळीबारात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात एक ८ वर्षाची मुलगी आणि एका वरिष्ठ नागरिकाचा समावेश आहे.
स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार, अजीजाबादमध्ये एक छोटी मुलगी गल्लीमध्ये फिरत असताना तिला गोळी लागली तर कोरंगीमध्ये एक व्यक्ती स्टीफनचा मृत्यू झाला.
स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार कराचीच्या अनेक भागांमध्ये गोळीबाराच्या घटना घडल्या. यात लियाकताबाद, कोरंगी, महमूदाबाद, अख्तर कॉली, केमारी, जॅक्सन, बाल्डिया, ओरंगी टाऊन आणि पापोश नगर सारखे मुख्य भाग आहे. तर शरीफाबाद, नॉर्थ नाजिमाबाद, सुरजानी टाऊन, जमान टाऊन आणि लांधीसारख्या भागातही घटना घडल्या.
या गोळीबारात जखमी झालेल्या लोकांवर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तत्परता दाखवत विविध भागांतून २०हून अधिक संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून आधुनिक हत्यारे आणि गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.