अपूर्णत्व

  19


आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य


द्रुष्टीचा निर्माता हा ईश्वर आहे. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट किती सुंदर बनवली आहे, प्रत्येकाचा आकार, रंग, गंध, उपयोगिता वेगवेगळी आहे. साधे फुलाचे उदाहरण घेतले तरी कितीतरी विविध रंगांची, आकारांची, सुगंधांची फुले उपलब्ध आहेत. काही नेहमीच्या ऋतूत तर काही विशिष्ट ऋतुत उमलतात, तसेच फळांचेही आहे. प्रत्येकाचा रंग, आकार, चव वेगवेगळी आहे. सृष्टीच्या या निर्मात्याचे करू तितके कौतुक कमीच आहे.


आपले शरीर ही एक विलक्षण गोष्ट आहे आणि ती निसर्गाच्या चमत्काराचे जणूकाही एक प्रतिबिंब आहे. सृष्टीच्या प्रत्येक निर्मितीमागे एक उद्देश आहे. पृथ्वीवरील प्रत्येक प्राणी, वस्तू हा विविध पैलू आणि शारीरिक सौंदर्याने नटलेला आहे. विधात्याची कल्पनाशक्ती किती अलौकिक असेल याचा प्रत्यय आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. पण यात जेव्हा माणूस स्वतःची तुलना इतरांशी करायला लागतो तेव्हा त्याच्यातील असुरक्षितता वाढीस लागते. प्रत्येकजण वेगळा आहे तेव्हा त्यातील वेगळेपण जपले पाहिजे. आपण नुसते बाह्यरूप पाहतो, त्याने काय परिधान केले आहे, त्याने वा तिने कशाप्रकारे स्वत:चे सौंदर्य वाढविले आहे. आपले फक्त याकडेच लक्ष असते. मग तो व्यक्ती आतून कसा का असेना, दुसऱ्याची सतत निंदा करणारा, स्वार्थी, धूर्त, कपटी हे आजकाल कोणीच पाहत नाही.


आपल्यातील उणिवांचा शोध म्हणजे सुंदर शरीर असे तर मुळीच नसते. रंगाने सावळे आहे, दिसायला कुरूप, शारीरिक व्यंग, शरीरयष्टी योग्य नाही, बोलण्यात आत्मविश्वास नाही म्हणून अशा अनेक स्वत:च्या उणिवा माणसे शोधत बसतात आणि मी असा कसा? माझ्याच बाबतीत असे का झाले? माझे नशीबच बरोबर नाही वगैरे वगैरे ही उणिवांची यादी संपतच नाही. स्वत:वर प्रेम करायचे सोडून स्वत:कडे दुर्लक्ष करू लागतो. “ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान” समाधानी वृत्तीच पाहायला मिळत नाही. श्रीमंत आहे, रंगरूप, पैसा, बंगला, गाडी, नोकर चाकर सगळे आहे तरी अजून मिळाले तर किती छान होईल या ओढीने अजून मिळवतोच आहे आणि समाधान हरवतो आहे.


बाजारात आलेल्या प्रत्येक गोष्टी वापरण्याअगोदर त्याची शहानिशा करून वापरावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण जसे आहोत तसेच छान आहोत. शारीरिक सौंदर्य म्हणजेच सामाजिक आदर्श अशा होऊ घातलेल्या संकल्पनांना आपल्या अस्तित्वाचं मूल्य कमी करण्याची मुभा देऊ नका. सर्वगुणसंपन्न ही छान कल्पना आहे पण सर्वगुणसंपन्न होण्यासाठी आपण आपली मन:शांती ढासळू देत नाही ना याचा प्रकर्षाने विचार होणे गरजेचे आहे. आपली कोणी प्रशंसा करीत नसेल तर तुम्ही तुमची स्वतःच्या सौंदर्याची प्रशंसा करा, स्वतःवर जमेल तितके प्रेम करा. समाजाने बनवलेल्या सौंदर्याच्या कल्पनेमुळे स्वतःचा आत्मसन्मान खच्ची करू देऊ नका. सौंदर्याचे असे कोणतेही नियम नाहीत. तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा. स्वतःतील गुणदोष स्वीकारा. आपल्यातील उणिवांचा स्वीकार करा, जितके आनंदी व समाधानी राहाल तितके तुमचे तुम्हालाच छान वाटेल, कुटुंबातील वातावरणही हलकेफुलके, प्रसन्न राहील. बाह्य अंगापेक्षा अंतर्मन साफ ठेवा, स्वतःशी, कुटुंबाशी प्रामाणिक राहा, नैतिकता सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न करा, समाजाशी बांधिलकी जपा, आपल्यातील अपूर्णत्वाचा नेहमीच सन्मान करा. कारण त्यामुळेच तुम्ही स्वत:च्या नजरेत


Comments
Add Comment

जीवनाचे गणित का चुकते?

जीवन संगीत: सद्गुरू वामनराव पै जगातील बहुतेक सर्व धर्म हे परमेश्वराला मानणारे आहेत. परमेश्वराला मानणारे

मौनात नादब्रह्माच्या लहरीत लोपते ‘मी’

ऋतुराज: ऋतुजा केळकर नाद’ म्हणजे केवळ कानांनी ऐकण्याचा अनुभव नाही तर तो अस्तित्वाच्या गाभ्यातून उठणारा आदिम

मिथ्या अहंकार सोडी जीवा...!

मनाचा गाभारा : अर्चना सरोदे संसार म्हणजे मुले-बाळे, घरदार नव्हेत. संसाररूपी सर्पाचे अहं व मम हे दोन विषारी दात

ब्रह्मर्षी वशिष्ठ

भारतीय ऋषी: डॉ. अनुराधा कुलकर्णी शरद पौर्णिमेची रात्र होती. सरस्वती नदीकाठचा निसर्गरम्य प्रदेश शुभ्र चांदण्यात

जन्माष्टमीनंतर 'या' ३ राशींचे नशीब चमकणार! १७ ऑगस्टपासून सुरू होणार सुवर्णकाळ

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्यदेव लवकरच आपलं नक्षत्र बदलणार आहे. जन्माष्टमीनंतर १७ ऑगस्ट

आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी, पाहा कधी आहे चंद्रोदय

मुंबई: आज मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण महिन्यातील अंगारकी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. मंगळवारी