Thursday, August 14, 2025

अमेरिकेत आणखी एका हिंदू मंदिरावर हल्ला

अमेरिकेत आणखी एका हिंदू मंदिरावर हल्ला

वॉशिंग्टन : अमेरिकेतील एका हिंदू मंदिरावर पुन्हा एकदा वांशिक द्वेषाच्या पार्श्वभूमीवर हल्ला करण्यात आला आहे. ही घटना अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील ग्रीनवूड येथे घडली आहे, जिथे बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (बीएपीएस)च्या स्वामीनारायण मंदिराच्या मुख्य साईनबोर्डची तोडफोड करण्यात आली आणि त्यावर भारतविरोधी मजकूर स्प्रे पेंटने लिहिला गेला.


या घटनेचा शिकागोतील भारताच्या महावाणिज्य दूतावासाने या घटनेचा तीव्र शबदात निषेध केला आणि म्हणलं कि, “ग्रीनवूड, इंडियाना येथील बीएपीएस स्वामीनारायण मंदिराच्या मुख्य साईनबोर्डाचा अवमान निंदनीय आहे.महावाणिज्य दूतावासाने आपल्या एक्सवर पोस्टमध्ये म्हटले आहे, “वाणिज्य दूतावास समुदायाच्या संपर्कात आहे आणि या प्रकरणी त्वरीत कारवाई व्हावी म्हणून कायदा अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. आज महावाणिज्यदूतांनी ग्रीनवूडचे सन्माननीय महापौर, भक्तगण आणि स्थानिक नेतृत्व यांच्या एका सभेला संबोधित केले, ज्यामध्ये एकता, ऐक्य आणि उपद्रव करणाऱ्यांविरुद्ध सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.”


बीएपीएस पब्लिक अफेयर्सने X वरील पोस्टमध्ये म्हटले की, “ही अलीकडील घटना समुदायाच्या धार्मिकद्वेषाविरुद्धच्या निर्धाराला अधिक बळकट करणारी ठरली आहे. एका वर्षात चौथ्यांदा आमच्या मंदिरावर अशा प्रकारचा घृणास्पद हल्ला झाला आहे. ग्रीनवूड, इंडियाना येथील बीएपीएस मंदिरावरील हिंदूविरोधी हेट क्राइमने (द्वेषयुक्त गुन्ह्याने) आमचा निर्धार अधिक दृढ केला आहे. आम्ही धार्मिक द्वेषाविरुद्ध आपल्या भूमिकेत एकत्रित आहोत.”


अमेरिकेचे काँग्रेस सदस्य टॉम सुओजी यांनी देखील या घटनेचा निषेध केला असून, समाजातील लोकांनी द्वेष आणि कट्टरतेपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.अमेरिकेत हिंदू मंदिरांवर वारंवार होणारे हल्ले ही चिंतेची बाब बनली आहे.

Comments
Add Comment