Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

मुसळधार पावसात दुचाकीवर झाड कोसळले आणि...

मुसळधार पावसात दुचाकीवर झाड कोसळले आणि...
नवी दिल्ली : दिल्लीत कालकाजी येथे मुसळधार पावसात दुचाकीवर झाड कोसळले. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. संपूर्ण दिल्लीत सकाळपासूनच जोरदा पाऊस सुरू आहे. सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. यातच कालकाजी परिसरात झाड कोसळून दुर्घटना झाली. कालकाजी परिसरातील दुर्घटनेत जखमी झालेले दोघे हे नात्याने वडील आणि मुलगी आहेत. दुर्घटना कालकाजी ए ब्लॉक हंसराज सेठी मार्गावर झाली. झाड कोसळल्यामुळे एका दुचाकीवर बसलेले दोघे जखमी झाले. तसेच आसपासच्या काही वाहनांचेही नुकसान झाले. झाडाचे लाकूड वजनदार असल्यामुळे पडलेले झाड हटवणे आणि नुकसान झालेल्या वाहनांतील नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढणे हेच आव्हान होते. पोलीस आणि स्थानिकांनी संयुक्तपणे मदतकार्य करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >