स्वातंत्र्य दिनानिमित्त १०९० जणांना शौर्य/सेवा पदके जाहीर, महाराष्ट्राचे मानकरी येथे पहा...

  93

महाराष्ट्रातल्या ०७ पोलिसांना शौर्य पदक, ०३ पोलिसांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक


३९ पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक; अग्निशमन दलातील ०३ जण शौर्य पदकाचे तर ०५ जण गुणवत्तापूर्ण सेवेसाठीच्या पदकाचे मानकरी


गृहरक्षक व नागरी संरक्षण सेवेच्या ०५ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक; सुधारात्मक सेवेचे ०८ जण गुणवत्तापूर्ण सेवेसाठीच्या पदकाचे मानकरी


नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिन - २०२५ निमित्त पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक व नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांच्या एकूण १०९० जणांना शौर्य/सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत.


२३३ जणांना शौर्य पदके (जीएम), ९९ जणांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक (पीएसएम) आणि ७५८ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (एमएसएम) जाहीर करण्यात आले आहे.


पोलीस सेवा- २२६, अग्निशमन सेवा-०६, गृहरक्षक व नागरी संरक्षण -०१


जीवन आणि मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी किंवा गुन्ह्याला अटकाव घालण्यासाठी किंवा गुन्हेगारांना अटक करण्यासाठी असाधारण शौर्य आणि विशिष्ट वीरतापूर्ण कामगिरी या आधारावर शौर्य पदक (जीएम) प्रदान केले जाते. संबंधित अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांचा योग्य विचार करून जोखमीचे मूल्यमापन केले जाते.


२३३ शौर्य पदकांपैकी ५४ पदके नक्षलवाद प्रभावित भागात कार्यरत कर्मींना जाहीर झाली असून १५२ कर्मी जम्मू आणि काश्मीर क्षेत्रातले आहेत. ईशान्यभारत क्षेत्रातील ०३ आणि इतर क्षेत्रातल्या २४ जणांना शौर्यपूर्ण कामगिरीसाठी पदक जाहीर झाले आहे.


शौर्य पदक (जीएम): २३३ शौर्य पदकांपैकी २२६ पदके पोलीस, ०६ पदके अग्निशमन सेवेतील जवान आणि ०१ पदक गृहरक्षक व नागरी संरक्षण सेवेतील जवानाला जाहीर झाले आहे.



सेवा पदके


उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक, सेवेतील विशेष उल्लेखनीय कार्यासाठी दिले जाते आणि संसाधने व कर्तव्यनिष्ठा यांनी वैशिष्ट्यकृत अमूल्य सेवेसाठी गुणवत्तापूर्ण सेवा पदक प्रदान केले जाते.


उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक ९९ जणांना जाहीर झाले असून यात पोलीस सेवेतल्या ८९, अग्निशमन सेवेतील ०५, नागरी संरक्षण व गृहरक्षक सेवेतील ०३ आणि सुधारात्मक सेवेतील ०२ जणांचा समावेश आहे.


गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ७५८ पदके जाहीर झाली असून पोलीस सेवेतल्या ६३५, अग्निशमन सेवेतील ५१, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक सेवेतील ४१ आणि सुधारात्मक सेवेतील ३१ जणांचा समावेश आहे.


महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातील विविध गौरवांनी सन्मानित विजेत्यांची नावे तसेच तपशील खालील सूची



स्वातंत्र्यदिन २०२५ निमित्त जाहीर शौर्य पदक विजेत्यांच्या नावांची यादी


पोलीस दल


महाराष्ट्र


१. नेताजी सुखदेव बंडगर - सहाय्यक पोलीस निरीक्षक -शौर्यपदक


२. मनोहर कोटला महाका - सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक - शौर्यपदक


३. मनोहर लचमा पेंडम - हेड कॉन्स्टेबल - शौर्यपदक


४. प्रकाश ईश्वर कन्नाके -पोलीस कॉन्स्टेबल - शौर्यपदक


५. अतुल सत्यनारायण येगोळपवार –पोलीस कॉन्स्टेबल - शौर्यपदक


६. हिदायत सददुल्ला खान - पोलीस कॉन्स्टेबल -शौर्यपदक


७. सुरेश लिंगाजी तेलमी -पोलीस कॉन्स्टेबल – शौर्यपदक (मरणोत्तर)



अग्निशमन दल


महाराष्ट्र


१. संतोष रावसाहेब इंगोले - वरिष्ठ अग्निशमन स्थानक अधिकारी -- शौर्यपदक


२. योगेश हनुमंत कोंडावार - अग्निशमन सेवेतील जवान -- शौर्यपदक


३. सुनील सुरेश देसले - अग्निशमन सेवेतील जवान -- शौर्यपदक


स्वातंत्र्यदिन २०२५ निमित्त जाहीर राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदका(पीएसएम)चे मानकरी ठरलेल्यांचे तपशील.



पोलीस दल


महाराष्ट्र :


१. अनिल दशरथराव कुंभारे, पोलिस महानिरीक्षक


२. नविनचंद्र दत्ता रेड्डी, पोलिस आयुक्त,


३. राजेंद्रसिंह प्रभूसिंह गौर, सहाय्यक पोलिस आयुक्त,


गोवा :


१. जुबेर अब्दुल रजाक मोमीन, हेड कॉन्स्टेबल


स्वातंत्र्यदिन २०२५ निमित्त जाहीर अत्युत्कृष्ट सेवा पदक (एमएसएम) अत्युत्कृष्ट सेवा पदक (एमएसएम) चे मानकरी ठरलेल्यांची नावे



पोलीस दल


गोवा :


१. गुरुदास नारायण गावडे, पोलीस अधीक्षक


२. गुरुदास आनंद कदम, पोलीस उपअधीक्षक,


महाराष्ट्र :


१. प्रमोदकुमार परशराम शेवाळे, पोलिस उपनिरीक्षक,


२. दत्तात्रय शंकर ढोले, सहाय्यक पोलिस आयुक्त,


३. संजय सुभाष चंदखेडे, पोलिस उपअधीक्षक,


४. शैलेंद्र रघुनाथ धिववार, सहाय्यक पोलिस आयुक्त,


५. ज्योती अरविंद देसाई, सहाय्यक पोलिस आयुक्त,


६. राजन आबाजी माने, सहाय्यक पोलिस आयुक्त,


७. कैलास मनोहर पुंडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त,


८. नरेंद्र कृष्णराव हिवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त,


९. दिपककुमार चुडामन वाघमारे, पोलिस निरीक्षक,


१०. रवींद्र अंबुजी वाणी, पोलिस निरीक्षक,


११. संदीप शांताराम शिंदे, पोलिस उपनिरीक्षक,


१२. संदीप यशवंत मोरे, पोलिस उपनिरीक्षक,


१३. काशिनाथ दत्ता राऊळ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक,


१४. जोसेफ मेरीयन डिसिल्वा, पोलिस उपनिरीक्षक,


१५. सुनील भाऊराव चौधरी, पोलिस उपनिरीक्षक,


१६. सत्यवान आनंद माशाळकर, पोलिस निरीक्षक,


१७. अशोक सोनू जगताप, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक,


१८. दीपक सुगनसिंग परदेशी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक,


१९. बाळासाहेब यशवंत भलचीम, पोलीस उपअधीक्षक,


२०. आनंदराव मारुती पवार, पोलिस उपनिरीक्षक,


२१. सुरेश दिगंबर कराळे, सहाय्यक पोलिस कमांडंट,


२२. रमेश बबन वेठेकर, सहाय्यक पोलिस कमांडंट,


२३. अनिल कृष्णराव ब्राह्मणकर, पोलीस उपनिरीक्षक,


२४. रमेश नत्थुजी ताजने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,


२५. ओहरसिंग द्वारका पटले, पोलीस निरीक्षक,


२६. उभाष मधुकर हांडगे, पोलीस उपनिरीक्षक,


२७. विश्वास रोहिदास पाटील, पोलीस निरीक्षक,


२८. अविनाश रामभाऊ नवरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,


२९. अनंत विष्णुपंत व्यवहारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,


३०. सतीश भगवान जाधव, पोलीस निरीक्षक,


३१. धोंडीबा माधवराव भुट्टे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,


३२. हर्षकांत काशिनाथ पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक,


३३. प्रमोद कारभारी पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,


३४. राजेंद्र गोपाळराव मोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक,


३५. जितेंद्र जगन्नाथ कोंडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,


३६. संजय दामोदर शिरसाट, सहायक पोलीस उपनिरीक्षक,


३७. संजीव कुमार काशी माथूर, मुख्य पोलीस कॉन्स्टेबल


३८. रमेश खुशालराव कुंभलकर, मुख्य पोलीस कॉन्स्टेबल


३९. आंचल ईश्वरप्रसाद मुद्गल, पोलीस निरीक्षक,



गृहरक्षक आणि नागरी संरक्षण सेवा


गोवा


१. रामचंद्र यशवंत तुळसकर, गृहरक्षक स्वयंसेवक


महाराष्ट्र


१. हेमलता श्रीराम कांबळे, कंपनी कमांडर,


२. राजू गणपत सांबर, कंपनी कमांडर,


३. अनिल गणपत गावित, सहाय्यक उपनियंत्रक,


४. राजेंद्र पुंडलिक शेळके, प्लाटून कमांडर,


५. उमा चंद्रकांत कोळवले, प्लाटून कमांडर,



सुधारात्मक सेवेचे मानकरी


महाराष्ट्र


१. राणी राजाराम भोसले, अधीक्षक,


२. राजाराम रावसाहेब भोसले, अतिरिक्त अधीक्षक,


३. गजानन काशिनाथ सरोदे, उपअधीक्षक,


४. संजय गंगाराम शिवगण, सुभेदार,


५. सुधाकर ओंकार चव्हाण, हवालदार,


६. राजेश मधुकर सावंत, हवालदार,


७. संजय सदाशिव जाधव, हवालदार,


८. विद्या भरत ढेंबरे, तुरुंग शिपाई,


महाराष्ट्रातल्या ०७ पोलिसांना शौर्य पदक, ०३ पोलिसांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक, ३९ पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक; अग्निशमन दलातील ०३ जण शौर्य पदकाचे तर ०५ जण गुणवत्तापूर्ण सेवेसाठीच्या पदकाचे मानकरी; गृहरक्षक आणि नागरी संरक्षण सेवेच्या ०५ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक; सुधारात्मक सेवेचे ०८ जण गुणवत्तापूर्ण सेवेसाठीच्या पदकाचे मानकरी ठरले आहेत.


तर गोव्यातल्या ०१ पोलिसांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक, ०२ पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक प्राप्त झाले आहे.

Comments
Add Comment

किश्तवाडमधील ढगफुटीत ४० हून अधिक जणांचा मृत्यू, १५० जण बेपत्ता

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथील चशोटी गावात गुरुवारी दुपारी १२:३० वाजता ढगफुटी झाली. डोंगरावरून

SIR प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : बिहारमधील SIR प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी करत दिग्गज वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

मुसळधार पावसात दुचाकीवर झाड कोसळले आणि...

नवी दिल्ली : दिल्लीत कालकाजी येथे मुसळधार पावसात दुचाकीवर झाड कोसळले. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले.

Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार, किन्नौर ढगफुटीने उध्वस्त; घरं-गाड्या पुरात गेल्या वाहून

किन्नौर : हिमाचल प्रदेशात निसर्गाने पुन्हा एकदा आपला प्रकोप दाखवला आहे. किन्नौर जिल्ह्यातील ऋषी डोंगरी खोऱ्यात

राहुल गांधींच्या वकिलांचा यु-टर्न: “जीवाला धोका” म्हणणारा अर्ज परत घेणार

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वकिलांनी पुणे येथील न्यायालयात गांधींना वादी

तुमचे ICICI बँकमध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची...

आयसीआयसीआय बँकेचा यूटर्न, बचत खात्यांसाठी किमान शिल्लक मर्यादा केली कमी मुंबई: आयसीआयसीआय बँकेने नुकतीच नवीन