अलिबाग तालुक्यात स्मार्टमीटर बसविण्याला वेग

  22

१५ हजारांहून अधिक मीटर बदलले


ग्राहकांना वीजबिलात घट होण्याची शक्यता


अलिबाग : विविध राजकीय पक्षांसह वीज ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत असतानाही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे अलिबाग तालुक्यात स्मार्टमीटर बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अलिबाग- १ आणि अलिबाग- २ या विभागांमध्ये आतापर्यंत १५ हजारांहून अधिक ग्राहकांचे मीटर बदलून स्मार्ट मीटर लावले गेले आहेत. हे मीटर पोस्टपेड असून, सध्या ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच बिल भरावे लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी काळजी करू नये, असे आवाहन महावितरण कंपनीतर्फे करण्यात आले आहे.


अलिबाग आणि पेण तालुक्यात २२ हजार वीज ग्राहकांकडून स्मार्ट मीटरचा वापर करण्यात येत आहे. राज्यात सर्वत्र स्मार्ट विद्युत मीटरमुळे ग्राहकांमध्ये असंतोष पसरला होता. कारण, हे प्रीपेड स्वरूपाचे असल्याने मोबाईलसारखे रिचार्ज करावे लागतील, तसेच वेळेत रिचार्ज न केल्यास वीजपुरवठा खंडित होण्याची भीती होती. मात्र, त्यानंतरही अलिबागमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. सध्या बसविले जाणारे स्मार्ट मीटर पोस्टपेड आहेत, असे महावितरणच्या अलिबाग विभागीय कार्यालयाकडून सांगण्यात आले.


स्मार्ट मीटर ग्राहकांना कमी दर असताना आपला वीज वापर ऑफ-पीक तासांमध्ये आपल्या सोयीप्रमाणे समायोजित करण्याची परवानगी देतात. त्यामुळे ग्राहकांच्या वीज बिलात घट होण्याची शक्यता वाढते. तसेच स्मार्ट मीटर ग्राहकांना किमतीतील फरकांवर आधारित माहितीपूर्ण निर्णय घेण्यास क्षमता देतात. स्मार्ट मीटरमध्ये होम ऑटोमेशन अग्रणि मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून ऊर्जा व्यवस्थापनाची क्षमता असते, ज्यामुळे ग्राहक आपल्या वीज बिलात बचत करू शकतात.


अलिबाग १ विभागात एकूण १० हजार २९१, तर अलिबाग २ विभागात ४ हजार २६१ ग्राहकांकडे स्मार्ट मीटर लावण्यात आले आहेत, तर पेण विभागातही ८ हजार ९६४ ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवले आहेत. याप्रमाणे तीनही विभागांमध्ये एकूण २२ हजार ५१६ ग्राहकांना मीटर देण्यात आले. यात तीनही विभागांमध्ये एकूण ३ हजार ०५९ नवीन ग्राहकांचा समावेश आहे.


घरगुती वीज वापरणाऱ्या ग्राहकांना विशेषतः ज्यांचा वीज वापर जास्त आहे अशांना वीज दरात कपात झाल्यास मोठा फायदा होऊ शकतो. काही ठिकाणी दिवसा विशिष्ट वेळेत वीज वापरल्यास सवलतही मिळते, जसे की दुपारी एक ते सायंकाळी पाचपर्यंत अनेक कंपन्या त्यांच्या उत्पादनांवर किंवा सेवांवर सवलत देत असल्यामुळे ग्राहकांना कमी किमतीत वस्तू मिळतात.


स्मार्ट मीटर ग्राहकांना किमतीतील फरकांवर आधारित माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करतात, स्मार्ट मीटरमध्ये होम ऑटोमेशन आणि मोबाइल अॅपद्वारे ऊर्जा व्यवस्थापनाची क्षमता असते. म्हणून ग्राहकांनी स्मार्ट मीटरचा फायदा घेऊन आपल्या वीज बिलात
बचत करावी.
- ममता पांडे, (जनसंपर्क अधिकारी, महावितरण)

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, डॉक्टरचा जागीच मृत्यू!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या एका दुःखद अपघातात ३२ वर्षीय डॉक्टर प्रियांका अहिर यांचा मृत्यू झाला. ही

जिल्ह्यातील परहूर गावात नवीन कारागृहाची उभारणी

हिराकोट किल्ल्यातील कारागृहात कैद्यांना अडचणींचा करावा लागतोय सामना अलिबाग : रायगड जिल्ह्याचे मुख्यालय

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न-औषध प्रशासन सज्ज

खाद्य रंगांसह वर्तमानपत्रांचाही वापर न करण्याच्या व्यावसायिकांना सूचना अलिबाग : गणेशोत्सवाच्या

नगरपालिकेत समाविष्ट होण्यास वरसोली ग्रामपंचायत उत्सुक

कुरूळ ग्रामपंचायत अनुत्सुक; हद्दवाढीबाबत मागविल्या हरकती अलिबाग : नगरपालिकेच्या हद्दीलगतच्या

Accident News: किल्ले रायगडाच्या पायथ्याशी एस. टी. बसेसची भीषण धडक, दोन चालकांसह ९ प्रवासी जखमी

महाड: महाड एसटी बस आगारातून सुटलेली महाड सांदोशी आणि माणगाव वरून आलेली माणगाव किल्ले रायगड या दोन एस. टी. बसेसची

स्मार्ट मीटरची जबरदस्ती झाल्यास गुन्हे

कर्जत : कर्जत तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. या समस्येबाबत शनिवारी ‘कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष