
दिग्दर्शक संजय अमर म्हणतात, '' ‘तूच आहे’ हे प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी जाणवलेली वेदना, ओढ आणि एकटेपणाचा भावनिक प्रवास उलगडणारे गाणे आहे. सुबोध भावे यांचा अभिनय आणि सोनू निगम यांचा आवाज ही या गाण्याची खरी बाजू आहे.”
निर्माते रजत अग्रवाल म्हणतात, “या गाण्यात चित्रपटातील एक महत्त्वाचा भावनिक क्षण सादर केला आहे. त्यातही सोनू निगम यांच्यासारख्या दिग्गज गायकाचा सहभाग आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”
‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ चे लेखन, छायांकन आणि दिग्दर्शन संजय अमर यांनी केले आहे. रजत मीडिया एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटात सुबोध भावे, रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या दमदार भूमिका पाहायला मिळतील. विनोद आणि प्रेमाचा अद्वितीय मेळ असलेल्या या सिनेमाचा टिझर आधीच चर्चेत आला होता आणि आता ‘तूच आहे’ गाण्यानेही प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. हा चित्रपट २२ ऑगस्ट २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.