प्रतिनिधी: आरबीआयने भारतीय रुपयाला जागतिक बाजारपेठेत मूल्यवर्धित चलन बनवण्याचे ठरवले. त्यामुळे गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी आरबीआयने काही मूलभूत बदल करण्याचे ठरविले. या निर्णयाचा फायदा विशेषतः जागतिक गुंतवणूकदारांना हो ऊ शकतो. आता परदेशी गुंतवणूक थेट आता भारतातील सिक्युरिटी असलेल्या व्होस्ट्रो खात्यातून (Vostro Account) अधिकची रक्कम केंद्र सरकारच्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. व्होस्ट्रो खात्यातून परदेशी खातेदारांना विदेशी चलनाशिवाय भारतीय चलनातून व्यवहार करता येतो. आरबीआयने परिपत्रक काढून या निर्णयाविषयी माहिती दिली आहे. भारताबाहेर काही कारणा निमित्त राहणारा व्यक्ती भारतीय चलनाच्या माध्यमातून व्यापारी चलनी सेटलमेंट करू शकतो. आरबीआयच्या या स्पेशल रू पी व्होस्ट्रो अकाऊंट (SRVA) खात्यातून संबंधित आंतरराष्ट्रीय खातेदारांना व्यवहार करण्याची मुभा असते. त्यामुळे या खातेदारांना आता अतिरिक्त रक्कम सरकारी सिक्युरिटीजमध्ये गुंतवता येईल. ज्यामुळे सरकारला फायदा होऊन अतिरिक्त निधी उपलब्ध हो ईल.
२०२२ साली आरबीआयने व्होस्ट्रो खाते सुरू करण्याची परवानगी आंतरराष्ट्रीय खातेदारांना दिली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चलनाला आंतरराष्ट्रीय बाजारात महत्व मिळू शकेल या उद्देशाने निर्णय घेण्यात आला. या पद्धतीच्या खातेदारांना परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (Foreign Institutional Investors FII) या श्रेणीत नोंदणी न करताही सरकारी बाँडमध्येही गुंतवणूक करता येते. पूर्वी ट्रेजरी बिलात १ वर्षांपर्यंत गुंतवणूक करण्याची परवानगी दिली असली तरी ती शिल्लक रक्कमेच्या ३०% होती आता ही मर्या दा काढून टाकण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे.
उपलब्ध माहितीनुसार आरबीआयने जागतिक पातळीवरील ३० देशांच्या १२३ बँकाशी भागीदारी केल्याने १५६ व्होस्ट्रो खाती भारतातील २६ बँकेमार्फत उघडली गेली होती. ही माहिती संसदेत मंत्रीमंडळाने गेल्या वर्षी दिली होती.