
सिस्टीम ऑडीट प्रकरणांत आरबीआयने ही मोठी कारवाई नोव्हेंबर २०२२ मध्ये केली होती. अनेक खात्यांची केवायसी अनियमितता असतानाही व्यवहार केल्याचे आढळल्याने नियामकाने कारवाई केली. नुकत्याच आरबीआयच्या पत्रकात म्हटले आहे की,'आरबी आयच्या पत्रात नमूद केले आहे की नोव्हेंबर २०२२ मध्ये पीपीएसएलवर लावण्यात आलेले व्यापारी ऑनबोर्डिंग निर्बंध मागे घेण्यात आले आहेत, परंतु फर्मला सायबर सुरक्षेसह सिस्टम ऑडिट करण्यासाठी अधिकृत करण्यात आले आहे.'त्यामुळे आरबीआयने हे निर्बंध मागे घेतले असल्याने आता कंपनीला ऑडिट रिपोर्ट पुढील सहा महिन्यांच्या आत आरबीआयला सोपवणे बंधनकारक असणार आहे. २०२२ मध्ये झालेल्या प्रतिबंधात्मक कारवाईनंतर पेटीएम पेमेंट बँकेने अस्तित्त्वात असलेल्या ग्राहकांच्या व्यवहारावर अथ वा कंपनीच्या कामकाजावर कुठलाही परिणाम होणार नाही केवळ त्यांना थर्ड पार्टी अँग्रीगेटर (Third Party Aggregator) म्हणून नाकारल्याने पेमेंट सिस्टीमसाठी दुसऱ्या बँकेकडे वळवण्यात आले होते.
नुकतीच पेटीएमने आपली कंपनी संपूर्णपणे स्वदेशी केली होती. चीनी भागभांडवलातून कंपनी बाहेर पडल्याने बाजारात गुंतवणूकदारांना या विविध कारणांमुळे आश्वासकता निर्माण झाली. वॉरेन बटाच्या बर्कशायर हॅथवेप्रमाणेच, अँटफिननेही पेटीएममध्ये आपला हिस्सा तोट्यात विकला ब्लॉक डील माध्यमातुन विकला होता. बहुतांश ब्रोकरेज व शेअर बाजार विश्लेषकांनी 'Buy' Call दिल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी दिसत आहे. गेल्या एका महिन्यात त्याच्या शेअरची किंमत १५% वाढली आहे आणि गेल्या सहा म हिन्यांत जवळपास ५०% वाढली आहे. बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात या शेअरने ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे, परंतु तो त्याच्या आयपीओ मूळ किमती प्राईज बँडपेक्षा २१५० च्या खालील पातळीवर आहे.