Minta Devi: काँग्रेसची पोलखोल! बिहारमधील '१२४ वर्षीय' मिंटा देवी कॅमेऱ्यासमोर आल्या, काय म्हणाल्या पहा...

बिहार: बिहारमध्ये राहणाऱ्या मिंटा देवीचा फोटो आणि नावाचा वापर करून काँग्रेसने मंगळवारी आंदोलन केले होते. या आंदोलनात प्रियांका गांधी आणि राहुल गांधी या दोघांसह अनेक लोकांनी मिंटा देवी यांचा फोटो असलेला टी शर्ट परिधान केला होता.  ज्यामुळे मिंटा देवी हे नाव चर्चेत आलं. दरम्यान मिंटा देवी आता समोर आल्या असून त्यांनी काँग्रेसचा खोटेपणा उघड केला आहे.  राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी कुणाला विचारुन माझा फोटो वापरला? असा सवाल मिंटा देवी यांनी या दोघांवर संताप व्यक्त केला आहे.



कोण आहेत मिंटा देवी?


निवडणूक आयोगाच्या नोंदींनुसार, मिंटा देवी या बिहारमधील सिवान जिल्ह्यातील दरौंदा विधानसभा मतदारसंघातील नोंदणीकृत मतदार आहेत. त्यांच्या पतीचे नाव धनंजय कुमार सिंह असून, मतदार यादीत मिंटा देवींचे वय १२४ वर्षे दाखवण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे, मिंटा देवी यांनी २०२४ मध्ये पहिल्यांदाच मतदान केल्याचं सांगितलं जात आहे. अरजानिपूर येथील कन्या माध्यमिक विद्यालय हे त्यांचे मतदान केंद्र आहे.



काय म्हणाल्या मिंटा देवी?




माझी संमती न घेता आंदोलनासाठी परिधान करण्यात आलेल्या टीशर्टवर फोटो छापणारे ते कोण आहेत? राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी टीशर्टवर माझा फोटो छापण्याआधी माझी परवानगी का घेतली नाही? ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना मिंटा देवी यांनी संताप व्यक्त केला आहे. मिंटा देवी म्हणाल्या माझी जन्मतारीख १५ जुलै १९९० अशी आहे. तरीही माझं वय १२४ वर्षे कसं काय लिहिलं? हे लोक कशी कामं करतात त्यांनाच माहीत. मी माझं आधार कार्ड आणि आवश्यक सगळी कागदपत्रं सादर केली होती. तरीही मतदार यादी तयार करणाऱ्यांनी जो घोळ घालायचा तो घातलाच. यांनी काय झोपेत माझी जन्मतारीख लिहिली का? असं म्हणत मिंटा देवींनी संताप व्यक्त केला आहे. तसेच त्या पुढे म्हणाल्या "माझं वय १२४ छापण्यात आलं ही चूक आहेच. पण काँग्रेसने कुणाला विचारुन माझा फोटो छापला? त्यांनी हे करण्याआधी माझी परवानगी का घेतली नाही?" असा सवाल त्यांनी केला.



यापूर्वी हिंदी अभिनेते के के मेनन यांनी देखील त्यांचा एक जुना व्हीडीओ त्यांना न विचारता कॉँग्रेसने त्यांच्या आंदोलनासाठी सोईस्कररित्या एडिट करून वापरला असल्याचा आरोप केला होता.

Comments
Add Comment

भारतामधून कोणत्या शेजारील देशांमध्ये रेल्वे धावते? प्रवासासाठी 'हे' पुरावे आवश्यक

नवी दिल्ली: भारतामधून काही शेजारील देशांमध्ये रेल्वेने प्रवास करणे शक्य आहे, ज्यामुळे ग्रामीण सौंदर्याचा

VK Karur Stampede : विजय थलापतीला अटक होणार? करूर चेंगराचेंगरी प्रकरणात टीव्हीके जिल्हा सचिवांना बेड्या; पोलिसांची मोठी कारवाई

करूर : अभिनेता आणि तमिलगा वेत्री कळ्ळगम पक्षाचा नेता विजय थलापती एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

'अमेरिकेच्या दबावापोटी यूपीए सरकारने पाकिस्तान विरोधात कारवाई टाळली'

नवी दिल्ली : मुंबईवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला. या मोठ्या प्रमाणात

आरएसएसच्या शताब्दी उत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विशेष टपाल तिकीट व नाण्याचे प्रकाशन होणार !

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑक्टोबर २०२५ रोजी डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथे राष्ट्रीय

राजस्थानमध्ये लिथियमचा साठा सापडला

नवी दिल्ली : राजस्थानमधील नागौर येथील देगाना प्रदेशात लिथियमचा मोठा साठा सापडला आहे. या खनिजाला पांढरे सोने

मेलोनींच्या आत्मचरित्राला पंतप्रधान मोदींची प्रस्तावना

नवी दिल्ली : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या ‘आय एम जॉर्जिया - माय रूट्स, माय प्रिन्सिपल्स’ या