
बिहार: बिहारमध्ये राहणाऱ्या मिंटा देवीचा फोटो आणि नावाचा वापर करून काँग्रेसने मंगळवारी आंदोलन केले होते. या आंदोलनात प्रियांका गांधी आणि राहुल गांधी या दोघांसह अनेक लोकांनी मिंटा देवी यांचा फोटो असलेला टी शर्ट परिधान केला होता. ज्यामुळे मिंटा देवी हे नाव चर्चेत आलं. दरम्यान मिंटा देवी आता समोर आल्या असून त्यांनी काँग्रेसचा खोटेपणा उघड केला आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी कुणाला विचारुन माझा फोटो वापरला? असा सवाल मिंटा देवी यांनी या दोघांवर संताप व्यक्त केला आहे.
कोण आहेत मिंटा देवी?
निवडणूक आयोगाच्या नोंदींनुसार, मिंटा देवी या बिहारमधील सिवान जिल्ह्यातील दरौंदा विधानसभा मतदारसंघातील नोंदणीकृत मतदार आहेत. त्यांच्या पतीचे नाव धनंजय कुमार सिंह असून, मतदार यादीत मिंटा देवींचे वय १२४ वर्षे दाखवण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे, मिंटा देवी यांनी २०२४ मध्ये पहिल्यांदाच मतदान केल्याचं सांगितलं जात आहे. अरजानिपूर येथील कन्या माध्यमिक विद्यालय हे त्यांचे मतदान केंद्र आहे.

नवी दिल्ली: भाजपने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांच्या मतचोरी आरोपांना प्रत्युत्तर देताना "सोनिया गांधी ...
काय म्हणाल्या मिंटा देवी?
View this post on Instagram
माझी संमती न घेता आंदोलनासाठी परिधान करण्यात आलेल्या टीशर्टवर फोटो छापणारे ते कोण आहेत? राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी टीशर्टवर माझा फोटो छापण्याआधी माझी परवानगी का घेतली नाही? ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना मिंटा देवी यांनी संताप व्यक्त केला आहे. मिंटा देवी म्हणाल्या माझी जन्मतारीख १५ जुलै १९९० अशी आहे. तरीही माझं वय १२४ वर्षे कसं काय लिहिलं? हे लोक कशी कामं करतात त्यांनाच माहीत. मी माझं आधार कार्ड आणि आवश्यक सगळी कागदपत्रं सादर केली होती. तरीही मतदार यादी तयार करणाऱ्यांनी जो घोळ घालायचा तो घातलाच. यांनी काय झोपेत माझी जन्मतारीख लिहिली का? असं म्हणत मिंटा देवींनी संताप व्यक्त केला आहे. तसेच त्या पुढे म्हणाल्या "माझं वय १२४ छापण्यात आलं ही चूक आहेच. पण काँग्रेसने कुणाला विचारुन माझा फोटो छापला? त्यांनी हे करण्याआधी माझी परवानगी का घेतली नाही?" असा सवाल त्यांनी केला.

मुंबई: काँग्रेस पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये 'स्पेशल ऑप्स' या वेब सीरिजमध्ये हिम्मत सिंगची भूमिका ...
यापूर्वी हिंदी अभिनेते के के मेनन यांनी देखील त्यांचा एक जुना व्हीडीओ त्यांना न विचारता कॉँग्रेसने त्यांच्या आंदोलनासाठी सोईस्कररित्या एडिट करून वापरला असल्याचा आरोप केला होता.