आत्महत्या रोखण्यासाठी जागरूकता गरजेची

  46

वार्तापत्र: मध्य महाराष्ट्र


देशात आत्महत्येचं प्रमाण दिवसागणिक वाढताना दिसत आहे. देशातच नाही तर जगभरात प्रत्येक वर्षाला जवळपास ८,५०,००० लोक आत्महत्या करतात, तर १५ मिलियन लोक आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, १५ ते १९ वर्षे या वयोगटातील आत्महत्या हे मृत्यूचं प्रमुख कारण आहे. आत्महत्येमागे नैराश्य, असहाय्यता आणि जीवन व्यर्थ असल्याची भावना असते. यामागे वैद्यकीय कारणंही असतात. आत्महत्या अर्थात स्वतःचा जीव घेणे ही वृत्ती. तणाव, दु:ख, निराशा, अपयश, एकाकीपणा, अपमान आणि गरिबी, वृद्धत्व, गंभीर आजार आत्महत्येची प्रमुख कारणं म्हणता येतील. समस्या सोडवण्याचा कोणताही मार्ग नाही असे वाटणारे लोक आत्महत्या करतात. कार आत्महत्या हा वेदना संपवण्याचा एकमेव मार्ग आहे; परंतु तुम्ही सुरक्षित राहण्यासाठी पावले उचलू शकता आणि पुन्हा तुमचे जीवन आनंदाने जगू शकता.


आत्महत्या हा मानसिक आजार आहे. दैनंदिन जीवनात आत्महत्या ही एक गंभीर समस्या आहे. एका रिसर्चमध्ये केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, १५ ते ३५ वर्षे वयोगटातील पुरुष आणि स्त्रिया जास्त आत्महत्या करतात. छोटी छोटी संकटे आली तरी हल्ली लोकांच्या मनात आत्महत्येचे विचार मनात घोंगावू लागतात. समस्या, दु:ख प्रत्येकाच्या वाट्याला असतात. त्यावर मात करायची तयारी ठेवली पाहिजे. आत्महत्या करून संकटे संपत नसतात. एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षांत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येमुळे वाढत्या आत्महत्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता वाढत्या आत्महत्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज झाली आहे. कोणाचेही मन ओळखणे तशी अवघड गोष्ट असते. मनात काय विचार सुरू आहेत हे ओळखणे तसे कठीणच आहे. आपल्याकडे लोक काय म्हणतील, आपल्यातील दोष किंवा आपल्यातला कमकुवतपणा दुसऱ्यासमोर दाखवायचा नाही अशी संस्कृती आहे. मानसिक आजारांबद्दल अजूनही संकोच, लाज किंवा नकारात्मकता प्रत्येकामध्ये असते. कामाचा ताण, स्पर्धा, अपेक्षा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणाला काही सांगायचे नाही हाच मोठा धोका आहे. त्यामुळे दरवर्षी लाखो लोक मानसिक ताण, सामाजिक दबाव किंवा एकटेपणामुळे टोकाचे पाऊल उचलत आपला जीव गमावतात. बहुतेक लोकांना जगायचे असते, पण त्यांची परिस्थिती किती भयानक आहे आणि त्यांना पर्यायी उपाय दिसत नसल्याने ते अडकलेले वाटतात. काही लोकांसाठी, तर्क करण्याची आणि समस्या सोडवण्याची सकारात्मक उपाययोजना करण्याची त्यांची क्षमता प्रभावित होते, परिणामी आवेगपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते. दहावी, बारावी परीक्षेचीत अपयश आले तरी मुलांच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागतात. ही चांगली गोष्ट नाही. दहावी, बारावी म्हणजे पूर्ण आयुष्य नसते. पुढे भरपूर आयुष्य असतं. हे समजावून सांगण्याची गरज असते. आज आपल्या राज्यात आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक आहे. विशेषतः ते तरुणांमध्ये जास्त आहे. नैराश्य, चिंता, एकटेपणा हे दिसत नसले तरी ते आजारच आहेत. वारंवार उदास राहणे, सातत्याने निराशावादी बोलत राहणे, स्वतःला इजा करण्याबद्दल बोलणे, सामाजिक माघार घेणे, एकटे राहण्याची इच्छा व्यक्त करत राहणे. मानसिक आरोग्याच्या समस्या, नोकरी गमावणे, कर्ज, कौटुंबिक तणाव, आधाराचा अभाव, सामाजिक संपर्काचा अभाव असतो. यामुळे आत्महत्यांचे विचार मनात येत असतात. एकमेकांशी बोलण्यापेक्षा किंवा गोष्टी शेअर करण्यापेक्षा आयुष्य संपवण्याचे धाडसी पाऊल उचलले जाते. ही समाजासाठी धोक्याची घंटा आहे.


मुळात कोणतीही समस्या ही कायमस्वरूपी नसते हे लक्षात घेतले पाहिजे. कारण अंधारानंतर प्रकाश हा असतोच. त्यामुळे एक नवी पहाट येतेच. त्यामुळे कुठल्याही समस्येवर आत्महत्या हा तोडगा नाही. कोणतीही समस्या सोडविण्याकरिता प्रयत्न करत राहणे गरजेचे असते. त्या प्रयत्नांना यश मिळेलच असा सकारात्मक विचार करणे गरजेचे असते. या सकारात्मतेमुळेच वेगळी ऊर्जा मिळते. त्यानंतर एक वेगळाच उत्साह येत असतो. आजच्या डिजिटल युगात संवाद कमी झाला आहे. पण, ‘संवाद' हा आत्महत्या रोखण्यासाठीचे उत्तम औषध आहे. आपल्या अडचणी, समस्या एकमेकांना सांगितल्या तर त्या सोडवण्यासाठी मदत होते. त्यामुळे जवळचे मित्र, जवळची व्यक्ती यांच्याशी संवाद ठेवणे महत्त्वाचे असते. यामुळे मनावरील ताणही हलका होतो. तसेच ताण असेल तर समुपदेशक, मानसोपचार तज्ज्ञ यांचा सल्लाही घेणे महत्त्वाचे ठरते. तुम्ही एकटे नाही, कोणतीही समस्या ही कायमस्वरूपी नसते. त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण तयार करणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागृत करणे गरजेचे असते. त्यामुळे त्यांची सामाजिक, शैक्षणिक प्रगती सुधारण्यास मदत होते, असे आशेचे संदेश देणेही त्यांच्यामध्ये बळ निर्माण करू शकतात. त्यामुळे असे आशेचे संदेश देणे गरजेचे आहे. आजच्या स्पर्धेच्या काळात शाळेतल्या विद्यार्थ्यांपासून ते तरुण आणि ज्येष्ठांपर्यंत तणावाचे प्रमाण अधिक आहे. हा तणाव दूर करण्यासाठी योग्य पद्धतीने समुपदेशन होणे गरजेचे आहे. तणावाविरुद्ध लढाई जिंकणे महत्त्वाचे आहे. आत्महत्येचे विचार टाळण्यासाठी सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे आहे. कोणाला मदतीची गरज असेल तर त्यासाठी तत्परता दाखविली तर आपल्यासोबत कोणीतरी आहे, अशी आत्मीयता त्यांच्यामध्ये निर्माण होते. त्याच्यातून त्यांना ताण कमी होण्यास मदत होते. शारीरिक आरोग्याइतकीच मानसिक आरोग्याची काळजी घेणे ही आता काळाची गरज बनली आहे. त्यामुळे आत्महत्येसारख्या गंभीर विषयाबाबत जागरूकता निर्माण करणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे.


समस्येबद्दल, जागरूकता वाढवण्याबद्दल नाही तर ती आत्महत्या समस्येला कारणीभूत ठरणाऱ्या समस्यांबद्दल जागरूकता वाढवण्याबद्दल आहे. राष्ट्रीय आत्महत्यांचा डेटा नोंदवल्या गेलेल्या शेवटच्या काळात ३,००० हून अधिक लोकांनी आत्महत्या केल्या हे जाणून घेणे एक गोष्ट आहे. चिंता आणि ताणतणावांना दाबून ठेवणे (कारण कोणीतरी असे मानते की जर ते याबद्दल बोलले तर त्यांना दोषी ठरवले जाईल किंवा कमकुवत पाहिले जाईल) आत्महत्येच्या दरात वाढ होण्यास हातभार लावते हे जाणून घेणे दुसरी गोष्ट आहे. त्यामुळे आत्महत्येचे प्रमाण कमी करण्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियाच्या चिंताजनक आत्महत्येच्या आकडेवारीबद्दल जागरूकता वाढवणे ही एक चांगली सुरुवात आहे. बदल प्रभावी होण्यासाठी, आपल्यापैकी अधिकाधिक लोकांना आत्महत्येच्या दरामागील कारणे समजून घेणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंच : न्याय आणि विकासाची नवी संधी

सर्किट बेंचसाठी चार न्यायमूर्तींच्या नेमणुका करण्यात आल्या असून एक डिव्हिजनल बेंच ज्यांच्याकडे रिट याचिका,

रायगड पालकमंत्र्यांची माळ

गेल्या आठ महिन्यांत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे होणार की शिवसेना

गडचिरोलीचा अपघात आणि हाणामारी

आज-काल महामार्गांवर किंवा मोठ्या रस्त्यांवर ट्रकसदृश वाहनांनी भरधाव गाड्या चालवणे आणि त्यात निरपराधांचे प्राण

मराठवाड्यात रेल्वे प्रकल्प सुपरफास्ट

व्यापारासाठी लागणाऱ्या मालाची ने-आण करण्यासाठी जवळचा मार्ग तयार होईल. तसे पाहिले तर मराठवाड्याच्या या मागण्या

ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी

वार्तापत्र: उत्तर महाराष्ट्र २४ हजारांहून अधिक थकबाकीदारांच्या जमिनी वा मालमत्तांवर बोजे चढवण्याचे आदेश

व्यापार आणि बंदर विकासावर व्यूहात्मक भर

सर्वाधिक सागरी मार्ग असलेल्या देशांमध्ये भारताचा सोळावा क्रमांक लागतो. जागतिक आर्थिक महासत्ता बनण्याच्या