
मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्यदेव लवकरच आपलं नक्षत्र बदलणार आहे. जन्माष्टमीनंतर १७ ऑगस्ट रोजी सूर्यदेव मघा नक्षत्रात प्रवेश करतील. मघा नक्षत्राचा स्वामी केतू ग्रह आहे. त्यामुळे सूर्यदेवाचं केतूच्या नक्षत्रात येणं काही राशींसाठी खूप शुभ ठरू शकतं. या काळात त्यांच्या करिअर आणि व्यवसायात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हा काळ लाभदायक ठरेल.
कर्क रास
सूर्यदेवाचं नक्षत्र परिवर्तन कर्क राशीच्या लोकांसाठी आनंद घेऊन येऊ शकतं. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. वाहन आणि मालमत्तेशी संबंधित सुख मिळण्याची शक्यता आहे. व्यापारात चांगली प्रगती होईल आणि नफा वाढेल. नोकरी आणि व्यवसायाच्या प्रत्येक क्षेत्रात सहकार्य मिळेल. लांबच्या प्रवासातून फायदा होऊ शकतो.
मेष रास
मेष राशीच्या लोकांसाठी सूर्याचं नक्षत्र गोचर लाभदायक सिद्ध होईल. नोकरी करणाऱ्यांना या काळात बढती मिळू शकते. आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी केलेल्या कामाचं चांगलं फळ मिळेल. सामाजिक मान-सन्मान वाढेल. मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता आहे आणि अडकलेली कामं पूर्ण होतील. वैवाहिक जीवन सुखी राहील.
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे मघा नक्षत्र गोचर खूप फायदेशीर ठरेल. या काळात नशिबाची साथ मिळेल आणि नशिबाच्या जोरावर कामात यश मिळेल. पराक्रम वाढेल आणि नात्यांमध्ये सुधारणा होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि जुन्या स्त्रोतांकडूनही पैसा येईल. पैसे वाचवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. व्यापाराचा विस्तार करण्याची संधी मिळेल.