
पुढील तीन महिन्यांसाठी हा करार स्थगित करण्यात आलेला आहे. त्यामुळे या विषयी बिजिंग व वॉशिंग्टन यांच्यात पुन्हा नव्याने करारावर द्विपक्षीय चर्चा अपेक्षित आहे. दरम्यान प्रारंभिक बोलणी ला काही प्रमाणात यश आले आहे ज्यामध्ये त्यांनी करार पुढे ढकलला. याखेरीज डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल मिडिया अकाऊंटवरून या निर्णयाची माहिती दिली आहे. यापूर्वी यशस्वी बोलणीत चीनने अमेरिकेच्या वस्तूवर १४५% वरून ३०%, व चीनने अमेरिकेच्या वस्तूवर १२५% वरून १०% वर आणला होता. मे महिन्यात जेनिवामध्ये झिगपिंग व ट्रम्प यांच्यात चर्चा झाली होती. ज्याचाच उत्तरार्ध म्हणून ही घोषणा ट्रम्प यांनी दिली आहे.
'आमच्यात सगळं काही नाईस (चांगले) आहे आमचे सगळे काही चांगले सुरु आहे संबंध चांगले आहेत' अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी पत्रकारांना दिली आहे. यापूर्वी अमेरिकेने चीनच्या व्यापारी संबं धावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आम्हाला चीनशी सौदा करताना मोठा तोटा होत आहे. आमची राष्ट्रीय वित्तीय तूट हा चिंतेचा विषय असल्याचे अमेरिकेने म्हटले होते. त्यावर चीनने ही प्रश्न सोडवण्या ची ग्वाही युएसला दिली आहे.आगामी ९० दिवस चर्चेसाठी खुले आहेत जे काही मतभेद आहेत ते पुढील दिवसात सोडवण्यासाठी अधिक वेळाची आवश्यकता आहे असे युएस प्रशासनाकडून सांग ण्यात आले आहे. त्यामुळे नवी तारीख १० नोव्हेंबर नक्की करण्यात आली आहे.
मागील मुदत मंगळवारी पहाटे १२.०१ वाजता संपणार होती. जर तसे झाले असते, तर अमेरिका चिनी आयातीवरील कर आधीच असलेल्या ३०% वरून वाढवू शकली असती आणि बिजिंग अमेरि केच्या चीनला होणाऱ्या निर्यातीवर प्रत्युत्तरात्मक कर वाढवून प्रतिसाद देऊ शकला असता. मात्र हे प्रकरण नव्या निर्णयानंतर टळले आहे. यूएस-चीन बिझनेस कौन्सिलचे अध्यक्ष शॉन स्टीन म्हणा ले की, दोन्ही सरकारांना व्यापार करारावर वाटाघाटी करण्यासाठी वेळ देण्यासाठी ही मुदतवाढ "महत्वाची" आहे, ज्यामुळे अमेरिकन व्यवसायांना चीनमधील बाजारपेठेतील प्रवेश सोपा होईल आणि कंपन्यांना मध्यम आणि दीर्घकालीन योजना बनवण्यासाठी आवश्यक असलेली खात्री मिळेल अशी आशा आहे.
अमेरिकेतील शेती आणि ऊर्जा निर्यात पुन्हा सुरू करण्यासाठी फेंटानिलवर करार करणे, ज्यामुळे अमेरिकेचे शुल्क कमी होईल आणि चीनचे प्रत्युत्तरात्मक उपाय मागे घेतले जातील असे स्टाइन पुढे म्हणाले आहेत. जूनमध्ये दोन्ही देशांनी तणाव कमी करण्यासाठी एक करार केला. अमेरिकेने म्हटले की ते संगणक चिप तंत्रज्ञान आणि पेट्रोकेमिकल उत्पादनातील कच्चा माल इथेनवरील ची नवरील निर्यात निर्बंध मागे घेतील बदल्यात चीनने अमेरिकन कंपन्यांना दुर्मिळ पृथ्वीवर प्रवेश मिळवणे सोपे करण्यास सहमती दर्शविली आहे.'
अमेरिकेला हे समजले आहे की त्यांचा वरचष्मा नाही असे अर्नोल्ड अँड पोर्टर येथील वरिष्ठ वकील,चीन प्रकरणांसाठी माजी सहाय्यक यूएस व्यापार प्रतिनिधी क्लेअर रीड म्हणाल्या आहेत. त्यामुळे युएसने हे पाऊच उचलले असल्याची शक्यता आहे. मे महिन्यात, अमेरिका आणि चीनने एकमेकांच्या उत्पादनांवर लादलेले मोठे शुल्क कमी करून आर्थिक आपत्ती टाळली होती, जे चीन विरुद्ध १४५% आणि अमेरिकेविरुद्ध १२५% पर्यंत पोहोचले होते.