
१७ सप्टेंबर २०२५ रोजी जीएलडब्ल्यूची अधिकृत सुरुवात होणार असून त्याच्या प्रसारणाची सुरुवात ४ ऑक्टोबर २०२५ रोजी होईल. क्रीडा आणि तरुणांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार निरंतर करत असलेल्या प्रयत्नांचे हे फलित आहे. जीएलड ब्ल्यूचे प्रसारण डीडी स्पोर्ट्सवरून करण्यात येईल तसेच प्रसार भारतीचा डिजिटल प्लॅटफॉर्म वेव्ह्ज आणि एअरवर त्याचे स्ट्रीमिंग होईल. जीएलडब्ल्यू चा हा कुटुंबांना गुंतवून ठेवणारा पहिला सीझन ४० आठवडे चालणार आहे.
या करारावर बोलताना प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल म्हणाले आहेत की,'भारतीय प्रो-रेसलिंगसाठी ही नव्या युगाची सुरुवात आहे. भारतीय खेळांना जागतिक दर्जाचे बनवण्याचा उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. हॉकी इंडिया, हँ डबॉल असोसिएशन ऑफ इंडिया, पीजीटीआय आणि इतरांसोबत असलेली आमची भागीदारी आणखी पुढे नेत ही भागीदारी विविध खेळांना प्रोत्साहन देण्याची आमची वचनबद्धता मजबूत करते. आणि ही भागीदारी भारताच्या पुढच्या पिढीच्या तरुणांना आणि खे ळाडूंना एक राष्ट्रीय मंच प्रदान करेल.'
या भागीदारी विषयी बोलताना प्रसार भारतीचे सीईओ गौरव द्विवेदी म्हणाले आहेत की,'ही भागीदारी भारतीय प्रेक्षकांना आकर्षक, सांस्कृतिकदृष्ट्या संबद्ध आणि दर्जेदार कंटेंट प्रदान करण्याची प्रसार भारतीची निरंतर वचनबद्धता अधोरेखित करते. जीए लडब्ल्यू तरुणांचे नेतृत्व असलेले कार्यक्रम वेगळ्या शैलीत प्रस्तुत करतो. त्यामध्ये भारताच्या परंपरेला आंतरराष्ट्रीय क्रीडा मनोरंजन मानकांची जोड मिळते.'
उपक्रमाविषयी बोलताना आदिग्रुप आणि एईएक्स स्पोर्टचे अध्यक्ष संजय विश्वनाथन म्हणाले आहेत की,' जीएलडब्ल्यू हा जगभरातील क्रीडा रसिकांना एक वेधक आणि समावेशक क्रीडा-आधारित सांस्कृतिक अनुभव प्रदान करण्याच्या एईएक्स स्पोर्ट च्या व्यापक मिशनचा एक भाग आहे. १७ सप्टेंबर रोजी आम्ही जीएलडब्ल्यू भारताला समर्पित करत आहोत. ज्यामुळे स्पर्धात्मकता आणि क्रीडा मनोरंजनात उत्कृष्टता यांच्या माध्यमातून भारतीय तरुणांचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढेल आणि भारतीय प्रो-रेसलिं ग क्षेत्रातील प्रतिभांना जागतिक मंचावर झळकण्याची संधी मिळेल.'
जीएलडब्ल्यूचे आकर्षण वाढवण्यासाठी माजी डब्ल्यूडब्ल्यूई वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन आणि जागतिक स्तरावर गाजलेला भारतीय अँथ्लीट द ग्रेट खली याची ब्रॅंड अम्बॅसडर आणि टॅलेंट कमिश्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या दुहेरी भूमिकेत तो प्रतिभेची नि वड, मार्गदर्शन आणि कंटेंट विकासात महत्त्वाचे योगदान देईल. द ग्रेट खली म्हणतो, 'रेसलिंगने माझे आयुष्य पालटून टाकले आणि मला जागतिक मंच मिळवून दिला. पुढच्या पिढीच्या भारतीय खेळाडूंना त्याच मार्गावर चालण्यासाठी जीएलडब्ल्यू एक गंभीर, सं घटित आणि मनोरंजक संधी देईल आणि त्यांना भारतीय आणि जागतिक मंचावर आपल्या शर्तींवर झळकण्याची संधी मिळेल.'