Tuesday, August 12, 2025

सोनाटा सॉफ्टवेअरचा शेअर तीन दिवसांपासून जबरदस्त आज सकाळी १२% शेअर उसळला 'या' कारणामुळे

सोनाटा सॉफ्टवेअरचा शेअर तीन दिवसांपासून जबरदस्त आज सकाळी १२% शेअर उसळला 'या' कारणामुळे
मोहित सोमण : सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान वाढ झाली आहे. सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचा शेअर गेल्या तीन दिवसात मोठ्या प्रमाणात रॅली करत आहे त्याचाच उत्तरार्ध म्हणून सकाळच्या सत्रात कंपनीच्या शेअर्समध्ये १०.९८% म्हणजेच जवळपास ११% उसळला आहे. कंपनीने तिमाही निकाल जाहीर केला होता ज्याचा फायदा कंपनीच्या शेअर्समध्ये होताना दिसत आहे.

सकाळच्या सत्रात सुरूवातीलाच कंपनीच्या शेअर्समध्ये ३ ते ६% ब्रॅकेटमध्ये वाढ झाली होती. आज सकाळी ११.३० वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ११.४२% वाढ झाली आहे. कंपनीने जाहीर केलेल्या निकाल प्रमाणे कंपनीच्या निव्वळ नफ्यात (Net Profit) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ३.५% म्हणजेच जवळपास ३% नफा झाला होता. तर जून २०२५ मध्ये संपलेल्या तिमाहीत सोनाटा सॉफ्टवेअरचा निव्वळ नफा वार्षिक ३.५% वाढून १०९३ दशलक्ष रुपये झाला, जो गेल्या वर्षी १०५६ दशलक्ष रुपये होता. या कालावधीत निव्वळ विक्री १७.३% वाढून २९,६५२ दशलक्ष रुपये झाली, जी एप्रिल-जून २०२४ मध्ये २५,२७४ दशलक्ष रुपये होती.

मार्च २०२५ मध्ये संपलेल्या वर्षासाठी, सोनाटा सॉफ्टवेअरचा निव्वळ नफा ३७.७% वाढून ४,२४७ दशलक्ष रुपये झाला, जो आर्थिक वर्ष २४ मध्ये ३,०८५ दशलक्ष रुपये होता. आर्थिक वर्ष २५ मध्ये कंपनीचा महसूल पहिल्या तिमाहीत १७.९% वाढून १०१,५७३ दशलक्ष रुपये झाला आहे.

१२ महिन्यांच्या कमाईच्या आधारे सोनाटा सॉफ्टवेअरचा सध्याचा किंमत-उत्पन्न गुणोत्तर (Price Income Ratio) २२.७ आहे. बुधवारपर्यंत गुंतवणूकदारांनी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात नफा बुकिंग (Profit Booking) केल्याने कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या आठवड्यात ५ ते १०% घसरण झाली होती. हाच पॅटर्न में महिन्यात दर्शविला गेला होता जिथे कंपनीच्या शेअर्समध्ये घसरणीनंतर सलग तीनदा वाढ झाली होती ज्याची प्रचिती गेल्या तीन दिवसात येत आहे. सकाळी ११.३७ वाजेपर्यंत कंपनीचा शेअर ३६८.७० रूपये प्रति शेअरवर सुरु आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >