Tuesday, August 12, 2025

Punjab Police : पंजाबमध्ये मोठी धडक! बब्बर खालसाचे ५ दहशतवादी जाळ्यात

Punjab Police : पंजाबमध्ये मोठी धडक! बब्बर खालसाचे ५ दहशतवादी जाळ्यात

दहशतवादावर पंजाब पोलिसांचा प्रहार


चंदीगड : पंजाब पोलिसांनी मंगळवारी राजस्थानमधून पाच संशयितांना ताब्यात घेतले असून, या सर्वांचा संबंध पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेशी संबंधित दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलशी असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. पंजाबचे पोलिस महासंचालक (डीजीपी) गौरव यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाला पोलिसांशी झालेल्या चकमकीत गोळी लागून तो जखमी झाला आहे. आरोपींना ताब्यात घेण्यापूर्वी पोलिस आणि संशयितांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. डीजीपी यादव यांनी सांगितले की, या आरोपींचे पाकिस्तानस्थित ऑपरेटिव्ह हरविंदर रिंडा याच्याशी थेट संपर्क होते आणि ते त्याच्या निर्देशांनुसार काम करत होते. प्राथमिक चौकशीतून उघड झाले आहे की, आरोपी पंजाब आणि इतर काही राज्यांमध्ये दहशतवादी कारवाया करण्याच्या तयारीत होते.



स्वातंत्र्यदिनाआधी पंजाब पोलिसांनी दहशतवादी कट हाणून पाडला


स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांनी मोठी कारवाई करत पाकिस्तान समर्थित दहशतवादी कट उधळून लावला आहे. पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी शहीद भगतसिंग नगर आणि पंजाबमधील इतर काही ठिकाणी हल्ल्याची योजना आखली होती. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा कट अंमलात येण्याआधीच हाणून पाडण्यात आला. पंजाबचे पोलिस महासंचालक (डीजीपी) गौरव यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर ऑपरेशनची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “पाकिस्तानातील आयएसआय समर्थित दहशतवादी नेटवर्कविरुद्ध काउंटर इंटेलिजेंस पथकाला मोठे यश मिळाले आहे. पाकिस्तानस्थित कुख्यात ऑपरेटिव्ह हरविंदर रिंडा यांच्या निर्देशानुसार कार्यरत असलेले हे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात आले आहे.”




 

डीजीपी यादव यांच्या म्हणण्यानुसार, या दहशतवादी कारवायांमध्ये परदेशातील हँडलर मन्नू अगवान, गोपी नवशेहरिया आणि झीशान अख्तर यांचा सक्रिय सहभाग होता. हे सर्वजण पंजाबमध्ये भीती आणि अस्थिरता निर्माण करण्याच्या उद्देशाने हल्ल्यांची आखणी करत होते. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपींकडून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे आणखी काही अटकांची शक्यता व्यक्त केली जात आहे.



पंजाब पोलिसांनी स्वातंत्र्यदिनापूर्वी मोठी कारवाई करत पाकिस्तान समर्थित दहशतवादी कट हाणून पाडला आहे. या ऑपरेशनअंतर्गत राजस्थानमधील टोंक आणि जयपूर जिल्ह्यातून पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी या कारवाईतून पुढील नियोजित हल्ले यशस्वीरित्या रोखले आहेत. तपासात उघड झाले आहे की, या दहशतवादी मॉड्यूलने अलीकडेच एसबीएस नगर (शहीद भगतसिंग नगर) येथील एका दारू दुकानावर हल्ला करण्याची योजना आखली होती. याशिवाय, स्वातंत्र्यदिनानिमित्त पंजाब आणि शेजारच्या राज्यांमध्ये मोठे हल्ले करण्याचा कट रचण्यात आला होता. अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या ताब्यातून पोलिसांनी एक ८६ पी हँड ग्रेनेड, एक .३० बोर पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या शस्त्रसाठ्यामुळे आरोपींच्या योजनांचा गंभीर आणि घातक स्वरूप स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या (बीएनएस) विविध कलमांखाली तसेच स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून सतत गुप्त माहिती गोळा करण्याचे आणि तत्काळ कारवाईचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.



चकमकीत एक आरोपी जखमी


पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेले सर्व आरोपी थेट परदेशातील दहशतवादी मास्टरमाइंड झीशान अख्तर आणि बब्बर खालसा इंटरनॅशनलचा प्रमुख मन्नू अगवान यांच्या संपर्कात होते. हे दोघे पाकिस्तानस्थित बीकेआय ऑपरेटिव्ह हरविंदर रिंडा याच्या सूचनांवर काम करत होते. पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी छापा टाकला असता तीव्र चकमक झाली. या चकमकीदरम्यान एका आरोपीच्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला. त्याला तात्काळ एसबीएस नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यावर पोलिसांचे कडक पहारे ठेवण्यात आले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा