Tuesday, August 12, 2025

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: वाढता वाढता घसरे भेदीले शून्य बाजारा ! सेन्सेक्स निफ्टी कोसळला 'या' कारणामुळे

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: वाढता वाढता घसरे भेदीले शून्य बाजारा ! सेन्सेक्स निफ्टी कोसळला 'या' कारणामुळे

मोहित सोमण:वाढता वाढता घसरे भेदीले शून्य बाजारा ! ही उपमा आजच्या बाजारासाठी चपखल ठरेल. आज अखेरच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. अखेरच्या सत्रात ब्लू चिप्स कंपन्यांनी मिडकॅप समभागातील होत असलेली वाढ रो खल्याने निर्देशांक आज अनपेक्षितपणे लाल रंगात बंद झाला आहे. अखेरच्या सत्रात सेन्सेक्स ३६८.४९ अंकाने कोसळून ८०२३५.५९ पातळीवर स्थिरावला आहे तर निफ्टी ५० ९७.६५ अंकांनी कोसळून २४४८७.४० पातळीवर स्थिरावला आहे. विशेषतः सकाळी वा ढलेला बँक निर्देशांक दोन्ही बाजारात कोसळल्याने घसरणीला आणखी गती अखेरच्या टप्प्यात मिळाली. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ४७७.१३ अंकांनी व बँक निफ्टीत ४६७.०५ अंकांनी घसरण झाली आहे. सेन्सेक्स मिडकॅपमध्ये ०.२५% घसरण झाली असून स्मॉल कॅपमध्ये ०.०४% वाढ झाली आहे. निफ्टी मिडकॅपमध्ये ०.२७% घसरण झाली असून स्मॉलकॅपमध्ये ०.०४% वाढ झाली.


अखेरच्या सत्रात निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. अनेक मिडकॅप समभागात घसरण झाल्याने क्षेत्रीय विशेष निर्देशांकात त्याचा परिणाम झाला आहे. सर्वाधिक वाढ फार्मा (०.६९%), हेल्थकेअर (०.५९%)ऑटो (०.५६%), मिडिया (०.६०%) निर्देशांकात झाली. सर्वाधिक घसरण खाजगी बँक (०.८१%), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.६५%), फायनांशियल सर्व्हिसेस एक्स बँक (०.८९%), मिडस्मॉल फायनांशियल सर्व्हिसेस (०.५०%) निर्देशांकात झाली आहे. आज सकाळच्या सत्रा त घसरलेला अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) अखेरच्या सत्रात उसळल्याने बाजारातील अस्थिरतेचा फटका ब्लू चिप्स व मिडकॅप कंपन्यांना अधिक प्रमाणात बसला आहे. कालच्या रॅलीनंतर काही नफा बुकिंग झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.


दुसरीकडे सोन्याच्या निर्देशांकात झालेली घसरण जागतिक अर्थव्यवस्थेतील दबाव पातळी कमी झाल्यानंतर झाली होती.चीन युएस यांच्यात अतिरिक्त टॅरिफ वाढीचा निर्णय ९० दिवसांनी पुढे ढकलल्याने मात्र सोन्याच्या दरात फायदा झाला. संध्याकाळपर्यंत सोन्या च्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.२३% घसरण झाली आहे. सोन्यात फायदा झाला असला तरी याच कारणामुळे कच्च्या तेलाच्या निर्देशांकात दबाव पातळी वाढत कच्चे तेल (Crude Oil) महागले आहे. चीन व अमेरिका यांच्यातील वाटाघाटी, दुसरीकडे ट्रम्प व पु तीन यांची भेट या द्वंद्वात गुंतवणूकदारांनी कच्च्या तेलाच्या स्पॉट बेटिंगमध्ये अचानक वाढ केल्याने कच्च्या तेलाच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंतही वाढ झाली होती. त्यामुळे कच्च्या तेलाच्या WTI Futures निर्देशांकात संध्याकाळी ०.२७% वाढ झाली आहे.तर B rent Future निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.३२% वाढ झाली आहे. आज रूपयांच्या तुलनेत डॉलरही घसरल्याने आज सोन्यात आधारभूत किंमत मिळाली होती. मात्र शेअर बाजारातील मोठ्या कंपन्यांच्या शेअरमधील आपली गुंतवणूक परदेशी संस्थात्मक गुंतव णूकदारांनी काढून घेतल्याची शक्यता असल्याने बाजारात मोठे सेल ऑफ झाले आहे. असे असले तरी घरगुती गुंतवणूकदारांनी किती गुंतवणूक केली हे उद्याच कळेल. तुर्तास शेअर बाजारातील मजबूत फंडामेंटलमुळे काल वाढ झाली तरी घसरणीचा पाया आज बाजाराने पक्का केला ज्यात नफा बुकिंगचा समावेश आहे. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस यांसारख्या बड्या शेअर्समध्ये झालेली घसरण बाजाराच्या जिव्हारी लागली आहे.


अखेरच्या सत्रापर्यंत आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टी (०.२९%), स्ट्रेट टाईम्स (०.२९%), कोसपी (०.५३%) बाजारात घसरण झाली आहे. तर निकेयी २२५ (२.२०%), हेंगसेंग (०.१५%), तैवान वेटेड (०.०९%), जकार्ता कंपोझिट (२.३८%), शांघाई कंपोझिट (०. ५०%) बाजारात वाढ झाली. सुरुवातीच्या कलात युरोपियन बाजारातील एफटीएसई (०.१४%), सीएसी (०.१४%) बाजारात वाढ झाली आहे तर डीएएक्स (०.३५%) बाजारात घसरण झाली. सुरुवातीच्या कलात युएस बाजारातील डाऊ जोन्स (०.११%) मध्ये वाढ झा ली असून एस अँड पी ५०० (०.२५%), नासडाक (०.३०%) बाजारात घसरण झाली आहे. आज बीएसईत ४२०४ शेअर्सपैकी २०६८ समभागात वाढ झाली असून १९७३ समभागात घसरण झाली आहे ‌आज एनएसईत एकूण ३०६४ कंपन्यांपैकी १४२२ कंपन्यांच्या शे अर्समध्ये वाढ झाली असून १५४४ कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. विशेषतः एनए सईत ९७ समभाग अप्पर सर्किटवर कायम राहिल्याने बाजारातील फंडा मेटल मजबूत असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.


आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ सोनाटा सॉफ्टवेअर (१३.०३%), अलकेम लॅबोरेटरी (६.२९%), जिंदाल स्टेन (५.१४%), सम्मान कॅपिटल (३.९२%), एसईएमई सोलार होल्डिंग्स (३.७२%), इंडिया सिमेंट (३.२८%), स्टार हेल्थ इन्शुरन्स (२.२१%),लेमन ट्री हॉटे ल (२.०३%), पतांजली फूड (२.०२%), टेक महिंद्रा (१.९०%), अपोलो टायर्स (१.७७%), जेएम फायनांशियल (१.६६%), सिप्ला (१.१२%), टाटा स्टील (१.०३%), एचसीएल टेक्नॉलॉजी (०.७५%), विप्रो (०.०४%) समभागात झाली.


आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण ॲस्ट्रल (८.१३%), प्राज इंडस्ट्रीज (७.१४%), बाटा इंडिया (४.०२%), कजारिया सिरॅमिक्स (३.९८%), रेल विकास (३.८१%), होम फर्स्ट फायनान्स (३.५३%), रेमंड लाईफस्टाईल (२.५४%), सुप्रिम इंडस्ट्रीज (३.०१%), बजा ज फायनान्स (२.८३%), टाटा कम्युनिकेशन (२.२८%), मुथुट फायनान्स (२.१९%), स्विगी (१.८८%), गोदरेज अँग्रोवेट (१.८२%), बजाज होल्डिंग्स (१.७२%), आयडीबीआय बँक (१.६७%), डिक्सन टेक्नॉलॉजी (१.६२%), बीएसई (१.१५%), आयसीआयसीआय बँ क (१.०२%), हिंदाल्को (०.८६%), एसबीआय लाईफ इन्शुरन्स (०.७०%), मस्टेक (०.४४%), एशियन पेटंस (०.४४%), फेडरल बँक (०.३६%), जिओ फायनांशियल सर्व्हिसेस (०.२३%) समभागात झाली.


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'आज भारतीय बाजार सकारात्मकपणे उघडला, गुंतवणूकदारांच्या आशावादामुळे, देशांतर्गत आणि अमेरिकन दोन्ही स्रोतांकडून जुलै महिन्याती ल महागाईच्या आकडेवारीच्या प्रकाशनाची वाट पाहत सहभागी होत असताना, लक्षणीय अस्थिरतेमुळे. आगामी मध्यवर्ती बँकेच्या धोरणांना आकार देण्यासाठी हा डेटा महत्त्वाचा ठरेल अशी अपेक्षा आहे.दरम्यान भूराजकीय घडामोडींनीही लक्ष वेधले,विशेषतः यु क्रेनमधील सुरू असलेल्या युद्धाच्या संभाव्य निराकरणांवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यातील नियोजित बैठकीपूर्वी. क्षेत्रनिहाय, मीडिया, फार्मा, आरोग्यसेवा, ऑटोमोबाईल आणि आयटी क्षेत्रांनी ताकद दाखवली,त र वित्तीय सेवा, बँकिंग, निफ्टी आणि बांधकाम क्षेत्रात कमकुवतपणा दिसून आला. डेरिव्हेटिव्ह्जच्या आघाडीवर,अँस्ट्रल, अल्केम, टीटागढ सुझलॉन आणि मारुती सारख्या समभागांमध्ये लक्षणीय ओपन इंटरेस्ट क्रियाकलाप (Activity) दिसून आला. अँडव्हान्स‌‌-डिकलाइन रेशो किंचित तेजीच्या ट्रेंडकडे झुकला.'


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,' जागतिक व्यापार शुल्कातील चालू घडामोडींमुळे राष्ट्रीय बाजारपेठेत अस्थिरता दिसून आली, जी अमेरिका-चीन शु ल्क युद्धबंदीच्या मुदतवाढीनंतर आणि आज उशिरा येणाऱ्या प्रमुख महागाईच्या आकडेवारीपूर्वी सावधगिरी दर्शवते. अमेरिकेतील चलनवाढीचे आकडे, जर टॅरिफशी संबंधित परिणामाची चिन्हे असतील तर ते फेडच्या धोरणात्मक भूमिकेवर परिणाम करू शकता त. दरम्यान, देशांतर्गत चलनवाढ आरबीआयच्या मर्यादेपेक्षा कमी राहण्याची अपेक्षा आहे. क्षेत्रनिहाय, आरोग्यसेवा आणि ऑटोमोबाईल समभागांनी वाढ नोंदवली, तर वित्तीय आणि रिअल इस्टेट निर्देशांकावर परिणाम झाला. नजीकच्या काळात, गुंतवणूकदारांचे लक्ष देशांतर्गत वापरावर आधारित क्षेत्रांवर केंद्रित असल्याने स्टॉक-विशिष्ट हालचाली कायम राहण्याची शक्यता आहे.'


आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले की,'भारतीय शेअर बाजारांवर टॅरिफ आणि भू-राजकीय समस्यांमुळे अनिश्चितता निर्माण झाली असल्याने निफ्टीला विक्रीचा दबाव सहन करावा लागला. निर्देशांक दिवसाच्या २४७०० पातळीच्या उच्चांकावरून घसरला आणि २०० पेक्षा जास्त अंकांनी खाली बंद झाला. अल्पावधीत, निर्देशांक कोणत्याही स्पष्ट दिशात्मक पूर्वाग्रहाशिवाय अस्थिर राहण्याची शक्यता आहे. नकारात्मक बाजूने, तात्काळ आधार २४४५० पातळीवर ठेवला आहे.या पातळीपेक्षा कमी ब्रेक तो २४,३३७ किंवा त्याहून कमीकडे ओढू शकतो. वरच्या बाजूने, तात्काळ प्रतिकार २४६६०-२४७०० पातळीवर दिसतो आणि या झोनच्या वर सतत हालचाल केल्यास तो २४८५० किंवा अगदी २५ ००० पातळीपर्यंत ढकलू शकतो.'


आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,'सोन्याचा भाव कमकुवत झाला, एमसीएक्सवर १५० रुपयांनी घसरून तो १००४०० रुपयांच्या जवळ गेला, तर कॉमेक्स सोन्याचा भाव ३३५५ डॉलर्सच्या जवळ राहिला कारण व्यापारी नवीन दिशानिर्देशासाठी अमेरिकन सीपीआय डेटाची वाट पाहत होते. बाजार सावध राहिला आहे, डॉलरच्या मजबूतीमुळे वाढ मर्यादित राहिली आहे, तर रुपयाची हालचाल देशांतर्गत ट्रेंडला मार्गदर्शन करेल. सीपीआयमध्ये कोणताही धक्का बसल्याने तीव्र अस्थिरता निर्माण होऊ शकते, मंद वाचनामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होण्यास मदत होईल आणि मजबूत प्रिंटमुळे दबाव वाढेल. आज, एमसीएक्सवर सोन्याचा भाव ९९८००-१०१२०० आणि कॉमे क्सवर ३३४०-३३७५ रुपयांच्या श्रेणीत व्यापार होण्याची अपेक्षा आहे.'


आजच्या रूपयांच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,' डॉलर निर्देशांक ९८.३० च्या आसपास असताना रुपया ८७.७० च्या जवळ स्थिर राहिला आणि थोडासा सकारात्मक बदल झाला. कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्याने रुपयावर दबाव राहिला, तर व्यापारी नवीन संकेतांसाठी आज संध्याकाळी उशिरा यूएस सीपीआय डेटा जाहीर होण्याची वाट पाहत होते. रुपयाची अल्पकालीन श्रेणी ८७.४५ आणि ८७.९५ दरम्यान दिसून येते.'


त्यामुळे आज बाजारात अखेरचे सत्र गुंतवणूकदारांसाठी जड गेले असले तरी उद्याच्या सत्रात रॅली होणार का हे पाहणे गुंतवणूकदारांसाठी गरजेचे असेल. विशेषतः आशियाई शेअर बाजारातील होत असलेली वाढ पाहता ती लेवरेज करण्याची संधी भारताकडे आ हे. याशिवाय आगामी तिमाहीचे निकालही उद्याच्या सत्रात क्षेत्रीय विशेष समभागात परिणाम करतील अशी शक्यता आहे. मात्र तरीही जागतिक पातळीवरील अस्थिरतेमुळे बाजारातील उद्याची सांगता अखेरीस परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (Foreign Instit utional Investors FII) यांच्या हाती असण्याची शक्यता आहे. तरीही भारतीय बाजारात घरगुती गुंतवणूकदारांनी (Domestic Investors) यांनी गुंतवणूक वाढवल्यास नकारात्मक स्थिती 'न्यूट्रल' होऊ शकते. उद्या गिफ्ट निफ्टीचा कौलच उद्याची वाटचाल ठर वेल. तत्पूर्वी बाजारातील ट्रिगर शोधल्यास गुंतवणूकदारांना फायदा होऊ शकतो.

Comments
Add Comment